२२ जून २०१३ … मान्सूनचे आगमन झाले .. डोंगर-किल्ले फिरायचे दिवस आले .. मग आम्ही ठरवले मी आणि राकेश दोघांनी बसून आराखडा आखला ७-८ ट्रेक ठरवले .. आणि सुरवात आमच्या लाडक्या किल्ल्यापासून करायची ठरवले … तो किल्ला म्हणजे ..
“गडांचा राजा आणि राजांचा गड : रायगड “
शनिवारचा दिवस, आम्ही पुण्याहून निघालो…. फिरत फिरत आम्ही पाचाड गावात गेलो .. तिथे आम्ही जिजाबाईंचा वाडा पहिला … तिथून मग सरळ गडाच्या पायथ्याला … गाडी लावली आणि किल्ला चढाया सुरवात केली… वरती जाऊन किल्ला फिरून आम्ही ५ वाजता परत गाडीजवळ आलो… तिथून मग आम्ही ठरवल्याप्रमाणे शिवथरघळला जायचे ठरले …. मुंबई-गोवा हायवेवर थोडे अंतर गेल्यावर डावीकडे रोड जातो जो व्हरांडा घाटात जातो…. थोड्या अंतरावर मुख्य रस्ता सोडून डावीकडे जावे लागते … एकदम सामसूम रस्ता … आजूबाजूला डोंगर, हिरव्यागार निसर्गाचे अप्रतिम दर्शन होत होते. थोड्यावेळाने ढालकाठी गावाजवळ पोहोचलो आणि समोर एका अप्रतिम धबधब्याचे दर्शन झाले. पण तिथे जास्त वेळ घालवून चालणार नव्हता, लगेच आम्ही पुढे मार्गस्थ झालो. वाटेत दिसणारया ,सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा,त्यांच्या अंगा खांद्यावर खेळणारे असंख्य छोटे –मोठे धबधबे, सृष्टीने पांघरलेला हिरवा शालू सर्व काही अवर्णनीय होते.
आम्ही रात्री उशिरा पोहचलो … सरळ आश्रमात गेलो तिथे एक बाबा होते त्यांनी आम्हाला झोपायची जागा दाखवली… आम्ही लगेच झोपी गेलो… सकाळी ५ वाजता घंटा वाजू लागली … सगळेजण उठले … आम्ही ही उठलो… आंघोळ-पाणी आवरून आरतीला उभे राहिलो…
समर्थांच्या जीवनात घळींना फार महत्व आहे. आपल्या जीवनातला बराचसा काळ समर्थांनी ह्या घळींमध्ये व्यतीत केला आहे. समर्थ संप्रदायामध्ये या घळींना विशेष महत्व आहे.
मनुष्य सरपटत, रांगत किंवा उभा राहून आतमध्ये जाऊ शकेल असे जमिनीतील किंवा डोंगरातील एक नैसर्गिक विवर म्हणजे घळ. घळ म्हणजे नैसर्गिक गुहा किंवा गुंफा.
सकाळी आश्रमातील बाबांनी आम्हाला सांगितल … ४० मिनिटाचा रस्ता आहे पण डोंगर चढून जायचे आहे… वरती गेला की तुम्हाला चंद्रराव मोरेंच्या वाद्याचे अवशेष बघायला मिळतील… खूप निसर्गमय परिसर आहे .. जाऊन या….
माहिती मिळाली की अवशेष नाहीत पण जिथे वाडा होता ती जागा तुम्हाला पाहायला मिळेल…. १ तास भर चढती होती … गेलो तर चारी बाजूला भले मोठे पर्वत आणी धबधबे … सह्याद्री कसा आणी कुठे कुठे पसरला आहे याचा काही अंदाज येत नाही अशी जागा होती ती….
आम्ही मग डोंगर चढायला सुरवात केली….
ज्यावेळी आम्ही डोंगर चढत होतो, त्यावेळी सारखा एक विचार येत होता, एवढ्या उंचीवर राजवाडा कसा असेल ?? समांतर जागा असेल का ? का पठार असेल वरती …. कारण खूपच उंच डोंगर होता त्यमुळे बरेच विचार येत होते, कारण सह्याद्री एवढा फिरल्यावर नेमका सह्याद्री कसा पसरला आहे याचा नेम लागत नाही …
तासाभरात आम्ही वरती पोचलो … विश्वास बसणार नाही असा तो सह्याद्रीचा भाग होता … एवढ्या उंचीवर गेलो तरी, तिथून अजून वरती महा भयानक डोंगर रांगा आणि त्यांच्या खांद्यावरून वाहणारे भव्य धबधबे ….. अक्षरशा ५ मिनिट शांतच झालो आणि फ़क़्त जे पुढे दिसत होते ते पाहत होतो …. त्यावेळी ठरवले सह्याद्री समजून घेनायचा प्रयत्न करू नका … जो पुढे दिसतो तो फ़क़्त बघतच रहा ..
पुढे जाऊन जावळीच्या मोरयाच्या वाड्याचे अवशेष पाहत होतो …. तिथेच बसून आम्ही आजूबाजूचा निसर्ग पाहत होतो …. तिथे बस्ल्य्व्र समजले बघा … “सह्याद्रीच्या कुशीत बसने म्हणजे काय असते”… माझ्या आयुष्यातला एक अतिशय सुंदर आणि मन भरून टाकणारा तो प्रसंग होता … शब्दात सांगणे कठीण आहे … मला जो भेटेल त्याला मी सांगत असतो कि बाबा नक्की ती जागा एकदा बघून ये …….
0 comments on “शिवथरघळ” Add yours →