दगडांच्या खाचेतून निघणारी वाट पार करून आम्ही किल्ल्यावर पोहचलो, धुक लय होत, बारीक झिरमाट बी चालू होत, वर तर विचारू नका, वाटत होत वार नेतय खाली आता.
वर गेलो, तर गडाचा मुख्य भाग दिसला, २-३ पाण्याच्या टाक्या, हनुमानाचे मंदिर, महादेवाची पिंड आणि बाजूला नंदी, सिंदूर फासून पूर्ण लाल करून टाकल्यात मुर्त्या, पण हलक्या धुक्यात त्या खूपच सुंदर दिसत होत्या. गडाला पठार पण, म्हणावं तस मोठ लाभलेलं नाही, अगदी २ तासात पूर्ण किल्ला पाहून होईल. पाण्याच्या टाक्या बर्याच आहेत पण सगळ्यात पिण्याजोगे पाणी नाही.
पाऊस आणि धुक आसल्यान, कॅमेरा काय बाहेर काढता आला नाही म्हणून सगळे फोटो मोबाईलनेच घेतले. मस्त वातावरण होत, भरपूर वार, आणि त्यात पक्षी शिट्या वाजवत होता आस वाटायचं कोणी तरी आहे आजू-बाजूला त्या भावांच नाव Indian whistling thrush ,विशल्या तर जाम प्रेमात पडला याच्या आवाजाच्या, असा एखादा पक्षी घरी असावा असे म्हणत होता, म्हणल चल जास्त विचार नको करू …. :):)
गडावर फ़क़्त आम्ही ५ लोक, राहायचं ठिकाण लवकर गाठायचं होत, आमचे हेर गडबड करत होते, बाजूला एका पाण्याच्या टाकीत साप होता, गडी न हालता पडला होता, वाटल मेला असेल पण नंतर ज्यावेळी हेर आणि विशल्या पाणी आणायला गेले त्यावेळी त्यांनी काठीण त्याला हलवला तर सर्र करून भाऊ निघून गेला.
गमती-जमती करत पुढे चालत आम्ही गेलो तर मस्त एक खोली होती, अगदी जबरी खोली, दगडाचे भरीव बांधकाम बाहेरून एकदम छोटी वाटते पण आत गेल्यावर समजले आत किचन पण आहे :). खोलीत जाण्यासाठी एक अतिशय छोटी खिडकी आहे.
चालून चालून पाय जाम झालेले असतात आणि त्यात एकदम वाकून आत जायला लागत, पहिला आम्ही विश्ल्याला जा म्हणल तर नाय म्हणला तुमी जावा मी बाहेर थांबतो उगाच रिस्क नको, खरतर फाटली होती आत जायला हे सांगत नव्हता विशल्या …..
बिगी-बिगी आपल सगळे आत गेलो, सगळीकड नजर टाकली, २-३ पाली होत्या फ़क़्त आणि बर्यापैकी समान होते, कोणीतरी साधू महाराज किवा पुजारी राहत असावेत तिथे. आमची कापड वल्ली झाली होती, ब्यागा एका बाजूला सारून कापड बदलली.
हेर आणि जगतगुरू पाहुण्यांना सोडायला आणि पाण्याची व्यवस्था लावायला बाहेर गेले तोपर्यंत मी, बोका आणि हसरे मांजर तिघांनी मिळून खोली झाडून काढली आणि चूल पेटवायचा प्रय्त्न सुरु केला, काही केल्या पेटत नव्हती दांडगी कसरत केली आणि शेवटी कशीबशी पेटली, पण नाटक असे झाले, जाम धूर झाला आणि धूर बाहेर जायला वाटच नाय हो … खुली एकदम प्याक … असला धूर झाला ….. काय बोलू नका … नाकातली केस जाळली त्या धुराने, डोळ्याची वाट लावली …. मग आम्ही पाणी वाटून चूल इजवली. मग आपल शांत बसून फोटो बघता बसलो, गप्पा रंगल्या. लयच interesting गप्पा चालू होत्या.
बाहेर एकदम थंड हवा आणि आत खोलीत एकदम उबदार .. थोड्या वेळानं मला तर गरम व्हाय लागल, आणि बाहीर गेल की वाऱ्यान उडून जातंय आस वाटायचं …. खायचं गटूळ उगड्ल आणि हादडायला सुरु केल … खाल्ल्यावर डोळ जड व्हाय लागल …. आमचा विशल्या सगळे कसे आणि कुठ झोप्त्यात याची वाट बघत होता आणि जश्या आमी जागा फायनल केल्या तसा माझ्या आणि हेरांच्या मध्ये घुसला … एक नंबर भेत्र हाय गाबड
सगळी आगदी मेल्यासारखी पडली होती …. मी आजपर्यंत आमचे हेरच भयानक दहाड देत झोपताना बघितल होत (ट्रेकिंग मधल्या गोतावळ्यात) .. पण हा विशल्या … आय आय आय आय …. रेड्या सारख घोरत होत राव. मधी तर मी दोनदा त्याच्या डोस्क्यात रपाटा हाणला पण तात्पुर्त बंद व्हायचं आणि परत सुरु … आस वाटत होत उचलून बाहीर फिकून द्याव पण आपलच की शेवटी गप सोसला रताळ्याला.
सकाळी लवकर उठून जायचं होत आणि हे काय झोपू देत नव्हत. शेवटी बुद्धी आणि शरीराने हार मानली आणि शरण गेलो.
रात्री झोपताना एक मनाशी आशा बाळगून झोपलो की सकाळी वातावरण क्लेअर हुइल आणि चांगले फोटो मिळतील पण कुठल काय, हाय आस राव ….
सकाळ-सकाळी गडावर गारद झाली (मोबाईलचा गजर) , महाराजांच्या गारदेने डोळे उघडले मस्त वाटत होते, ५-१० मिनिटात सगळे उठले, मी आणि विशल्या सर्वप्रथम पाहुणे सोडण्यास गेलो, नंतर उंच बोका आणि हसरे मांजर गेले आणि शेवटी हेर एकटाच गेला
______________________________________________________________________
सर्व काही आवारा-आवर करून आम्ही गड उतरायला सुरवात केली, पायर्या उतरताना काळजी पूर्वक उतरणे गरजेचे आहे कारण वार खूप असत आणि पावसाळ्यात पाण्यामुळे पाय घसरू शकतो … काळजी घेत एकमेकांना हात देत आम्ही खाली आलो ….
खाली येतानाच आम्ही भास्करगडला जायचे क्यान्सल केले आणि अंजनेरीला जायचे ठरवले आणि जर वेळ मिळाला तर रामशेज.
खरतर उत्सुकता होती अंजनेरी किल्ला पहायची कारण हा किल्ला म्हणजे हनुमान देवाचे जन्मस्थान आणि आपल्या मराठी राज्यात आहे, आणि किल्ल्याच्या अगदी जवळच होतो. म्हणून आम्ही अंजनेरीला जायचे ठरवले.
२ तासात आम्ही गाडीजवळ आलो,खाली येताना जास्त पाऊस नव्हता म्हणून काही कपडे वल्ले झाले नव्हते, ब्यागा कोब्म्ल्या आणि गाडी सरळ अंजनेरीकडे वळवली…..
क्रमश: …..
0 comments on “हरिहरगड – अंजनेरीगड : भाग २” Add yours →