सामान्य माणूस कसा बर जग बदलेल ?
आपण एक विचार मनामध्ये प्रस्थापित करतो आणि तो समाजामध्ये रुजवायचा प्रयत्न करतो, आणि आपण आपल्या स्वप्नातला “भारत” ज्याला आपण सुवर्ण भारत असे म्हणूयात (कारण आपण “सोनेकी चिडिया” होतो एके काळी) घडवायचा असे विचार करतो.
करावा ! प्रत्येकाने हा विचार करावा. कारण विचार तर केलाच पाहिजे…. बर विचार केला पुढ काय ?
जर आज आपण पहिले तर, आपण “सुवर्ण भारताचे” स्वपन आपण फेसबुक, ब्लॉग अश्या ठिकाणी जास्त पाहतो. मग त्यामध्ये राजकारण्याची फोटो (जसे मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांची चेहरे कोणत्या तरी हिरो-हिरोईन च्या चेहर्यावर लावणे, किवा कोणत्या तरी राजकारण्याचा फोटो टाकून त्याने किती पैसा खाल्ला हे टाकून “लाईक” करा किवा share करा. असले धंदे ),कोणत्या तरी नेत्याला उदेशून काहीतरी पोस्ट करणे, आपलीच जात कशी चांगली आहे आणि आमच्या जातीसाठी सरकारने काय केले पाहिजे असल्या गोष्टी, मग एखद्या जातीची जी काही मागणी असेल ती मागणी जर मान्य झाली मग त्यावेळी कोणते सरकार होते त्यांना त्या जातीचा पाठींबा मग त्या पक्ष्यातल्या नेत्यांनी काहीही घोटाळे करो नाहीतर काहीही करो हे आम्हाला दिसतच नाही का? … तर आमच्या जातीचे काम केले आणि “देश्याच्या हितापेक्ष्या जातीचं हित आम्हाला चांगले वाटते”. मग तो पक्ष त्या जातीचं संडासच्या तांब्या सारखा का उपयोग करून घेईना .. म्हणजे ज्यावेळी लागते तेव्हाच उचलायचे आणि बाकीच्या वेळी कुठेतरी कोपर्यात फेकून द्यायचे.हे आम्हाला का नाही कळत ? मग आम्ही कोणत्या सुवर्ण भारताचे स्वप्न बगतोय का आम्हला फ़क़्त आमचे आणि तुमचे हेच करायचे आहे का ? आणि म्हणे सामान्य माणूस बरेच काही करू शकतो ….
काय ?? जातीपाती, एकमेकात भांडण ?
मला खरच आश्चर्ये वाटते फेसबुक वरती बरेच तरुण आपआपल्या जातीबद्दल बरच काही लिहित असतात काहीतरी कार्य सुरु असते आणि त्यात प्रत्येक जातीला एक जगात गुरु आहेच जसे मराठे म्हणतात शिवाजी महाराज आमचे, धनगर म्हणतात अहिल्यादेवी आमच्या, ब्राह्मण म्हणतात टिळक आमचे, महात्मा फुले झाले माळी समाजचे, आंबेडकर झाले बौद्धांचे. आपण कधी विचार केला आहे का की शिवाजी महाराज काय फ़क़्त मराठ्यांचे राजे होते का? “हिंदवी” स्वराज्य या मध्ये काय फ़क़्त मराठा समाजचे लोक होते का ? अहिल्यादेवींच्या राज्यात काय फ़क़्त धनगर होते का? का यांनी फ़क़्त आपापल्या जातींच्या लोकांना फ़क़्त गुलामगिरीतून बाहेर काढले का? मग मी कसे मान्य करू कि आम्हाला शिवाजी महाराज कळले, अहिल्यादेवी कळल्या, आंबेडकर कळले , महात्मा फुले कळले……
या लोकांनी कधीही जातीपाती , धर्म असली भिंत ठेवली नाही, कधी असल्या गोष्टी केल्या नाहीत मग आपण जर यांना आपले अनुयायी म्हणत आसाल तर आम्ही काय शिकलो या महान लोकांकडून ? कसले आम्ही अनुयायी ?.
