इतिहासाची नासधूस
इतिहासाची आवड माणसाला कुठ घेवून जाईल हे सांगता येणे शक्य नाही, अर्थातच आपल्या मराठी प्रदेश्यात ज्याला कुणाला इतिहासाची पान चाळायची इच्छा होते त्याची सुरवात होते ती शिवाजी महाराजांपासून, साहजिक आहे, पण इतिहासाची जुळवा-जुळव करायची म्हणल की जरा पाठीमाग जाण आवश्यक आहे, कारण इतिहासाच्या इतिहासाचा आभ्यास ही तेवढाच महत्वाचा.
भारताचा आभ्यास करायचा म्हणल की, प्राचीन भारत ही संकल्पना समजून घेण आवश्यक आहे, मग त्यामध्ये अगदी आश्म्युगापासून ते आजपर्यंतच्या घडामोडींवर प्रकाश टाकणे गरजेचे आहे. मध्ययुगाचा आभ्यास करताना, एका गोष्टीचा गोंधळ आहे तो म्हणजे
“जात आणि धर्म”.
आपल्या काही अतिशहाण्या इतिहासकारांनी ज्याच्या त्याच्या सोयीने भारतवर्ष्याची जात व्यवस्था मांडली आहे. काही ठिकाणी पुरावे जोडले तर काहीठिकाणी तर्क लावला. याला माझा अजिबात विरोध नाही, पण एखाद्या राजाला किवा महापुरुषाला एखाद्या जातीच्या बेडीत अडकवून त्याचा इतिहास जगापुढे मांढने योग्य नाही, किवा त्याची जात किवा बाप बदलणे हे ही योग्य नाही. एका बाजूला त्याचे गोडवे गायचे आणि दुसऱ्या बाजूला त्याला एका विशिष्ठ जातीला बांधून ठेवायचे आणि समाजात एक संभ्रम प्रस्तापित करायचा, यातून नेमके काय सिद्ध होते हा एक आजवर न समजलेला गोंधळ आहे. आणि हे कार्य प्रत्येक जातीचा इतिहासकार करत आहे किंवा एखाद्या ठराविक जातीवर प्रेम दाखवून त्या जातीचा मी अभ्यासक आहे हे सांगून त्या जातीवर काहीतरी लिहिणे आणि संशोधन करीत आहे हे सांगणे, आणि याला बळी पडून सामान्य मनुष्य सुद्धा इतर जातीविषयी मनामध्ये कटुता ठेवतो आणि एक अखंड भारत ही संकल्पना मग कुठेतरी खोटी ठरते, यावेळी एक विचार करणे आवश्यक आहे,
ज्या महापुरुश्यांना तुम्ही मानता त्यांनी हेच केले का ?
असो …
प्राचीन भारत म्हणल की मला “मौर्य साम्राज्य” इथून सुरवात करावीशी वाटते, भारतवर्ष या विषयाला इथून सुरवात होते. आता मौर्य साम्राज्य स्थापन केले तो सम्राट म्हणजे “चंद्रगुप्त मौर्य”. चंद्रगुप्ताचा आभ्यास करताना समजेल कि त्याने हे राज्य उभे करण्यासाठी काय केले आणि त्यामध्ये चाणक्याने दिलेली साथ आणि अर्थशास्त्राचा आणि राजकारणाचा अचूक दिलेले मार्गदर्शन. हा इतिहास एवढा प्रचंड आहे की मौर्य साम्राज्याची तुलना आजवर कोणत्याही साम्राज्याशी केली गेली नाही आणि जरी केली गेली असेल तर मग यामध्ये खूप काही गोंधळ आहेत. पूर्ण भारत एका छत्राखाली आणून एक सुंदर असे राज्य उभे झाले, त्यामध्ये अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राजकारण, परराष्ट्रीय धोरण, धर्मव्यवस्था अश्या अनेक बाबींवर एक जबरदस्त क्रांती झाली ज्याचा आभ्यास केला तर आज भारतापुढील अनेक समस्यांना अचूक असे उत्तर मिळेल.
चंद्रगुप्ताच्या जन्माबद्दल जरी एकमत नसले तरी त्याच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल एकवाक्यता दिसते. नंद घराणेशाहीची समाप्ती करून सिंहासनावर विराजमान होताच चंद्रगुप्ताने राज्याच्या सीमा वाढविण्यास सुरुवात केली व ग्रीक राजा अलेक्झांडरचा एक निष्ठावंत सरदार सेल्युकस निकेटर याचा पराभव करून वायव्य दिशेला असलेली बरीच राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. हे युद्ध हरल्यामुळे सेल्युकसने आपली कन्या हेलन हिचा विवाह चंद्रगुप्ताशी ठरवला आणि तह घडवून आणला. लग्नात चंद्रगुप्ताने सेल्युकसला ५०० हत्ती भेटीदाखल दिले आणि त्यानंतर चाणक्याच्या मदतीने सेल्युकसबरोबर ऐतिहासिक तह करून त्याच्या कन्येशी विवाह केला व नवीन मैत्रीचा प्रारंभ केला. या यशस्वी कारवाईनंतर चंद्रगुप्ताची ख्याती जगभर पसरली आणि इजिप्त व सिरिया या तत्कालीन बलाढ्य साम्राज्यांनी आपल्या राजकीय दूतावासांची आशिया खंडात प्रथमच स्थापना केली व या देशांच्या राजदूतांची चंद्रगुप्ताच्या दरबारी नेमणूक करण्यात आली. ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिस हा चंद्रगुप्ताच्या राज्यकारभाराने व मौर्यांच्या ऐश्वर्याने इतका प्रभावित झाला की त्याने इंडिका या नावाचा ग्रंथ लिहिला. दुर्दैवाने या ग्रंथाचा बराचसा भाग आज अस्तित्वात नाही . परंतु जो भाग आजही उपलब्ध आहे त्यावरून चंद्रगुप्ताच्या सामर्थ्याची व चाणक्याच्या परिणामकारक नीतीची प्रचिती येते.
आमचे इतिहासकार मात्र तो कोणत्या जातीचा होता यावर बोंबाबोंब करीत आहेत, आता याबाबत काही अभ्यासकांचे मत बघा,
१) चंद्रगुप्त हा “धनगर” होता.
२) चंद्रगुप्त हा चान्क्याचाच मुलगा होता.
३) चंद्रगुप्त हा दासी पुत्र होता.
काही जणांच्या मते चंद्रगुप्त हा “धनगर” होता, याला पुरावा काय तर तो “पशुपालकाचा” मुलगा होता, आणि जो पशुपालन करतो तो धनगर, हे अगदी ओरडून सांगितले जाते, मला एक समजत नाही “धनगर” हा शब्द तर त्यावेळी लोकाना माहित होता की नाही माहित नाही कारण ह्या नावाची जात नक्की कधी अस्तित्वात आली हे कदाचित काही लोक सांगू शकतील पण नक्कीच त्यावेळी नसेल.
“जो पशुपालन करतो तो धनगर” असे म्हणले तर “पशुपालन” हा मुख्य उद्योग त्यावेळी होता कारण मनुष्य ज्यावेळी भटकंती संपवून एका ठिकाणी स्थायिक झाला त्यावेळी त्याला पशूंची गरज पडलीच आणि त्यामध्ये गाई, बैल, शेली-मेंढी असे बरेच पशु आले. मग त्यावेळी सगळेच पशुपालन करीत होते मग सगळेच धनगर का नाहीत? याचा निष्कर्ष काढायचा म्हणला तर आज हरएक माणूस धनगर आहे, कारण प्रत्येकाचे पूर्वज पशुपालन करीतच होते. दुसरा मुद्दा पशुपालन करणारे धनगर असे असेल तर मग आजही ही संकल्पना का नाही.
