असच आपल जरा माझ्याबद्दल …
एकंदरीत तसा मी गरीब माणूस … कुणाच्या जास्त भानगडीत नसतो मी …. गपगुमान नोकरी करणे ते ही प्रामाणिकपणे, नोकरीत राजकारण नाही आणि राजकारण केल तर मग निस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही, पण आपला पिंड नव्हे तो.
१९८३ साली जगात आलो, मे महिन्याचा ४ था दिवस होता संध्याकाळचे ४ वाजून २ मिनिटे झाले होते आणि मी पहिला स्वास घेतला , एका कर्तुत्वान पुरुषाच्या आणि खूपच हळव्या मनाच्या स्त्रीच्या पोटी माझा जन्म झाला. मुळचा कवठे-महांकाळ गावचा मी, जो एक तालुका आहे सांगली जिल्ह्यामध्ये. १२ वी पर्यंतचे शिक्षण कवठे-महांकाळ मध्येच झाले, पुढे मग कॉम्पुटर इंगीनेरिंग साठी कोल्ह्पुरला गेलो…. ४ वर्ष्याच ५ झाले … २००५ ला मग कॉलेज जीवन संपले आणि मग नशीब आजमावण्यासाठी पुण्यात आलो ..पहिले १ वर्ष फुकटच काम केले मग अनुभवाच्या जोरावर १०,००० रुपयाची नोकरी लागली आणि २००८ मध्ये लगीन करून मोकळा झालो …..
मराठी माणूस म्हणल की शिवाजी महाराज आणि गडकिल्ले हा जीवनाचा एक भागच असतो, तसच माझही गडकिल्ले फिरणे आणि इतिहासाचा अभ्यास करणे आणि याचबरोबर फोटोग्राफी आणि व्यामाची आवड मला….
बघायला गेल तर एक वेगळ्याच दुनियेतला माणूस आहे मी, पहिल्या भेटीत आक्रमक वाटणारा पण नंतर नंतर मनात घर करून राहणारा माणूस मी … भक्कम शरीर आणि रांगडी चेहरापट्टी यामुळे मी जरा आक्रमक दिसतो खरा, पण तसा नाही मी …. बर्यापैकी विनोदी माणूस आहे मी … भाषाच तसी आहे आमची, २-३ हलक्या-फुलक्या शिव्या बोलण्यात असतात पण ती एक सवय आहे, जाणीवपूर्वक काहीच नसते.
रोज Laptop च्या आजूबाजूला आणि काचेच्या खिडकीतून बाहेरचे सिमेंटचे जंगल पाहून जगणारा मी, २ दिवस सुट्टीचे दिवस आणि जमल तर एखादी जास्त सुट्टी काढून सह्याद्रीत फिरणे आणि त्यामध्ये रमून जाणे हि माझी जीवनशैली.
बुलेट माझा लहान भाऊ तर अल्टो माझी दुसरी पत्नी … जिवापार जपतो यांना मी आणि त्यांनीही मला आजवर जाम साथ दिली हो … माझी अल्टो “सह्याद्रीची राणी” आणि “७ सीटर अल्टो” या दोन नावांनी ओळखली जाते. आजवर ती फ़क़्त सह्याद्रीतच जास्त फिरली आणि गुळगुळीत रस्त्यावर कमीच तरीपण ७ वर्षे होवूनही अगदी रुबाबात चालते.
अजून जास्त जाणून घायचे असेल तर भेटून बोललेले बरे ….
mastttttttttttttttt… lihayla pan kala lagte
सर तुमच्या लेखणीत सुद्धा जादु आहे _/\_
” एकंदरीत तसा मी गरीब माणूस … ” हे काय पटल नाय बगा पाटील…… बाकी फक्कड जमलय की वो (y)
अरे गरीबच आहे मी, पैशाने आणि स्वभावानेपण
लवटे पाटील, आवडली बर… आपल्याला वेबसाईट….. मस्तच आहे…. आता तुम्हीच Entrepreneur व्हा….. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
जय शिवराय
जय मल्हार
जय महाराष्ट्र….
लय बेस दादा, तुम्हाला एकदा भेटायचा आहे तसे आपण भेटलो आहे एकदा दुर्गजागर च्या वेळी पण जास्त बोलता आल नाय.
Bhari Patil <3
पाटील इकडे सुद्धा भेटलात.खूप चांगली वेबसाईट आहे आणि आपल्या कार्याला लेखणीला तोड नाही.तुमच्यासारखी दिलखुलास माणसं खूप कमी आहेत.
Thank You very much, Kiran
Shevati wagh to wagh ch
Cute patil , mastach o
पाटिल…नेहमी प्रमाणेच कडक शब्दात अत्तापर्यंच्या जीवनाच वर्णन मांडलय तुम्ही
फार मस्त बनवले आहे संकेतस्थळ…एकदम क्युट😎
लेखणी तर एकदम खुमासदार आणि दिलखुलास…
सगळे लेख एकत्र वाचायला मिळाले.
खूप धन्यवाद..💐
पाटील म्हणून we all love you 😘
Love you too bhava
एकदम मस्त दादा