DSC_0317

भुषणगड – सदाशिवगड – मच्छिंद्रगड

मुलभूत माहिती:

  1. पुण्यापासून  १५० किलोमीटर 
  2. ट्रेकचा दिवस : २४ ऑगस्ट २०१४
 भुषणगड:
 देवगिरीचा सम्राट राजा सिंघण दुसरा (1210-1247) याने हा किल्ला बांधला. इ.स. 1676 मध्ये शिवाजी राजांनी आदिलशाहाकडून भुषणगडचा किल्ला जिंकून घेतला व त्याची फेरउभारणी केली. नंतरच्या काळात औरंगजेबाने किल्ले जिंकून त्याचे नाव इस्लामतारा ठेवले. पेशवेकाळात हा गढ प्रतिनिधींच्या ताब्यात होता.  इ.स. 1848 मध्ये इंग्रजांनी साता-याचे राज्य खालसा केल्यावर भुषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला.सातारपासून भुषणगड 45 कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्यावर हरणाई देवीचे मंदिर आहे.भुषणगडची उंची 904 मी. आहे.हा किल्ला गिरीदूर्ग या प्रकारात मोडतो.किल्ल्याची डोंगररांग सह्याद्रीची उपरांग आहे.वडूजच्या दक्षिणेकडे साधारण पंचविस तीस कि.मी. वर भुषणगडहा किल्लाआहे.भुषणगडकिल्ल्याच्या पायथ्याशीच भुषणगडनावाचे छोटेसे गाव आहे. या गावात येण्यासाठी चारही बाजूने रस्तेआहेत. गडाची गडदेवता हरणाई माता ही अनेकांच्या श्रद्धास्थानी आहे.

 भुषणगडगावातून किल्ल्याकडे निघाल्यावर आपल्या स्वागताला एक कमान उभी केलेली आहे.

येथूनच गडावर जाणाऱ्या पायऱ्यांचा मार्ग नव्यानेच बांधून काढला आहे. आम्ही (मी, भूषण दादा, शैलेश आणी गणेश मारणे-पाटील … सकाळी ५ वाजता पुण्याहून निघालो … २ तासात आम्ही औंधच्या डोंगरावर पोहचलो … “आमी यमाई” चे दर्शन घेऊन किल्ले भुषणगड कडे निघालो… अतिशय सुंदर असे वातावरण होते … बारीक पाऊस सुरु होता … थंड वारे वाहत होते … दादान बिर्याणी आणली होती … गाडीत बसून आम्ही बिर्याणी खाल्ली …. बाजूलाच एक दुकान होते …  चहा आहे का विचारले… ते म्हणाले वरती जाऊन या तोपर्यंत बनवतो …. 

 

अंदाजे ३००-३५० पायऱ्या असतील … खच्चून २० मिनिटे लागतात वरती जायला … लहानगा गड आहे … वरती हरणाई देवीचे मंदिर आहे .. औंधच्या यमाई देवीची हरणाई देवी ही बहिण. लगेचच महादरवाजा लागतो … महादरवाज्याची परिस्थिती आजच्या भारत देश्याप्रमाणे अतिशय दैनीय आहे.

इथून पुढे जाऊन डावीकडे जायचे आहे जिथून तुम्ही हरणाई मंदिराकडे जाल … जाताना गडाची तटबंदी दिसेल…

हरणाई देवीचे दर्शन घेऊन गडावर फिरून आम्ही खाली उतरलो …. चहा घेतला आणी आम्ही सदाशिव गडाकडे जाण्यास निघालो…..

जाता जाता एक आकर्षक व्याक्तीम्ह्त्व दिसलं … ती होती एक म्हैस … पर्सन्यालिटी असावी तर अशी… झक मरत लोकांनी थांबून फोटो घेतले पाहिजेत

सदाशिवगड:
किल्ले सदाशिवगडचा डोंगर सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडपासून ६ कि.मी.वर आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे ३०५० फूट आहे. पायथ्याशी असलेल्या ओगलेवाडी (हजारमाची) या गावातून या डोंगरावर जाता येते. संपूर्ण रस्ता पायऱ्यांचा असून सुमारे ९२३ पायऱ्या आहेत.

सदाशिवगडचा डोंगर अफझल खानाच्या वधानंतर (१० नोव्हेम्बर १६५९ ) छत्रपती शिवाजीच्या ताब्यात आला. कऱ्हाडवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने व कराडहून पलूस-विटा कडे जाणाऱ्या सुर्ली घाटावर नियंत्रण ठेवण्याच्या सोयीसाठी शिवाजीने सदाशिवगड बांधून काढला.