मुद्राराक्षस या काव्यात विशाखदत्ताने चंद्रगुप्त मौर्य हा नंदांचा नातलग असल्याचे लिहले आहे, मग राजा धनानंद (नंद घराणे) हा सुधा धनगर झाला, यावर कोणी बोलत नाही कारण त्याचा उल्लेख “जुलमी राजा” म्हणून केला जातो. महापरिनिबाण सुत्त या प्राचीन बौद्ध धर्मग्रंथात एक मौर्य नावाच्या क्षत्रिय जमातीचा उल्लेख आहे. तरीही, ऐतिहासिक पुराव्यांविना अजून निष्कर्ष काढणे कठीण आहे. मग आम्ही ठामपणे चंद्र्गुप्त्ची जात कशी ठरवू शकतो, एका बाजूला धनगर ही जात म्हणतात आणि हेच इतिहासकार धनगर ही जामात आहे हे ही सांगतात. हटकर हे सुधा धनगर यादीत कधी आणि कसे आले हे ही कोडेच आहे. मुळात हटकर ही मुळात वेगळी क्षत्रिय जमात आहे, ते ही पशुपालन करीत होते. मग म्हणून तेही धनगर झाले असावेत बहुदा.
मग चंद्रगुप्त मौर्य आमच्या जातीचा नाही तर आम्ही त्याला इतिहासात महत्व देणार नाही का ? त्याच्या प्रशाषनाचे धडे आम्ही गिरवणार नाही का ? मग चंद्रगुप्त मौर्य बाजूला राहतो आणि तो नेमका कोणत्या जातीचा आहे हा आमचा आभ्यास सुरु होतो. आणि या अभ्यासातून नेमक आज या देश्याला कोणता फायदा होणार आहे हे समजन कठीण जाते.
चंद्रगुप्तचा जन्म -इ.स.पू. ३४० आणि सम्राट म्हणून कारकीर्द -इ.स.पूर्व ३२० ते इ.स.पूर्व २९८. चंद्रगुप्त मौर्याच्या जन्माबद्दल अजूनही गूढ आहे. काही इतिहासकारांच्या मते हा मोर पाळणाऱ्या टोळीत जन्माला आला व चाणक्यास विंध्य पर्वताच्या प्रदेशात भेटला. तर काहींच्या मते चंद्रगुप्त हा नंद राजपुत्र व मुरा नावाच्या दासीचा पुत्र होता आणि हे गुपित चाणक्य जाणून होता. काहींच्या मते मुराच्या पतीला नंदाने मारून टाकले आणि तीला दासी बनवले आणि तीला पगार ही इतका कमी होता की ती मुलाच काय तीचही संगोपन करणे अवघड झाले होते म्हणून तिने तिचा मुलगा म्हणजे चंद्रगुप्त यास एका शिकारी टोळीच्या हवाले केले जी शिकार करायची आणि पशुपालन करायची.
आता प्रश हा पडतो, मनुष्य जेव्हा सामुहिक पद्धतीने जगू लागला आणि यातून नगर व्यवस्था विकसित झाली मग हे पूर्ण नगर हे धनगरांचे नगर असेही म्हणता येईल कारण सगळेच पशुपालक होते. मग यामध्ये सामाजिक भाग पडत गेले, माणसाने वास्तव्य सुरु केले त्यावेळी अनेक गरजा समोर आल्या असतील, कपडे आले, भांडीकुंडी आली, शेतीची अवजारे आली दागदागिने आली अश्या अनेक गरजा आहेत मग इथे समाज विभाजित झाला आणि जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी जेजे लागेल तेते निर्माण करण्याची जबाबदारी कुणीतरी एका विशिष्ठ कुटुंबाने किंवा दोन चार कुटुंबाने एकत्र येवून घेतली असेल मग भांडी बनवणारा कुंभार कसा आणि कधी झाला? आणि का झाला ? मुळात तो पशुपालक होता, म्हणजे धनगर होता.
0 comments on “इतिहासाची नासधूस” Add yours →