इतिहास आणि माहिती :
सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यामध्ये धार्मिक, नैसर्गिक व ऐतिहासिक स्थळे लोकांची श्रद्धास्थाने आहेत. दुष्काळी तालुका असूनही इथली पर्यटन ठिकाणे एक दिवसाचे पिकनिक स्पॉट बनली आहेत. मात्र त्यांना विकासाची आवश्यकता आहे. तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावानजीक असलेला दंडोबा डोंगर हा नेहमीच विकासापासून दुर्लक्षित राहिला आहे.
पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुमारे 1150 हेक्टरवर पसरलेल्या डोंगरावर पुरातन दंडनाथाचे मंदिर असून सुमारे शंभर ते सव्वाशे फूट पोखरून तयार केलेल्या गुहेतच नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे.प्रदक्षिणा घालण्यासाठी अतिशय सुरेख पद्धतीने रस्तादेखील असून पुरातन काळातील चित्रे आता कालौघाने पुसट झाली आहेत.
डोंगरावर सुमारे तीनशे वर्षापूर्वीचे शिखर आजही सुस्थितीत इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभे आहे. डोंगरावर विविध मंदिरेही असून एक दिवसाच्या सहलीसाठी येणार्यांची संख्याही खूप आहे. परंतु डोंगराचा `क’ वर्गात समावेश होऊनसुद्धा डोंगराचा विकास झाला नाही.
(वरील माहिती मला इंटरनेट वरून मिळाली आहे )
दिलेल्या फोटोमध्ये तुम्ही शिखर पाहू शकता, पुजारी आणि देवस्थानच्या मते हे मंदिराचे शिखर आहे पण याची रचना पहिली तर हे लक्ष्यात येते कि याची रचना अश्या पद्धतीने केली आहे कि याचा उपयोग “Watch Tower” म्हणूनही करता यावा. अतिशय मजबूत आणि देखणे बांधकाम आहे, याला रंगकाम केले आहे पण बिना रंगकामाचे याचे सौंदर्य काय असेल याची आपण कल्पना करू शकतो. एकूण पाच माजली हे शिखर असून, सर्वात वरचा भाग जो आहे तिथे ४-५ माणस उभी राहू शकतील एवढी जागा आहे. पहिल्या टप्प्यावर जायला पायर्या आहेत पण तिथून पुढे वरती जायला मानवनिर्मित पायर्या नाहीत, सध्या तिथे एक दगड आहे ज्याचा उपयोग करून वरती जाता येते, चौथ्या टप्प्यावर वरती जाण्यासाठी पायर्या काढल्या आहेत, एका वेळी एक माणूस जाईल एवढीच जागा आहे. वरती गेल्यावर आजूबाजूचा अंदाजे ६०-७० किलोमीटर चा भाग पाहू शकता.
स्थानिक लोकांच्या मते जर वातावरण चांगले असेल म्हणजे धुके वगैरे नसेल तर इथे उभारल्यावर विजापूरच्या गोल-घुमटाचे शिखर दिसते.
दंडोबाचा डोंगर एक उंचीवरचे देवस्थान असून इथे कोणताही किल्ला नाही, बाजूलाच (अंदाजे ४-५ किलोमीटरवर) जुना-पन्हाळा नावाचा किल्ला आहे. पण इथे किल्ला नसल्यामुळे या शिखराचे बांधकाम नेमके कोणत्या हेतूने आणि कोणाच्या काळात झाले आहे याचे संदर्भ कुठेही उपलब्द नाहीत. माझ्या माहितीनुसार आणि अभ्यासानुसार हे नक्कीच शिवाजी महाराजांच्या काळातले नसावे, कारण बांधकामाची शैली पाहून आपण हे सांगू शकतो आणि हा भाग जास्त काळ आदिलशहाच्या राज्यामध्ये होता. शिवाजी महाराजांनी हे बांधले असते तर एखादा छोटासा का होईना किल्ला नक्कीच बांधला असता.
सह्याद्रीच्या पोटात काय-काय दडले आहे, हे एक गजब रहस्यच आहे. याचा एक नमुना म्हणजे दंडोबाचा डोंगर पुणे-मुंबई भागातले ट्रेकर्स बहुदा जास्त न गेलेला हा भाग आहे आणि आभ्यासापासूनपन वंचित राहिलेला हा प्रदेश आहे. नक्कीच कोणता ना कोणता दांडगा इतिहास या शिखरामध्ये लपला आहे जो बाहेर काढणे आवश्यक आहे. डोंगरावर अगदी मंदिरापर्यंत गाडी जाते, वाटेत तुमच्या स्वागतासाठी भरपूर मोर गाणी म्हणत उभे असतात.
दुर्दैव :
दंडोबा वनक्षेत्रात प्रेमीयुगुलांचा वावर वाढल्यामुळे तेथे छुपके-छुपके प्रेमाचा गैरफायदा घेण्यासाठी लुटारुंची टोळी सक्रिय झाली आहे. निर्जन ठिकाणी प्रेमीयुगुलांना गाठायचे आणि त्यांना प्रथम मारहाण करायची, लपून-छपून सुरू असणारा प्रेमग्रंथ उघड करण्याबरोबर जिवे मारण्याची धमकी देऊन दोघांच्या अंगावर असणारे सोने काढून घ्यायचे. प्रतिकार करणाऱ्या प्रेमीयुगुलास बेदम चोप देण्यापर्यंत टोळीची मजल गेली आहे.
आतापर्यंत आठ ते दहा जोडप्यांना मारहाण व लुबाडणूक झाली आहे. मात्र प्रेमासाठी त्यांनी कोठेही वाच्यता केली नाही. लुटारू टोळीमुळे वनक्षेत्रातील निर्जन ठिकाणी अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी वनक्षेत्रात चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांवर कारवाईची मोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे.
२०१३ साली हि बातमी सकाळ वर्तमानपत्रात आली होती.
0 comments on “दंडोबा डोंगर … लपलेला इतिहास !!” Add yours →