आडानचोट हा आडानचोटच !!
फोटो आभार: इंटरनेट (http://cdn.teckler.com/images/hunterdollar/9b59d53399b50d34e211d7748c4ca3ec_thumb.jpg)
आयुष्य जगात असताना आपल्याला अनेक प्रकारची रथी-महारथी भेटतात, काहीतर खूपच भारी माणस असतात, इतकी भारी असतात की त्याना आपण “आडानचोट” हि पदवी बहाल करतो. आता यामध्ये पण विसंगती आहे, नक्की “आडानचोट” कोणाला म्हणाव ?.
जो आपल्याला आवडत नाही तो/ती ?
ज्याला काहीही अक्कल नसते तो/ती ?
नक्की काय ?
अशीच एक गोस्त सांगतो आज …
पुन्हा एकदा सांगू इच्छितो जे काही इथे मांडत आहे ते अनुभवावरून मांडत आहे, त्यामुळे हवेत मारलेले बाण, स्वताच्या नितंबावरती घेवू नये, हि कळकळीची विनंती.
एक छोटसा गाव असत, गावाच नाव “आवसानवाडी”. या गावात दोन भाऊ असतात, “म्हाद्या” आणि “शिरप्या” (जमीन आणि भाऊबंदकीच्या नादात एकमेकाच तोंडसुद्धा न पाहणारी).
म्हाद्या असतो तो खूप साधा, सरळ आणि सात्विक विचारांचा, परमेश्वराने दाखवलेल्या वाटेवरून कोणतीही तक्रार न करता जीवन जगणारा माणूस.साधीभोळी बायको, दोन गुणी लेकर, क्वारबर जमीन वाट्याला आलेली, नाचणी आणि भात पिकवून खाणारा माणूस, २-३ म्हशी, दुध इकून तेल-मिटाची जुळणी करणारा साधा सरळ माणूस.
शिरप्या बरोबर याच्या उलट, काहीतरी भानगडी करून ४ पैसे मिळवायचे आणि घावल्यावर कुत्र्यासारखा मार खायचा आणि गावात आबरू काढून घ्याची, तरीबी तोरा काय खाली नाय, मीच शाना असे म्हणत पुन्हा गावात वळूसारख फिरायचं. गड्याला एक बायको आणि २ पोर. दुसऱ्या भावावर कायमच डाफरून. एकंदरीत संसार रडत-कडत चालू असतो.
एक दिवस म्हाद्या म्हशी घेवून कुरणात जातो, बायडीन डाळ-भाकरी रुमालात बांधून दिलेली असती, म्हाद्या भाकरी एका झाडाच्या फांदीला आडकवतो आणि म्ह्सरांच्या पाठीमाग जातो. आता होतंय काय, आपले हनुमान वरून चाललेले असतात, त्यासनी भयानक भूक लागलेली असते पण काय भेटत नसतंय, दुष्काळ भागात हनुमान फिरत असतात त्यामुळ जरा वैतागलेले असतात, जरा पुढ गेले आणि त्यासनी म्हाद्यान झाडाला आडकावलेली भाकरी दिसते, हनुमानाच्या तोंडाला पाणी सुटत, हनुमान खाली येतात, भाकरी सोडून खाऊन टाकतात, खाल्यावर हनुमानाच्या लक्ष्यात येते की, ज्याची भाकरी आहे तो बिचारा काय खाणार ? मग हनुमान तिथच थांबतो आणि म्हाद्याची वाट बघतो, थोड्या वेळानं म्हाद्या येतो, बघतो तर काय, खुद्द हनुमान पुढ ?.
हनुमान जे काय झाल ते सांगतात आणि म्हाद्याला ३ नारळ देतात आणि म्हणतात एक कोणतीही इच्छा बोलायची आणि नारळ फोडायचा तुझी इच्छा पूर्ण होईल, अश्या ३ इच्छा तुज्या पूर्ण होतील. असे सांगतात आणि हनुमान हवेत गायब होतात.
म्हसर घिवून म्हाद्या घराकड जातो आणि पूर्ण हकीकत बायडीला सांगतो, मग दोघ बसून इचार करत्यात की काय मागायचं ?
जरा वेळानं म्हाद्या पहिली इच्छा बोलतो ती म्हणजे,
“हीरीला आणि बोरला बारा महीन पाणी राहू दे” आणि पहिला नारळ फोडतो …. “तथास्थू” !!!
दुसरी इच्छा बोलतो ती म्हणजे,
“छपराच्या जागी एक चांगल छोटस घर होऊ दे” …. “तथास्थू” !!!
तिसरी इच्छा बोलतो ती म्हणजे,
“हातात चार पैस येवू देत” …. “तथास्थू” !!!
हे सगळ झाल आणि म्हाद्याच जीवन एकदम सुरळीत चालू झाल, हे पाहून शिरप्याच दुकायला लागत, सगळी चौकशी करतो आणि त्याला झालेली सगळी गम्मत कळते, मग काय ….. हे भाऊ पण एक दिवस डाळ-भाकरी घेवून जातो आणि तसाच करतो जस त्यान म्हाद्याबद्दल ऐकलेलं असत, होतही तसच, हनुमान साहेब येतात, डाळ-भाकरी खातात, आणि शिरप्याला ३ नारळ देवून जातात ….
शिरप्या नाचतच घरात, शिरप्याची बायको म्हणजे त्याच्या पुढची, हे माग … ते माग करून बोंबा-बोंब करते आणि त्यात दोगांच भांडान लागत, रागाच्या भरात शिरप्या बायडीला ….
“थु तुज्या आयला म्हणतंय आणि नारळ फोडतय …..” घरात लगेच त्याची आई येते.
आता घरात दोन आया झाल्या, बायडी म्हणते एक सासू कमी होती का आजून एक आणली घालवा हिला …..
शिरप्या लगेच “घरातली आई जावू दे” आस म्हणतंय आणि नारळ फोडतय … “दुनी आया जात्यात” …
आता काय …. जी आई होती ती बी गेली …..
मग शेवटी “जी माझी आई होती ती मला परत दे” आस म्हणतंय आणि नारळ फोडतय …. आई परत येते …
अश्या पद्धतीने हनुमानान दिलेली तिन्ही नारळ वाया घालवतय आणि बसतय बोंबलत …. काहीही मिळत नाही ….
तात्पर्य काय ..
आडानचोट हा आडानचोटच …. खुद्द देव जरी भेटला तरी ही काय सुधारत नाहीत. मरेपर्यंत अशीच झक मारत जगत्यात.
पाटिल बंधु अप्रतिम लेख लिहला आहे तुम्ही
lai bhari
भाऊ नाद खुळा