DSC_0322

दिल्ली दरवाज्याच्या मुलुखात – भाग २

दिल्ली दरवाज्याच्या मुलुखात – भाग २
—————————————–

अलंकारिक शब्दांचा बाजार मांडून अतिशोक्ती करण्याची कला माझ्यात नाही, पण एक बात नक्कीच, मला कधीच वाटले नव्हते कि एवढ्या जबराट लेणीत कधी मुक्काम करायचा योग येईल, हि लेणी म्हणजे खरच, वांड विषय आहे. एकदा तरी मुक्काम करावाच या लेणीमध्ये.

सकाळ झाली, साडेपाचचा गजर झाला तो ही महराजांच्या गारदेने, सगळे पटा-पट उठू लागले, अनिल भाऊंना ते गान खूप आवडले, लगेच पाठवा म्हणून मागे लागले. सगळे एकदम उठायच्या आगोदर मी आपला बाटली घेवून निसटलो, नायतर नंतर बाटलीसाठी थांबावं लागणार.

तंबूतन सर एलियन शिव्या देत उठले, त्याची कारण म्हणजे जगतगुरू, काय घोरत होता तो माणूस, तंबूत झोपलेले सगळे लय वैतागले होते, आणि त्यात लेणीत आवाज घुमायचा, मग तुम्ही समजू शकता. बोम्ब्ल्या फकीरचा विक्रम मोडून काढत, जगतगुरूनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला, या  छळाला कंटाळून, जगतगुरूना पुढचे दोन दिवस तंबूत जागा न देण्याचा निर्णय सर एलीयन यांनी घेतला.

सकाळची आवरा-आवर सुरु झाली ….

IMG_20150815_064701

वैशागड

आजूबाजूला साफसफाई करून, चूल बाजूला करून उरलेली लाकड बाजूला ठेवून …. आम्ही तिथून काढता पाय घेतला, आर्ध्या तासाच्या अंतरावर वैशागड होता, पायऱ्या चढत असताना खूपच सुंदर देखावा पुढे दिसत होता, पुढे जात असताना लेणी वळून वळून बघायचा मोह आवरत नव्हता, पूर्ण एक रात्र तिथे होतो, तिथे झोपलो, तरीही मागे ओळून पाहत होतो, त्याकाळची माणसं आपल्यापेक्ष्या खरच किती प्रगत आणि कार्यक्षम होती याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही लेणी. ढगांनी तर असा डाव मांडला होता कि इचारू नका, जाता-जाता मोबईल ने १-२ फोटो काढले.

IMG_20150815_070835_HDR-01

लांबून दिसणारी त्याची तटबंदी आणि बुरुज किल्ल्याची भव्यता सांगत होते. किल्ल्याच नावही आम्हाला माहित नव्हते मग इतिहासतर दूरची बात, पण झालेल्या चर्चेवरून बरीच काही माहिती मिळाली. मुघल बांधकामाची शैली खरच आजही अभ्यासाचा विषय आहे, त्यांची कल्पना, बांधकामातील बारकावे, त्याचबरोबर भव्यता.

गडाच्या वाटेवर असताना डाव्या बाजूला डोंगर रांगा आणि झाडी होती, ढगांनी मांडलेला बाजार, खोलवर जमीन आणि पुढे गड…. ते म्हणतात ना “Happiness Is” … तसेच काही होते सगळे … पुढेच एक भाऊ आपल्या मुलाला घेवून बसले होते सर एलियननी लगेच त्यांचा फोटो काढला.

DSC_0213

DSC_0228

DSC_0230

आम्ही गडाच्या मागच्या बाजूने जात होतो, समोरच मोठा बुरुज आहे ज्याच्या बाजूच्या तटबंदीचा काही भाग पडला आहे किंवा पाडला असावा. एकूण गावातील माणसं आणि त्याची गुर-ढोर पाहून त्यांनीच गुरांना चारा मिळवण्यासाठी हा पराक्रम केला असावा, आणि दुसऱ्या गावात जाण्यासाठी ते याच रस्त्याचा वापर करतात, जंगलात लाकूड तोडून त्यांची घारोपयोगी वस्तू आणि शेतीची अवजारे बनवून विकणे हा त्यांचा व्यवसाय आहे. बुरुजाच्या पुढेच एक भली मोठी तोफ होती, बेवारस अशी रानात पडून आहे ती तोफ.

IMG_20150815_080746_HDR

१५ ऑगस्टचा दिवस होता, आम्ही गडावर … ब्यागेत तिरंगा आणि भगवा … त्यामुळे स्वतंत्र दिवस गडावर साजरा होणारच होता, आमची काही मंडळी बुरुजावर तयारी करत होते, सर एलियन फोटो काढत होते. सगळेजण जमा होवून एकत्रित राष्ट्रगीत गावून ध्वजवंदना दिली. फारच अभिमान वाटत होता, पहिल्यांदाच स्वतंत्र दिवस असा साजरा करत होतो. एका भव्य बुरुजावर उभारून या आपल्या भव्य देशाचे राष्ट्रगीत गाणे म्हणजे फारच अभिमानाची गोष्ट हो.

DSC_0240

गडाला फार मोठे पठार लाभले आहे, याचबरोबर पाठीमागच्या बाजूला नैसर्गिक कडा लाभली आहे, त्यामुळे पाठीमागे तटबंदी नाही आहे, परंतु पुढील बाजूस जी तटबंदी आहे ती अतिशय जबरदस्त आणि चांगल्या स्थितीत आहे. पूर्ण गड पाहण्यास वेळ लागणार हे माहितच होते, म्हणून आम्ही सगळे बुरुजावरून निघालो ….

DSC_0244

गडाच बांधकाम लयच विस्तारित आहे, तटबंदी, बालेकिल्ला, मुख्य्दरवाजा अशी अनेक बांधकामे आजही चांगल्या स्थितीत आहेत, थोडे पुढे जावून उजव्या हाताला पाहिले की दोन भव्य बुरुजांनी वेढलेला भव्य असा महादरवाजा दिसतो.

DSC_0261

आम्ही १० जन होतो, मागेपुढे होत होतो, फोटो काढणे, किल्ल्यात नक्की अजून काय काय आहे हे पाहणे, छोट्या मोठ्या खोल्या, जुनी काही अवशेष. नक्की काय आहे हे समजत नव्हते त्यामुळे तर्क-वितर्क चालू होते. औरंगाबाद इलाख्यात एक बात नक्की, गडावरून दिसणारे देखावे आणि किल्ल्यांचे मजबूत बांधकाम आणि आजही चांगल्या स्थितीत हे बांधकाम पहायला मिळते.

DSC_0291

पूर्ण किल्ला पाहून आता पुढे जायची वेळ होती, बर्यापैकी वेळ झाला होता, पुढचा किल्ला “वेताळवाडीचा” होता, Ertiga वाले पुढे गेले होते अल्टो वाले मागे होते, चालत असताना विश्ल्याने फकिराला फोन लावून गाडीचे इंजिन down झाले आहे, मदत पाठवा असले बोलत होता, थोड्या वेळासाठी फकिराला खरच वाटले. २० मिनिटात गाडीजवळ आलो, गावातली बरीच माणसं बाहेर होती, आमच्याकड बघत होती, आवरा-आवर करून आम्ही गाव सोडले, रामराम देण्यासाठी गावातली बरीच मंडळी आली होती.


वेताळवाडीचा किल्ला

आलेल्या वाटेने परत जायचे होते, जंजाळा गावातून वेताळवाडीच्या किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग:

जंजाळा –> नानेगाव –> अंबाई –> उडणगाव –> हळदा –> हळदाघाट

हळदाघाटेतून पुढी गेले की किल्ला दिसतो, आम्ही मार्गाला लागलो, वाटेतच एक प्राचीन वटेश्वराचे मंदिर होते, जाताना पहायचे असे ठरले होते म्हणून सगळे मंदिरात गेलो, भरपूर वीरघळी, जुन्या प्राचीन मुर्त्या, समोरच एक जुनी विहीर. सुंदर मंदिर होते. पुढेच विहीर होती, मी आपल सहज मनोज भौना म्हणले,

आंघोळ घ्यायची का करून ? ….. मग काय सगळी तयार झाले,

आंघोळ झाली, सगळे एकदम ताजेतवाने झाले, आंघोळीच्या अद्दी सगळे म्हणत होते, नको राहूदे आंघोळ… उशिरा होईल …. पण आंघोळ केल्यावर सगळे म्हणले बर झाल राव आंघोळ केली … लय फ्रेश वाटतय

IMG_20150815_112845_HDR

IMG_20150815_111325_HDR

आंघोळ पाणी करून मंदिराला रामराम ठोकला, हळदाघाट मार्गे किल्ल्याकडे जायचे होते ४० मिनिटात आम्हाला किल्लायचे दर्शन झाले.

DSC_0297

लांबून एक अंदाज येतच होता, राजस्थान मधील किल्ले जसे दिसतात तसाच हा किल्ला दिसत होता. हाडाची तटबंदी अगदी अभेद दिसत होती, तिची भव्यता समजून येत होती. जसे जसे जवळ जावू तसतसा किल्ला भाळ्वत होता. गाड्या रस्त्यावरच लावाव्या लागतात, गाड्या लावून आम्ही किल्ल्याकडे चालू लागलो. मोजून १० मिनिटात तुम्ही गडाच्या दरवाज्यापर्यंत जावू शकता.

मित्रांनो, मी माझ्या आयुष्यात रायगडानंतर जर भव्यता दख्खन मध्ये जर कोणत्या किल्ल्याची पहिली असेल तर तो हा किल्ला.

थंडगार करणारा हा किल्ला आहे. याचा महादरवाजा आणि बाजूचे बुरुज … पहिले की एकच वाक्य …

“आगआयायाया …. काय हाय हे”

DSC_0305

DSC_0322

खूप फोटो काढले, मनभरून तो बुरुज आणि महादरवाजा पहिला, इथे आम्ही दोन गटात विभागलो गेलो, एका ग्रुप मध्ये मी आणि सर एलीयन आणि दुसऱ्या ग्रुप मध्ये बाकीचे सर्व.

बाकीचे गडाच्या पाठीमागच्या दरवाज्यानी गेले आणि आम्ही पुढून गेलो, आत जाताच उजवीकडे आम्ही गेलो थोडे वर चढून एका महाभयंकर बुरुजावर गेलो, तिथून जो बालेकिल्ला दिसत होता त्याचा दर्जा काय निराळाच …

DSC_0334
हाच तो महाभयंकर बुरुज

 

DSC_0332
बुरुजावरून दिसणारा बालेकिल्ला

बुरुजाच्या डाव्या बाजूने तटबंदीवरून पुढे गेलो तर तिथेही एक बुरुज होता, त्याची परिस्थिती जरा बिकट होती पण उंच देखणा दिसत होता. या बुरुजाच्या उजव्याबाजूने आत गेले की मोठा तलाव लागतो, १२ महिने या तलावात पाणी असते पण पिण्यायोग्य नक्कीच नाही. तलावाच्या समोरच एक इमारत आहे, नक्की काय आहे हे समजत नाही. कधी दर्गा वातो तर कधी धान्य किवा दारुगोळा साठा वाटतो.

DSC_0341

DSC_0345

इथून डावीकडे परत मोठे पठार लागते, जी गडाची पाठीमागील बाजू आहे, लांबून एक अतिशय देखणे काहीतर दिसते, पहिल्यांदा वाटेल कोणत्यातरी इमारतीचे अवशेष असावेत किवा स्थंब वगैरे असावा पण हा आहे गडामागील अतिशय मोठा बुरुज. या बुरुजावर एका वेळी अंदाजे १०० माणस बसतील एवढी जागा आहे. खूपच देखणा बुरुज आणि अवाढव्य.खाली उतरण्यासाठी पायऱ्या वैगैरे काही नाही, शक्तिमान होवून घसरत खाली उतरावे लागते.

DSC_0348

खाली उतरून गेलो की, एक छोट्याश्या दरवाज्यातून बाहेर जावे लागते, बाहेर पडले की गडाच्या पाठीमागचा बुरुज आणि महादरवाजा दिसतो, खर सांगतो हा दरवाजा अतिशय मोठा आहे, बर्याच गडाचे मुख्यदरवाजेही एवढे मोठे नसतील.

आहो, लय घाण आहे हे सगळ …. डोक सुन्न करणारा किल्ला आहे हा …..

या छोट्या दरवाज्यातून बाहेर पडले की गडाच्या पाठीमागील दरवाज्यात जातो
या छोट्या दरवाज्यातून बाहेर पडले की गडाच्या पाठीमागील दरवाज्यात जातो

DSC_0361

DSC_0372

बराच वेळ मी आणि सर एलीयन इठी बसलो होतो, भव्यता पाहून कुणीही याच्या प्रेमात पडेल हो ….
काय ती तटबंदी … काय ते बुरुज… काय तो दरवाजा …. वांड आहे सगळ राव ….

१० मिनिटाची पायपीट करून आम्ही गडाच्या मुख्य दरवाज्यात पोहचलो, सगळेजण आमची वाट बघत बसले होते. पुन्हा एकदा तो महादरवाजा पहात सगळेच बसलो होतो … या गडावर मुक्काम करायलाच गेले पाहिजे असे वाटले, पुन्हा एकदा नक्कीच या गडावर जाणार ते ही मुक्कामाला ….

अश्या या रांगड्या किल्याला छाती ताणून एक मुजरा केला आणि निरोप घेतला….


आता पुढचा टप्पा होता तो किल्ले सुतोंडाचा …. गडाच्या जवाल जावून मुक्काम करणी आणि सकाळी किल्ल्यावर जायचे असा मनसुबा होता. बनोटी गावात, बाजूलाच एक वाडी आहे जिला वाडी असेच म्हणतात, तिथून पुढे नायगाव म्हणून छोटेसे गाव आहे तिथे हा किल्ला आहे, वेताळवाडीच्या किल्ल्यातून इथे पर्यंत जाण्याचा मार्ग …

हळदा –> सोयगाव –> शेंदुर्गी (हायवे पासून डावीकडे) –> मानखेड –> वरखेडी –> लोहारी –> पाचोरा –> चिंचखेडा –> सारोळा –> खडकदेवळा –> पोहरी(बृ) –> वरठाण कडून उजवीकडे –> बनोटी –>  वाडी –> नायगाव

हायवे ला लागलो दिवस मावळत होता, आम्ही पुढे होतो म्हणून बाजूला थांबलो, मस्त एक विहीर होती बैलगाडी होती … मग जरा फुटू काढले  DSC_0389

DSC_0393

DSC_0401

 

पुढे वाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नीट नव्हता आणि वाडीतून पुढे नायगावला तर चार चाकी घेवून जावूच शकत नाही एवढा बेकार रस्ता आहे असे आमाला बनोटी येथे सांगण्यात आले.

या गावात आम्ही गेलो तर सगळे गाव आमच्या मार्गदर्शनाला, गावच्या पाटलाला तर लयच इंटरेस्ट हो … गाडी पुढ फोन लावून रस्त्याची काय परिथिती आहे हे विचारात होता (त्याचे एवढे कष्ठ करण्यापाठीमागे वेगळेच कारण होते).

मग आम्ही त्या गावात तिथल्या शाळेत आम्ही मुक्काम करण्याचे ठरवले, मग दोनी गाड्या शाळेकडे वळवल्या … पोचतोय तेवढ्यात गावचे पाटील तिथे आले आणि त्यांच्या कडे मोठी जागा आहे आणि तिथे आम्हला थांबण्याचा आग्रह करू लागले….. लयच आग्रह हो … आंघोळीला गरम पाणी देतो … लाईट आहे, हातरून-पांघरून देतो … आहो दारूचीबी व्यवस्था करतो म्हणाले पाटील ….

मग गेलो सगळे परत तिथे …. मग काय पाटलांनी भांडी-कुंडी दिली … ताट-वाट्या दिल्या …. अगदी जावयासारखी सूय हो …. नंतर अनिल भाऊंनी सांगितले की आम्ही सगळे त्यांना मिलिटरीची लोक वाटलो आणि त्यो गाडी गावात मटका चालवात होता … म्हणून एवढी आमचे लाड चालले होते.

सगळ्यांनी जेवण बनवायला सुरु केले मला मनोज भाऊ म्हणले पाटील तुम्ही त्या पाटलाला आणि बाकीच्यांना सांभाळा … मी आपला बाहेर सभा मांडून बसलो होतो …

जेवण तयार झाली …. चिकन-भात केला होता … सगळे अगदी कोपर्यापर्यंत वगाळ येवूपर्यंत जेवले आणि क्षणात सगळे शहीद झाले.

क्रमश:

 

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

8 comments on “दिल्ली दरवाज्याच्या मुलुखात – भाग २Add yours →

  1. पाटिल लयं भारी लिव्हताय राव, समंद डोळ्या समुर उभं राहातयां….

  2. छान शब्द चा वापर नेमकी माहिती एकदा कन्नड तालुक्यातील अन्टुर किल्ला नागद कींवा नागापूर मार्गे करा मदत पाहिजे असल्याच फोन करा 9112701999

  3. जय शिवराय
    मी राजे शिवबा प्रतिष्ठण चा मावळा(सं. सचिव ) आहे . गेल्या तीन वर्षा पासून आम्ही गडदुर्ग सवर्धन करत आहोत. जी की आज एक गरज आहे अस मला वाटतं . आज या गड किल्ल्यांची अवस्था खूप बिकट आहे आणि त्या कडे कोणाचे लक्ष नाही. किल्यावर खूप काही शिकण्या सारखे पण आता त्या कडे दूर लक्ष होत आहे. हे किल्ले नाम शेष होत चालले आहे. जर आता आपण लक्ष नाही दिल तर आपल्या येणार्‍या पिढीला ते फक्त पुस्तकात दाखवावे लागतील. मानून आपल्या हातून शिवकार्य व गड सवर्धन झालं पाहिजे . .जेणे करून ते आणखी काल टिकतील.
    अमोल वाघचौरे
    औरंगाबाद (सांभाजी नगर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *