10433893_10152512662795295_1967743162892752460_n

भाटघर धरण

९ जुलै ला फेसबुक वर मी एका बातमीची कात्रण पाहिली… त्यामध्ये होते की राजगडाच्या पायथ्याशी जे भाटघर धरण वेळवंडी नदीच्या तीरावर आहे ते कोरडे पडले आहे आणी ११० वर्ष्यानी शिवकालीन प्राचीन मंदीर… मावळ्यांच्या समाध्या …सभा मंडप …  बाजारपेठांचे अवशेष … असे हे शिवकालीन वैभव पाण्याबाहेर आले आहे.

How to Go:

पुणे –> नसरापूर –> कापूरहोळ –: पासुरे (भोरच्या अलीकडून उजवीकडे पसुरेला रोड जातो) –> वेळवंडी

गुगलमॅप वरती पुणे तो वेळवंडी अगदी अचूक रस्ता दाखवला जातो.

एक शिवप्रेमी आणी गडकोट प्रेमी म्हणून शिवकालीन किल्ल्यांचेच एवढे कुतूहल वाटते की एवढी वर्षे झाली तरी हे किल्ले अगदी अभिमानाने उभे आहेत .. आजही या किल्ल्यांची तटबंदी पाहिली की वाटते जणू हे आजच्या युगालाही एक आव्हान देत आहेत …. हे किल्ले तर सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतावर उभे आहेत … पण भाटघर धरणातील हे शिवकालीन तर ११० वर्षे पाण्याखाली तरीही अजून तसेच ????

बुधवारचा दिवस होता … म्हणलं हे बघायचे आहे … आणी सुट्टी होती शनिवारी …. परत विचार आला पाऊस सुरु झाला आणी परत धरणात पाणी आले तर मग कठीण आहे … १२-१३ जुलै शनिवार-रविवार त्यामुळे सुट्टी तर होतीच .. पण त्या आगोदर पन्हाळा-विशालगड च्या वारीचाही मनसुबा ठरला होता म्हणून लगातार  शुक्रवार पासून मंगळवार पर्यंत सुट्टी घेतली होती त्यामुळे शुक्रवार दिवस सोयीचा होता… पाऊस ही तसा सुरु नव्हता ..

आमचे दादा (भूषण शिंदे-देशमुख)  (Bhushan Shinde-Deshmukh)  यांना फोन केला …म्हणलं भाटघर धरणाला जायचं आहे शिवकालीन वैभव ११० वर्ष्यानी पाण्याहेर आलंय आणी ते बघायचं आहे … त्याचे फोटो काढून घायचे आहेत … २ मिनिटाचा विचार न करता दादा म्हणाला शुक्रवारी पहाटे ५ ला या … निघू … शैलेश (Shailesh Badave) आणी अनिकेत (Aniket Kunjir) तयार होते.

११० वर्षे … ही वस्तू पाण्यात होती …शिवकालीन श्री. नागेश्वर शंभूमहादेवाचे मंदिर , सभा-मंडप … मावळ्यांच्या समाध्या … बाजारपेठेचे अवशेष …

ती नंदीची मूर्ती तर अशी दिसत होती जशी आत्ताच बनवून ठेवली आहे … विचार करण्यासारखी गोष्ट, ११० वर्षे … ही वस्तू पाण्यात होती आणी काय ते मंदिर आणी नंदीची मूर्ती दिसत होती ….  खरच या सह्याद्रीच्या कुशीत अजून काय-काय लपले आहे हे फ़क़्त त्या सह्याद्रीलाच माहित.

 

 

 

या धरणामध्ये २ मंदीर आहेत … वरील फोटो जे आहेत ते म्हणजे, जे मदिर आणी शिवकालीन वैभवाचे अवशेष जे ११० वर्ष्यानी पाण्याबाहेर आलेत.

आणी दुसरे मंदीर म्हणजे, गावातून धरणामध्ये गेल्या गेल्या एक मंदीर दिसते ते … हे ही मंदीर पूर्ण वर्ष्यामध्ये फ़क़्त १ चं महिना पाण्याबाहेर येते … गावातील लोकांनी सांगितले की हे मंदीर फ़क़्त मे महिन्यात आम्हाला दिसते .. पण यावेळी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे धरणातील पाणी कमी झाले त्यामुळे जुलै महिना आला तरी ते मंदीर बाहेर दिसत होते. त्याचे फोटो ….

 

 

 

 

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “भाटघर धरणAdd yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *