मुलभूत माहिती:
१) प्रकार – अतीखडतर
२) ट्रेकचे अंतर : ८ ते १० किलोमीटर
३) पुण्यापासून २५० किलोमीटर (पुणे-नारायणगाव-आळेफाटा-बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा-घाटघर)
४) Difficult Level : Very Difficult
५) ट्रेकिंगचा दिवस :१९-२० जाने २०१४
राकेश बरोबर मी खऱ्या अर्थाने ट्रेकिंग ला सुरु केली ती २६ जाने २०१३ ला , आणि तोही संधान व्हेली चा ट्रेक …. त्याच्या आगोदर तसे बरेच गड-किल्ले फिरलो … पण “ट्रेकिंग” असा प्रकार नव्हता, योगा-योगाने तो सुरु झाला आणि १ वर्ष्यात अक्षरशः सह्याद्री धून काढला. अनेकदा ट्रेकिंग मध्ये बरेच दुसरे ट्रेकर्स भेटायचे मग आम्ही त्यांना चांगल्या ट्रेक्स बद्दल विचारायचो… एक ट्रेक ज्याचे नाव सारखे यायचे तो म्हणजे “अलंग मदन कुलंग ” … म्हणले हा काय प्रकार आहे पाहावा म्हणून मी गुगल मावशीची मदत घेतली….. मग मला कळून चुकले की हा आपला बाकीच्या ट्रेक सारखा ट्रेक नक्कीच नाही .. कारण इथे दोर खेळ मजबूत होता ज्या मध्ये आम्हाला अनुभव नव्हता. पण इच्छा फार होती.
मग आमचे नितीन भाऊ नी सांगितले की आमचा एक मित्र आहे आणि त्यांचा एक ट्रेकिंग चा ग्रुप आहे “स्वछंद ग्रुप” त्यांनी या ट्रेक ची मोहीम आखली आहे आणि आपण म्हणजे नितीन, राकेश आणि मी जायचे आहे….. म्हणले असा मोका नंतर नाही भेटणार आणि मी लगेच होकार कळवला. मग काय मोहिमीची तयारी झाली आणि तो दिवस उजाडला. खुपच उत्साही आणि आनंदी होतो कारण अलंग मदन कुलंग ट्रेक म्हणजे एक स्वप्नपूर्ती होती.
१८ तारीख शुक्रवार होता १० च्या सुमारास बस नाशिक फाट्या मार्गे भोसरी गावात आली जिथे मी आणि कंगकण होतो … आम्हला घेऊन बस मग निघाली अलंग मदन कुलंग च्या दारी !!! बस मध्ये २-३ जन सोडले तर सगळेच अनोळखी होते …. निम्मे झोपेत होते … निम्मे डबे उगडून चरत होते … आणि काही गप्पा हाणत बसले होते…. नारायणगाव येऊ पर्यंत सगळे जागे होते … नंतर मात्र हळू हळू सगळे शहीद होऊ लागले …. आम्हाला निघायला बराच वेळ लागला होता म्हणून आम्ही पोहचणार हि खूप उशिरा होतो… मला मात्र चिंता झोपेची होती कारण झोप नाही झाली तर मग ट्रेकिंग मध्ये हाल होते … कारण हा अनुभव १-२ वेळा आला होता…. पण काही इलाज नव्हता ….
आम्ही सकाळी ४ च्या सुमारास पोहचलो …. अतिशय जबर थंडी होती …. थंडीमुळे आमच्या पैकी बरेचजन गुढग्याने टाळ्या वाजवत होते … प्रतेकाला कधी एकदा स्लीप्पिंग ब्याग मध्ये जातोय असे झाले होते … कारण एकतर भयानक थंडी आणि १-२ तासच झोपयला वेळ होता…. मी एक चटई घेतली होती ज्यावर मी आणि नितीन झोपणार होतो … आमचे राकेश भाऊ तसेच आले होते …. वजन जास्त होईल म्हणून म्याट आणली नव्हती फ़क़्त स्लीप्पिंग ब्याग च्या भरोश्यावर होते … आणि राकेश भाऊ माझ्याकडे गोजिरवाण्या नजरेने पाहत होते .. पण मी म्हणले “काही करू शकत नाही भावा… कारण माझ्या चटई वर मी आणि नितीन नावाचा भला मोठा प्राणी झोपणार आहे त्यामुळे तुला जागा नाही”.
सकाळी उठलो …. अनिकेत आणि पुर्निमाने मस्त चहा बनवला होता …. चहा घेतला … पाहुणे सोडले … आणि मग कंबर कसायला सुरु केली.
सगळे मावळे तयार होऊन बाहेर आले … अनिकेत आमचा मोहरक्या होता … त्यांनी आम्हाला सगळी नियमावली सांगितली … मह्त्वाच्या सूचना दिल्या … आणि मग सगळे अलंग च्या दिशेने चालू लागले. एकदम मस्त अशी सकाळ होती … फोटो काढायचा मोह कसा आवरेल ?…. मग मस्त पाकी अलंग मदन कुलंग या तीन भावांचा एक फोटो घेतला……
अलंगगड, मदनगड आणि कुलंगगड हे तीन किल्ले सह्याद्रीच्या कुशीत अगदी कळसुबाई च्या शेजारी उभे आहेत. तिघांचीही उंची जवळपास कळसुबाईएवढीच. वाट अतिशय दुर्गम, लिखित माहिती(ऐतिहासिक लेख, नकाशे) अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध! गड सर करताना / उतरताना rock climbing, rappelling करावे लागते. परिणामतः बऱ्याच गिर्यारोहकांना या किल्ल्यांबद्दल काहीच माहिती नसते अथवा येथे येणे केवळ स्वप्नच राहते. (बऱ्याच अनुभवी गिर्यारोहकांच्या मते हा महाराष्ट्रातील दुसरा सर्वात कठीण ट्रेक आहे.)
सुरुवातीची चढण सोपी होती. पहिल्या पठारावर पोहोचल्यावर थोडी विश्रांती घेऊन, सकाळची न्यारी घेऊन …. सकाळी सकाळी चिकन चा नास्टा असला कसं मस्त वाटते …. हे सगळे आटपून आम्ही लोक पुढे निघालो. प्रत्येकाला फोटो काढायचे होते … ते हि चालूच होते … पण प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट होती ती म्हणजे रोप लाऊन चढणे-उतरणे कधी येणार ? कारण उत्सुकता दांडगी होती मनामध्ये.फु-बाई-फु चे दोन कॉमेडी कलाकार होते आमच्यासोबत ते म्हणजे अनिकेत (काळ्या) आणि शैल्या …. दोघांनी एक सूरच पकडला होता पंचिंग चा … त्यामुळे एवढे हसणे होत होते की काय सांगू … …. तशी अजून पर्यंत सगळ्यांची ओळख नीट झाली नव्हती. पण सगळे असे वागत होते जसे लहान पणापासून एकमेकांना ओळखतात. हीच तर गोष्ट आहे ट्रेकिंग ची जी सगळ्यांना आवडते.
इथून पुढे जरा चांगलीच दमछाक करणारी वाट होती …. बऱ्यापैकी मोठी चढण होती … आणि आमचा मोहरक्या “अनिकेत भाऊ” सगळ्याच्या मागे असायचा … जसे तो आम्हाला मेंढरा सारखे हाकत होता…. कोणाला जास्त वेळ थांबू देत नव्हता बरोबर होत त्याचे कारण मग नियोजना प्रमाणे ट्रेक झाला नसता.
