सांधण व्हॅली :
ट्रेकचा दिवस : २६ जानेवारी २०१३
पहिला मी विचारले, काय आहे हे ?? कारण कधी जाण्याचा संबंध नव्हता त्यामुळे सह्याद्रीची अशी जास्त कल्पना नव्हती … म्हणल येतो … जाऊ … राकेशने हा ट्रेक प्लान केला होता अंदाजे १५ जन होतो मोठी गाडी केली होती … २६ जानेवारी २०१३ ला सकाळी ३ वाजता आम्ही निघलो.
प्रवास खूपच लांबचा होता आणि ती गाडी…. पाट दुखणार माहित होते …
नारायणगाव … संगमनेर मार्गे … घाटघर Dam … मग साम्रद गाव जिथून ट्रेक सुरु होणार होता .. सकाळी ८ वाजता आम्ही पोहचलो, चहा-पान केला, २६ जानेवारीचा दिवस त्यामुळे शाळेत बरेच कार्यक्रम सुरु होते .. मुल मस्त तयार होऊन आली होती … बालपणीचे दिवस आठवले…
‘सांधण व्हॅली ‘ला ” द व्हॅली ऑफ शॅडो” म्हणून देखील संबोधतात. अधून-मधुन अरुंद ठिकाणी डोकावणारी उन्हाची तिरीप अंगावर झेलत, दगडधोंडे पार करत आपण छोट्या आणि रुंद अश्या ओढ्यापाशी येऊन थबकत, तो पार करताना अगदी छाती पर्यंत पाणी असल्यमुळे बॅगा डोक्यावर घेणयावाचून गत्यंतर नाही.
ग्रुपनी असलो की सामान कुठेतरी खडगावर ठेवायचं आणि मनमुराद पोहण्याचा देखील आनंद घ्यायचा. तो पार केल्यावर मग पुन्हा एकदा खडगावरुन चालण्याचा थ्रील सुरू होतो. मधून मधून असे ओढे आणि लहानसे धबधबे आपल्यासाठी नित्याचेच होउन जातात आणि याचं पाणी देखील मधूर आणि शध्द.म्हणजे पाण्याच्या बाटल्या संपल्या आणि तहान लागली की या पाण्याची साथी आहेच ती अगदी दरी पार करे पर्यंत. त्यानंतरचा मार्ग हा लाहान-मोठे खडग पार करून किंवा साठलेल्या पाण्यातून वाट काढत जाण्याचा असा आहे.दरी जशी रुंद होत जाते तसा तीचा उतारदेखील वाढतच जातो. म्हणजे मग डोंगरकडय़ाजवळ आलो असे समजावे.
आयुष्यातला पहिला ट्रेक आणि त्यामध्ये राप्लिंग …. भीती तर वाटत होती कारण आयुष्यात पहिल्यांदा हा प्रकार करत होतो … पण जमले आणि खाली उतरलो …०फुटाहुन थेट खाली येणं केवळ एका दोरखंडाच्या सहाय्याने आणि निर्धास्तपणे हा निश्चितच एक ‘रॅपफुल’ अनुभव आहे. हा पॅच पार केल्यावर व थोडं चालल्यावर ४० फुटाचा दुसर्या पॅचसाठी आपण सज्ज होतो. मग अनुक्रमे १२ आणि १५ फुटाचे असे दोन पॅचेस पार करावे लागतात. मग मधुनच येणारा मोठा ओढा पार करुन झाला की नंतरची पायवाट साधी-सरळ पण ओभड-धोबड व छोट्याश्या उतार्यानी युक्त असून ती पार करत आपण फोटोग्राफीचा पण आनंद लुटू शकतो.
सांधणव्हॅली चा ट्रेक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी हमखास घ्यावी ती म्हणजे, अनुभवी ग्रुपसोबतच इथे जावे.गरज असल्यास एखाद्या गावकर्याला सोबत घ्यावे. खडगं, पाणी व जंगलातून वाट काढावी लागत असल्यामुळे, अनेकदा सरपटणार्या प्राण्यांशी गाठभेट होते, मग पायाच्या संरक्षासाठी म्हणून चांगले बुट घालणे व कपड्याची एखादी जोडी सोबत असणे अत्यावश्यकच आहे. धाडस म्हणून चुकून देखील एकट्याने जाणे टाळावे. तसंच दरी पार करताना रात्र झाल्यास रहाण्याची सोय तिथेच होऊ शकते, म्हणून त्यासाठी तंबूंची व्यवस्था आपल्यासोबत असलेली बरी. जेवण्याची सोय देखील असू द्यावी. पाण्याचा प्रवाह असल्यामुळे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची योग्य ती खबरदारी घ्यावी. गावकर्यांना आगाऊ सूचना दिल्यास खाण्याची व्यवस्था होते. पण तयार जेवण सोबत देखील न्यायलाच हवं.
0 comments on “सांधण व्हॅली” Add yours →