सध्या गडावर महादेवाचे प्रशस्त मंदिर आहे,तिथे भाविकांचा नेहमी राबता असतो.समोर एक आड(चौकोनी विहीर) असून त्यात १२ महिने पाणी असते. शेजारीच मारुतीचे छोटेसे देऊळ आहे. बाकी गडावर किल्ल्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत.

भुषणगड झाला … मग आम्ही सदाशिव गडाकडे निघालो …ओगलेवाडीच्या पुढेच सदाशिवगड उभा आहे .. पायथ्याला गेलो … कडक उन पडले होते … आणि पुढे अंगावर येणारा गड .. आणि त्या भयानक पायऱ्या …

मनाची तयारी झाली होती…. जाम लागणार आहे हे माहित झाले .. कारण एकतर अतिशय कडक उन होत आणि ९२३ पायऱ्या…

मग काय … बिगीबिगी पायऱ्या चढायला सुरवात झाली .. हातात कॅमेरा होता …. फोटो काढत आपलं पायऱ्या चढत होतो….


दीड तासाने आम्ही वरती पोहचलो … वरती जाताच डाव्या बाजूला एक छोटा तलाव आहे … आणि सरळ गेला की मंदीर आहे …. जसे मंदिरात गेलो तसे सगळे १० मिनिटे शांत बसले उन्हाने हैराण झालो होतो सगळे …

मच्छिंद्रगड:

छत्रपती शिवाजी महाराजांनी मच्छिंद्रगडाची उभारणी केली,पुढे इ.स. १६९३ मध्ये हा गड मोगलांच्या ताब्यात होता त्यावेळी याचा किल्लेदार होता देवीसिंग.१२ नोव्हेंबर १६९३ रोजी औरंगजेब तख्त्तेखांवर बसून मच्छिंद्रगडाजवळ पोहोचला,तेव्हा मच्छिंद्रगडाचा किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला,त्यावेळी औरंगजेबाने गडावरील तोफा उडवून देण्याचा हुकूम दिला व येथून पुढे तो वसंतगडास गेला.औरंगजेबाच्या म्रुत्यूनंतर हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला.पुढे इ.स.१८१८ मध्ये कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड जिंकून घेतला.
या गडावर जाताना आम्हाला माहित होते की गाडी एकदम वरती जाते पण .. दुर्दैव … आमची गाडी नाही जाऊ शकली.. आणि इथेही ८००-९०० पायऱ्या चढाया लागल्या त्याही अतिशय कडक उन्हात …. गाडी वरती घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न केला पण … अपयशी ठरला ..


गाडी परत वळवून आम्ही पायऱ्यांचा रोड धरला … तिथे गावकऱ्यांच एक वेगळच लफड चालू होत  … त्याकटर च्या टाकीतून पाणी हौदात सोडायचे काम … काय करता त्यांचा मेळ बसत नव्हता … आम्ही म्हणलं पहिला खाऊन घ्याव …. काही केल्या पाणी काय नीट हौदात येत नव्हत … लय भारी पात्र होती तीत … त्यातला एक म्हणजे सोन्या … नुसता वरडणार … काय गंमत होती म्हणता … जो तो एक निराळच डोक लावणार आणि कार्यक्रम फसला की एकमेकांना आया भनी वरण शिव्या … आम्ही आपलं जेवण करत हा खेळ पाहत होतो … जेवण करून आम्हीही त्या कार्यक्रमात भाग घेतला … आणि काही वेळान पाणी हौदात पडू लागले .. 


इथ पण पायऱ्या … पायऱ्या चढण्याचा वैताग हा प्रत्येक ट्रेकला आहे … आणि जर कडक उन असेल टर मग काय बोलूच नका…. रक्ताच्या उलट्याच झाल्या पाहिजेत … दादा आणि शैल्या पुढे मी आणि गण्या मागे … एका ठिकाणी टर वाटलं आता चक्कर येऊन पडतंय का काय …  त्यात फोटो काढायची हौस…..


शेवटी एकदाच गडावर पोहचलो … श्रावण महिना असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती … बरेच जन महादेवाच्या दर्शनासाठी आले होते.. आम्ही आपलं पहिला गपगार झाडाखाली बसलो… तिसरा गड होता …  डोळे फिरत होते राव…. गण्या बिचार माझ्या मांडीवर गपगार पडल होत….


दर्शन घेतले … गडावर इकडे तिकडे फिरलो आणि परतीचा प्रवास सुरु … पायऱ्या उतरताना सगळे जन एका दमात खाली आले…. मी आणि शैल्या थोड्यावेळासाठी झाडाखाली शहीद झालो….

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “भुषणगड – सदाशिवगड – मच्छिंद्रगडAdd yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *