बारा मोटेची विहीर ( सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे “शेरी लिंब” , लिंब हे गावाचे नाव आणी शेरी म्हणजे त्या गावातली एक वस्ती.) …. फेसबुकवर बरेच काही वाचले … बऱ्याच लोकांनी याबद्दल माहिती टाकली .. म्हणल त्या भागात गेलं की बारा मोटेची विहीर नक्की बघून यायची आणी नेमका इतिहास काय आहे हे समजून घ्यायचा… भूषण दादान भूषणगड, सदाशिवगड, मच्छिंद्रगड आणी वसंतगड असा ट्रेकिंगचा प्रवास आखला होता पण वेळे अभावी आम्हाला वसंतगड करता आला नाही … म्हणून आम्ही जाता-जाता बारा मोटेची विहीर पाहायची ठरवली …. मी, भुषणदादा , गणेश मारणे-पाटील आणी शैल्या.
जेवढ्या पोस्ट पहिल्या त्या सर्व पोस्ट मध्ये खालील काही मुद्दे होते …
- ही विहीर शिवकालीन आहे.
- इ.स. १६४१ ते १६४५ मध्ये बांधकाम झाले.
- सातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकार्यांशी संवाद साधत असत
आम्ही जी माहिती मिळवली ती खालील प्रमाणे
- इ.स. १६४१ ते १६४८ मध्ये बांधकाम झाले नसून… हे बांधकाम शके १६४१ ते १६४५ मध्ये झाले आहे (शके आणी इ.स. यामध्ये ७८ वर्ष्यांचा फरक आहे शके १६४१ मध्ये बांधकाम सुरु झाले म्हणजे इ.स. १७१९ मध्ये बांधकाम सुरु झाले आणी याचे बांधकाम छत्रपती शाहू महाराज (पहिले) म्हणजे धर्मवीर संभाजी महाराजांचे मुलगे यांनी सुरु केले. )
- शाहू महाराज आणी पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यात ज्या गुप्त बैठका होत होत्या त्या गुप्त महालात होत होत्या…. त्याच बरोबर शाहू महाराज विश्रांती साठी म्हणून इथे येत असत ….वरील बाजूस एक सदर आहे जिथे बसून ते गावतल्या लोकां बरोबर संवाद साधत यामध्ये काहीही राजकीय संवाद नसत…. ही विहीर बांधण्याचे कारण म्हणजे आजूबाजूच्या परिसरात त्यावेळी महाराजांनी विविध जातीच्या आंब्याच्या झाडांची बाग केली होती ज्याला आमराई म्हणत. आणी त्या झाडांच्या पाण्याची व्यवस्था म्हणून ही विहीर बांधण्यात आली होती.
बांधकामात विविध पैलू आहेत … एकूण ९० फुट खोल असलेली ही विहीर पूर्ण भरल्यावर पाण्याचा पुरेपूर वापर होण्यासाठी उपविहीर बनवली आहे ज्याला मध्ये जोडणारा एक भाग आहे अगदी एका पुला सारखा … विहिरीच्या बांधकामात दक्षिणेकडे तोंड करून दोन वाघांची प्रतिकृती कोरली आहे ज्यामध्ये वाघांच्या पायाखाली हत्ती दिसेल आणी उत्तरेकडे तोंड करून दोन वाघ आहेत जे आक्रमक पद्धीतीने बनवले आहेत… याचा अर्थ असा की मराठ्यांनी दख्खन तर पायाखाली घेतलाच आहे आणी उत्तरेकडे झेप घेण्यासाठी तयार आहे.
विहिरीच्या बरोब्बर वरती जो गुप्त महाल आहे तो अगदी सुरेख आणी कलाकृतीने सज्ज असा आहे.वरून पहिले की शत्रूला थोडाही संशय येणार नाही की इथे गुप्त महाल आहे अशी या विहिरीची रचना आहे.
आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो.इथून महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत.इंग्रजी एल आकाराच्या जिन्याने वर जाताच आपण छोटेखानी महालात येवून पोहोचतो.
या महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र. खांबाच्या दुसऱ्या बाजूस अशावारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले.या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.
मित्रांनो …. ही विहीर नक्की एकदा बघा … जे काही आहे ते एकदम अफलातून आहे….. !!!
विहिरीत उतरन्यासाठीचा जीना
खाली उतरून आला की उप विहीर लागते
शाहू महाराजांची सदर
मुख्य विहीर
त्याकाळी पायर्या उतरून जाण्याचे मार्ग खूपच अरुंद असत …त्याचे कारण असे कि एका वेळी एकच माणूस खाली उतरू शकावा … जर शत्रूचे आक्रमण झालेच तर एका वेळी एका माणसाबरोबर लढाई करता यावी. यामुळे त्यावेळची जिने हे खूप अरुंद आणि उंचीला लहान असे असायचे याचा नमुना तुम्हाला इथे पहावयास मिळेल.
गुप्त महाल
0 comments on “बारा मोटेची विहीर” Add yours →