म्हणजे जर एखाद्यावर अन्याय किवा अत्याचार होत असेल तर आम्ही तो कोणत्या जातीचं आहे, त्याच्या चमडीचा रंग कोणता आहे ? त्याचे आडनाव काय आहे यावरून आम्ही ठरवणार कि त्याला मदत करायची की नाही, का तर आम्ही आमच्या युगपुरुष्यांकडून हेच शिकलो आहे…. बरोबर ना ?
हा जर तुम्ही राजकारणात असाल आणि जातीच राजकारण करून तुम्हाला प्रगती गाठायची असेल तर मी त्यांच्यासाठी नाही बोलत. मी फ़क़्त सामान्य लोकांबद्दल बोलतोय.
आपण पंढरपूरची वारी करतो तुकाराम महराजांची पालखी, माउलींची पालखी यांच्या बरोबर जातो. त्यांचे म्हणणे काय होते “सर्व विश्व एकाच चैतण्यापासून बनले ” मग या आमच्या आमच्यात भिंती कश्या ? कशाला मग ढोंग करायचे ?
जर आपण सामान्य माणस असल्या गोष्टी करत बसलो तर मग हे नेते लोकांना काय अवगड आहे आपल्यात फुट पाढून आपला स्वार्थ साधण्यात.पण नाही, आम्ही असेच करू मग पैसे मिळतील स्कॉर्पियो घेऊ गळ्यात सोन्याची चैन हातात सोन्याचा कडा मग आम्हीही पुढारी, गुंठा मंत्री होऊ, १०० एकर जमीन घेऊ, पैसा मिळवू “सुवर्ण भारत” बनवेल कोणीतरी …. जसे आपण म्हणतोच ना “शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात” आमच्या घरात डॉक्टर, इन्जिनेअर ,वकील जन्मू दे. आणि अश्या लोकांना आपण मोठे करायचे नंतर हेच लोक १०० लफडी करून पैसा खातात, भ्रष्टाचार वाढतो, मग हेच लोक सरकार विरोधी आंदोलने, मोर्चे काढतात आणि त्यात परत आपणच सहभागी होतो.
“काय या जातीपाती असे कुठे असते का २१ व्या शतकात आपण असले विचार बंद केले पाहिजेत” असे विचार कधी येतात आज भारत देश्यातल्या तरुणाच्या मनात ? जेव्हा त्याला love marriage करायचे असते त्याच वेळी. बरोबर ना ? बाकी वेळी आम्हाला फ़क़्त आम्हाला सुविधा पाहिजेत,या क्षेत्रात एवढ्या जागा पाहिजेत.. असले विचार.
थोडक्यात काय … प्रगती, विकसित देश, लाचारी घालवणे, गरिबी घालवणे असले विचार बाजूला राहिले आणि आम्ही आमच्या आमच्या जातीसाठी लढतोय आणि तेही आप्ल्याच लोकांबरोबर. आणि तोंड वर करून आम्ही हिंदू , गर्व से कहो हम हिंदू हैं, हिंदू-मुस्लीम भाई भाई, अश्या मोठ्या गोष्टी बोलायच्या.
जो पर्यंत सामन्य माणसाच्या डोक्यातून असली खंदक जात नाहीत तो पर्यंत आपण एक पूर्ण विकसित आणि सुशिक्षित समाज बनू शकत नाही.आणि जो पर्यंत पूर्ण विकसित आणि सुशिक्षित समाज आपण बनत नाही तो पर्यंत रयतेच राज्य येणार नाही, आणि आपला “भारत” पुन्हा “सुवर्ण भारत” बनणार नाही .
परवा परवा मी फेसबुक वरती सांगितल कि “मित्रानो कृपया मला जात आणि धर्म या विषयावरच्या फोटो ट्याग करू नका”. तर एकच मला फोन आला आणि तो माझ्याशी मोठ्या आवजात बोलू लागला कि तुम्हाला आपल्या जातीविषयी आभिमान नाही, आम्ही सर्व जन तुम्हाला बाजूला करू वगैरे वगैरे …. मी म्हणले हो बाबा कर काही हरकत नाही आता तू लहान आहेस मोठा झालास कि परत मला फोन कर.” एका शिकलेल्या युवकाकडून असे अपेक्षित नव्हते.
असो हे माझे मत आहे … काय चुकले असेल किवा कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर .. कोणी तरी मूर्ख काहीतरी फालतू बोलता होता अस समजून चार शिव्या देऊन … विषय सोडून द्या.
प्रशांतदादा खरच खूपच कटू आणि सत्य अनुभव आपण अनुभवताय पण आपण जी काही समोर मांडलय ते वाचून खरच विचार बदललाय ….. खरच …….आपणास ज्यावेळी पहिल्यांदा बोललो त्यावेळी आपणास कोणत्या नावाने संबोधायचे या भ्रमात होतो………….पण खरच त्यावेळीही महाराजांच्या कृपेने मला जे सुचले ते म्हणजे …..प्रशांत….दादा.
सडेतोड विचार धारा ..एक दम मस्त..!
विषय लय खोल आहे…
खंत अशी की दुनियेला हा विषय आत्ता समजला तरी उमजायला अजुन बरीच वर्ष लागणारेत…
Great thoughts…
जात पात धर्म या सर्व गोष्टी
मानवाने आपल्या वैयक्तीक
स्वार्थासाठी निर्माण केल्या
आहेत असं माझं प्रामाणिक मत
आहे.
बाकी तुमचा हा लेखन प्रपंच
पाहुन असं वाटलं कि चला
कुणाचंतरी लक्ष आहे बुवा ह्याही
विषयावर.
आज समानतेच्या नावावर सगळी
मंडळी आंबेडकरांचं नाव वापरुन
ठणठणाट करत जरी असली तरी
जातपात हा मुद्दा कुणी आज
मानत नाही हा आमचा सर्वात
मोठा गोड गैरसमज आहे.
वेळ हरेकावर येतेच त्या वेळी समजतं
की जात वगैरे काहीही नष्ट
झालेलं नाही ते आहे तसंच आहे.
उचल्या,उपरा,फकिरा,
कोल्हाट्याचं पोरं ही लेखन
साहीत्ये जातपात नष्ट झाली
आहे असं समजणार्यांनी जरुर
वाचावित म्हणजे जळजळीत
वास्तव कळेल त्यांना.
चारचौघं करीयर साठी धडपड
करणारी एकत्र आली की आधी
चौकश्या होतात, “कारे ? तु
कास्टमधला का ? तुम्हाला बुवा
बरं आहे भरपुर आरक्षण आहे
जिथेतीथे.”
पण तोच विचारणारा आरक्षण
का आहे ? याचा मात्र ढुंकुनही
विचार करंत नाही.
आणि जातीमुळं वैयक्तीक
रित्या मी सुद्धा बर्यावाईट
हरेक गोष्टींचा अनुभव घेतलाय
आणि घेतंच आयुष्य पुढं सरकतं आहे…
बाकी जातपात असलं काही
नसतं हा विचार फक्त लव्ह मॅरेज
करत्या वेळीच केला जातो ही
गोष्ट मात्र एकदम पटली.
आपली लेखनकला अशीच बहरंत
जावो ही सदिच्छा.
!! जय जिजाऊ !!
प्रशांत दादा ….. खरंच डोक सुन्न केले राव…..
तुम्ही फारच खरे लिहीले आहे. सत्य कटू असते. म्हणूनच तुम्हाला काही लोकांकडून त्रास झाला. जुन्या पिढीचे समजू शकतो पण तरुणांकडून एवढ्या संकुचित मनोवृत्तीची अपेक्षा नाही.असो. आपला प्रयत्न स्तुत्य आहे. We are with you.