मग मी आणि राकेश भाऊ नी एक मधला मार्ग शोधला आणि काही लोकांना मागे ठेवा म्हणजे त्यांची वाट बघण्याच्या निम्मित्ताने थोडे थांबणे होते मग आम्ही मध्ये मध्ये थांबायचो …. एकमेकांचे फोटो काढणे सुरु होते
दमछाक करणारी चढाई झाल्यावर एका ठिकाणी आम्ही सगळे एकत्र होण्याचे ठरवले कारण भरपूर लोकं मागे पुढे होत होते त्यामुळे सगळ्यांनी एकत्र होऊन जाने असा निर्णय अनिकेत ने घेतले म्हणून आम्ही मग एकत्र जमलो…. डबे उघडून खने सुरु झाले … शेंगदाण्याच्या पोळ्या … लाडू … चटणी चपाती असे बरेच प्रकार बाहेर येऊ लागले
खाने पिणे झाल्यावर मग फेसबुक प्रोफाईल फोटो काढण्याचे काम सुरु झाले…. प्रय्तेकजन आप-आपल्या पद्धतीने पोसेस घेऊन उभे होते आणि मी आपला फोटो काढत होतो.
प्रोफ़यिल फोटोंची सांगता करत मग आम्ही चालणे सुरु केले …. परत काही लोक पुढे काही मागे अशी परिस्थिती होती … आमच्या नेत्यांकडे वाकीटाकी होते त्यामुळे एकमेकांसोबत बोलणे सुरु होते … कोण कुठे आहे हे समजत होते, जास्त अंतर पडले असेल तर पुढचे लोक थांबायचे मग परत सगळे एकत्र यायचे … असा एकंदरीत खेळ सुरु होता.
इथून पुढे मात्र परत एकदा चढायीचे काम होते …. पुढे दिसत हि होते कि आता खूप लागणार आहे पण आता सवय झाली होती म्हणा …. शरीराने पण परिस्थिती मान्य केली होती अनिकेत म्हणत होता एवढे झाले कि मग सरळ चालणेच आहे … हे नव्हते सांगितले कि डोंगराच्या खचितुन ते … जर इकडे तिकडे झाले कि सरळ दरीत ….
आता इथून पुढचा प्रवास म्हणजे सगळा सर्कशीचा होता … रोल लाऊन चढणे आणि उतरणे, जे आमच्यापैकी बऱ्याच लोकांनी पूर्वी कधी केले नव्हते, पहिला टप्पा सोपा होता म्हणा … पण पुढच्या मोठ्या टप्यांचा हा एक सरावच होता. अनिकेतने रोप लावायचे काम सुरु केले तोपर्यंत आम्ही जोकर लोकं कॉमेडी करत होतो … एकमेकांची माप काढत होतो …. शैल्या आणि अनिकेत (काळ्या) जोक्स वर जोक्स मारत होते….. फोटो शूट चालले होते …. एकंदरीत एकदम ढासू टाइमपास चालला होता. आणि आम्ही सर्वजण अगदी गुणी मुले होतो त्यामुळे सगळे जोक्स पण अगदी गुणी होते …. त्यामुळे बिचारी पूर्णिमा तिला काही लोव्कर समजतच नव्हते म्हणून जोक झाला की “काय” ? हा प्रश्न तिचा नक्की असायचा…. कालातंराने पुर्निमाचे नाव “काय काकू” असे पाडण्यात आले.
आता मात्र आम्ही अलंग किल्यावर पोहचण्याच्या मार्गावर होतो … अनिकेत सांगतच होता की किल्यावर पोहचून आपण तितल्या गुहेत थोडी विश्रांती घेऊन, मग थोडा किल्ला फिरून पुढे जायचे आहे, जिथे दोर लाऊन १०० फुट खाली उतरायचे आहे …. शेवटचे वाक्य सोडले तर बाकीचा ऐकून बरे वाटले मग बिगीबिगी पाय उचलत आम्ही गुहेत पोहचलो जिथे आम्ही जेवण केले. आणि किल्ला फिरण्यास निघालो.
किल्ल्यावर पोहचताच , गुहेच्या बाजुने एक वाट वरच्या बाजुस जात होती.. तिथुन पुढे गेले असता वाटेतच पाण्याच्या भल्यामोठ्या टाक्या आढळतात… अतिशय सुंदर अशा पाण्याच्या टाक्या … काहि टाकितले पाणी तर शुद्ध वाटत होते.. गाईडला विचारले असता कळले की बारामाही पाणी टिकुन असते ! खोली तर म्हणे न समजण्याऐवढी खोल आहे !! पण एकुण या टाक्यांचा विस्तार बघुन यांचे त्याकाळचे वैभव काही औरच असावे याची कल्पना आली.. तिथुनच आम्ही पुढे वरच्या बाजुस निघालो.. पुन्हा वाटेत पुर्वीच्या बांधकामाचे अवशेष आढळले ! एका बाजुला एकुलत्या एक राजवाड्याची(गाईडने सांगितल्याप्रमाणे) भिंत तर अजुन बर्यापैंकी शाबुत आहे !
पाण्याच्या टाक्यांवर सगळे असे तुटून पडले की काय बोलू नका …. कोण पाण्यात पाय बूडवून , कोणी तोंड धूत होता… कुणी तोंड बुडवत होता….. काय ते थंड पाणी … व्हा ….
आता आम्ही किल्ला पाहून सगळ्यांनी अलंग सोडायचा ठरवले आणि मग मदन कडे कुच सुरु केली …. आता मात्र पुढे एक मोठा अव्गड टप्पा होता तो म्हणजे अंदाजे १०० फुट रोपने उतरायचे होते. १-१ मावळा पुढे सरकत होता … जिथे आवश्यक होते तिथे अक्षरशः आम्ही रंगत जात होतो कारण “प्रतिष्ठा में प्राण मत गवावो” असे कुणीतरी म्हणले आहे.
आता इथून rappelling करत जायचे होते … मस्त अनुभव होता … आणि जरा गडबडीत होते सगळे कारण अंधार पडत होता … आणि rappelling चा टप्पा झाला की Rock Climbing चा टप्पा हि होता…
rappelling झाल्यावर भरपूर चालणे होते थोडा अवगड उतारही होता . हा उतर किरकोळच होता … हा पार कडून आम्ही सगळे पुढे निघालो कारण एक मोठ्ठा पल्ला होता सरळ चालणे होते पण डोंगराच्या खाचेतून.
आता मात्र एकदम मस्त चढ लागला होता आणि तो करून मग डोंगराच्या खाचेतून भरपूर चालणे होते .. खालील फोटोतून तुमच्या लक्ष्यात येईल.
हा मोठ्ठा पल्ला आम्ही ना थांबता पार केला, हा प्ला चालताना खरंच एक खुपच वेगळा आनंद होता, असे वाटत होते की या पुर्थ्वीवर फ़क़्त आम्हीच लोकं आहोत … एकदम शांत… थंड हवा … घनदाट झाडी… असे वाटत होते की अश्या ठिकाणी न येणारी लोकं खऱ्या जगण्याचा आनंद अनुभवत नाही आहेत. खर सांगायचं तर ट्रेकिंग हा फ़क़्त एक शब्द आहे … पण त्याच्यात बरेच काही दडले आहे …. खूप काही शिकवून जाते … त्याचवेळी काही शब्द सुचले …
१) ट्रेकिंग मला, जगाच्या सुंदरतेची व्य्ख्या शिकवते.
२) ट्रेकिंग मला, हसणे शिकवते.
३) ट्रेकिंग मला, आपण कोणत्याही मानव निर्मित गोष्टी शिवाय जगू शकतो हे शिकवते.
४) ट्रेकिंग मला, सहकार्याची भावना हि सर्वात चांगली भावना हे शिकवते.
५) ट्रेकिंग मला, “टीम” या शब्दाचा अर्थ शिकवते.
६) ट्रेकिंग मला, या जगात आपण एकटे नाहीत याची जाणीव करून देते.
७) ट्रेकिंग मला, हसत खेळत जगण्यासाठी काहीच करावे लागत नाही हे शिकवते.
८) ट्रेकिंग मला, नियोजनाची परिभाषा शिकवते.
९) ट्रेकिंग मला, या जगात किती चांगले लोकं आहे याची जाणीव करून देते.
…………
१०) ट्रेकिंग मला, जगणे शिकवते.
ट्रेकिंग मला … बरेच काही शिकवते …….
आता आम्ही मदन किल्ल्याच्या जवळ पोहचलो होतो एक शानदार चढ चढून जायचे होते … त्यानंतर Rock Climbing चा टप्पा हि होता. एक होते की अंधार होणार हे लक्ष्यात आले होते त्यामुळे गडबडीने जाने आवश्यक होते… आणि आम्ही १९-२० जन होतो त्यामुळे Rock Climbing आमचे २-३ तास घेणार होते. आणि झाले हि तसेच जेव्हा Rock Climbing सुरु केले त्यावेळी उजेड होता मात्र निम्मे उजेडात आले आणि निम्मे अंधारात आले … आणि जे निम्मे लोव्कर वरती गेले होते त्यांची थंडीने बेकार हाल करून टाकले होते… असा थंड वर मी कधीच अनुभवला नव्हता …. अक्षरशः हात – पाय कपात होते … भयानक थंड वारे होते … कधी एकदा गुहेत जाऊन झोपतोय असे झाले होते सगळ्यांना …
अंधारात परत डोंगराच्या खाचेतून चालत आम्हाला मदन किल्ला गाटायचा होता … मस्त थंडी होती आणि १-२ तास बसून होतो म्हणून चालण्याचा आता कंटाळ येत होता .. पण पर्याय नव्हता .. शेवटी आम्ही १ तासाभराने आम्ही मदन किल्ल्यावर पोहचलो . गुहेत प्रवेश केला … जसा गुहेत प्रवेश केला … काहीही थंडी नव्हती … आजिबात वर लागत नव्हता …. इतके बरे वाटले म्हणता … काय सांगू …. असे वाटले …
“या सह्याद्री मातेने , कंटाळलेल्या तिच्या लेकरांना जसे कुशीतच घेतले होते”
“सह्याद्रीच्या कुशीची उब आणि जन्मदात्या मातेच्या कुशीची उब जशी एकच”
पूर्णिमा म्हणजे आमची “काय काकू” …. खरच खूप कष्टाळू होती … एवढी थकलेली असून तिने सगळ्यांसाठी गरम-गरम सूप बनवला …. नंतर मग मस्त पैकी बटाटची आमटी बनवली ….. एक अतिशय सुंदर आणि दर्जेदार भिजण करून एक-एक मावळे शहीद होत होते. ती जी झोप होती तशी झोप फ़क़्त आम्हाला सह्याद्रीच्या कुशीतच लागते … ना गडी असते … ना उशी असते … पण झोप जी लागते ती काय ??? व्हा ….
इथे आमचा पहिला दिवस संपला …
————————————————————————————————————
दुसरा दिवस उजेडला … सकाळी लवकरच उठले सारे … प्रत्येकजण आप-आपल्या कामात होता .. आवर आवर सुरु होती … ब्यागा भरणे सुरु होते … कोण ब्रश करत होता … कोणी पाहुणे सोडायला जात होते .. गुहेच्या अंदाजे २०-३० फुट मागे एक खूप खोल अशी दारी होती जी आम्हाला सकाळी माहीत झाले … वरती जाऊन पाहून आलो … अतिशय बेकार थंड वारे होते …. फोटो काढले … पाणी भरून घेतले … आणि मग कुलंग कडे कुच सुरु केली.
आता परत रात्रीचा तो मोठ्ठा चढ उतरायचा होता … रोप बांधली होती कारण एकदमच डोंगर कडा होती … हळू हळू सगळे उतरत होते … चढ उतरून आम्ही काही लोकं पुढे आलो होतो … मग मागचे लोकं येऊ पर्यंत फोटो काढण्याचे काम सुरु होते …
फोटो काढण्याचा कार्यक्रम संपला मग सगळे एकसाथ कुलंग साठी निघाले … परत तोच प्रकार होता डोंगराच्या खाचेतून प्रवास होता सगळे आप-आपल्या काळजीने पुढे सरकत होते … गप्पा मारत … जोक्स करत प्रवास सुरु होता … एका ठिकाणी अतिशय खतरनाक उतर होता … आम्ही काही कोल तर अक्षरशः रंगत गेलो … कारण खुपच निसरन होती ….
लांब-लचक प्रवास संपून आम्ही एकदाचे कुलंग ला पोहचलो … आमच्यापैकी काही मावळे डोंगराच्या खाचेतच बसून राहिले काही लोकं वरती गड बघून आले … आम्ही बसून गप्पा मारत होतो … खाने पिणे सुरु होते….
सगळे गडावरून परत आले … मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो … वरून गडावरून पाहत होतो की आपल्यला नक्की कुठे जायचे आहे…. खुपच अंतर होते … असे वाटत होते की आता एवढे चालणे होईल का ते ? पण चालायचे तर होतेच
हळू हळू आम्ही गड उतरत निघालो … मग असे ठरले की जिथे डांबरी सरता लागतो तिथे पर्यंत जाऊन स्वयंपाक करायचा .. आणिक १-२ जन जाऊन गडी आणतील. हे ऐकून बरे वाटले आणि ठरल्या प्रमाणे आम्ही १-२ तासात डांबरी रस्त्य पर्यंत पोहचलो … पाणी भरपूर होते … सगळ्यांनी आंघोळ केली … स्वयंपाक सुरु झाला आणि ग्यास संपला … मग सगळे लाकडे शोधू लागले … चूक करून मग उरलेला स्वयंपाक झाला … मस्तपैकी खिचडी शिजत होती … मग खिचडी झाल्यावर म्यागी करायची ठरवली.
एकंदरीत असा हा आमचा प्रवास झाला …. अतिशय रोमांचीक आणि अविस्मरणीय असा हा ट्रेक होता … एक स्वप्नपूर्ती होती म्हणा … कारण बऱ्याच जनाचा हा ट्रेक म्हणजे एक स्वप्न असते.
या ट्रेक चे विशेष म्हणजे अतिशय चांगले मित्र भेटले … आणि आमचा एक ग्रुप हि बनला … आणि इथून पुढचे सगळे ट्रेक एकत्र करण्याचा मनसुबा ठरला.
आमचे दादा भूषण शिंदे-देशमुख यांनी फेसबुक वर याचे वर्णन हि केले आहे …
AMK – This three letters are like a dream come true for any Trekker who love this mighty Land of Maratha’s and there unconquerable endurance and valor.
This 3 words AMK defines the same ,and brings the real ‘me’ out of person.
This trek couldn’t have been possible without a patient & temperamental team leader Aniket Kulkarni and his lieutenant Deepak Rokade , sweet & generous coordinators Poornima Asari , Vaibhav Kulkarni ,anil kaka, Hrishikesh Deshmukh.
Tirthraj Joshi the man behind a curtain ,thanks to him for guiding us on various instances, Madhura Athavale for teaching us what a girl can do ,thanks to Rushikesh Kakade for this fabulous smiling face which kept us energetic at all time, and the best part added friends for life Prashant Lavate-Patil the photographer philosopher ,apple boys Nilesh Phirke & Nitin Nare ,chocolate boy Rakesh Sardesai..&&& my buddies Aniket Kunjir, Ganesh Marne-Patil, Swapnil Chopade,and the kapil sharma of the gang a kind human being Shailesh Badave.
Thanks to all of you for sharing some great time together which will cherish for our life.
0 comments on “अलंग मदन कुलंग – एक स्वप्नपूर्ती !!!” Add yours →