विचारांची दिशा : महाराजांच्या नजरेतून.
शिवाजी महाराज आणि व्यस्थापन याविषयावर अनेक इतिहासकारांनी (इतिहासकार म्हणन कितपत योग्य आहे हे माहित नाही), अनेक गोष्टी मांडल्या आहेत, पण या वाचताना आणि त्यावर विचार करताना एक गोष्ट नक्की जाणवते ती म्हणजे, शिवाजी महाराज म्हणजे काहीतरी जबरदस्त शक्ती,असेच यांना म्हणायचे असते, मी मात्र महाराजांना एक असाधारण गुणवत्ता असलेला साधारण शाषक असेच मानतो.
आजवर मी त्यांच्या अनेक व्यवस्थापनाच्या गुणधर्मांवर लिहिले आहे आणि बोललो आहे, व्यस्थापन म्हणल की काही ठराविक मोजके गुण नसतात, एक परिपक्व व्यवस्थापक म्हणल की त्याला आणि त्याच्या गुणांना अंत नसतो आणि कोणती सीमा नसते, तसेच शिवाजी महाराजांविषयी आहे, एका पुस्तकातून किंवा एका व्य्ख्यानातून शिवाजी महाराज समजणे हे पूर्णता अशक्य आहे. शिवाजी महाराज म्हणजे एक विचार आहे जो नेहमी अभ्यासाचा विषय राहील. म्हणून शिवाजी महाराजांचा जर इतिहास समजून घायचा असेल तर “शिवाजी महाराज” ही व्यक्ती समजून घेणे सर्वात महत्वाचे, शिवाजी महाराज समजल्याशिवाय त्यांचा इतिहास समजणे कठीण आहे, नाहीतर त्यांचा इतिहास म्हणजे एक “Predefined Script” वाटेल, आणि मग अतिशहाणे इतिहासकार आहेतच, त्याना देवाचे स्थान देणार आणि त्यांचे कर्तुत्व मातीमोल करणार आणि केलेही आहे. मला कधीही घटनात्मक इतिहासाच्या अभ्यासाची आवड लागलीच नाही, माहिती असणे हा वेगळा भाग पण आभ्यास म्हणून रुची आजिबात नाही पण शिवाजी महाराज या माणसाचा आभ्यास करण्यात रुची खूप आहे आणि राहील आणि यात माझे आयुष्य जाणार हे नक्की.
आज आपल्या दैनदिन जीवनात असंख्य अडचणी आहेत, मग त्या घरगुती असोत, सामाजिक असोत किंवा नोकरी वा धंद्याबाबत असोत. मग या सर्व अडचणींवर मात करायची असेल किंवा यावर तोडगा काढायचा असेल तर आज आपण दोन गोष्टी करतो, त्या म्हणजे,
१) विचार आणि
२) चिंता
आता चिंता करून काय मिळते आणि त्यातून काय साध्य होते हे आपण जाणून आहोतच त्यावर बोलणे गरजेचे आहे असे मला वाटत नाही.
मग आपण विचार यावर बोलू, विचाराची परिभाषा नक्की काय असावी ? यावर प्रत्येकाचे वेगवेगळे मत असू शकते, मी मात्र महाराजांना डोळ्यासमोर ठेवून एक व्याख्या बनवली जी मी महाराजांच्या अभ्यासातून शिकलो,
“परिस्थितीचा पूर्ण आभ्यास करून, आपल्या कौशल्यांवर पूर्ण विश्वास ठेवून घेतलेला निर्णय म्हणजे विचार”.
आज आपण काय करतो, कोणतीही साधी अडचण येवू देत कपाळावर १०००० आट्या घालून शांत बसतो ज्याला आपण विचार करत बसलोय असे म्हणतो, जर स्वताला प्रामाणिकपणे विचारले तर नक्की समजेल तो विचार नसतो आपण चिंता करत असतो. विचार करणाऱ्या माणसाच्या कपाळावर कधीही आट्या नसतात हे आपण समजून घेतले पाहिजे, विचारी माणूस हा नियमित विचारवंत लोकांशी चर्चा करतो, त्यांची मत समजून घेतो आणि स्वता योग्य तो निर्णय घेवून कृती करतो, हे आपण शिवचरित्रातून शिकणे गरजेचे आहे. .
पन्हाळ्यातून सुटका, ही ऐतासिक घटना काय सांगते ?
आगऱ्याहून सुटका ही घटना काय सांगते ?
महाराजांच्या आयुष्यातील कोणताही प्रसंग घ्या, उत्तर एकच मिळेल ते म्हणजे,
“परिस्थितीचा पूर्ण आभ्यास करून, आपल्या कौशल्यांवर पूर्ण विश्वास ठेवून घेतलेला निर्णय”
यावर आपले औरंगजेब भाऊ घ्या, रागाच्या भरात आणि ताकतीच्या अति-आत्मविश्वासात घेतलेला निर्णय म्हणजे विचार नाही, त्याला बांबूवर जावून बसने म्हणतात, स्वताचे सिहासन सोडून परमुलखात आला आणि मरताना मात्र आपण काहीतरी चूक केली असे म्हणत मेला, याला आपण काय म्हणावे, महाराजांच्या आयुष्यात असा प्रसंग दाखवा ?
महाराजांच्या आयुष्यात कुठेही माज दिसत नाही, अति-आत्मविश्वास दिसत नाही, अति-शहाणपण तर मुळीच नाही, यशाची हवा डोक्यात कधीही घुसली नाही. नाहीतर यशाची हवा डोक्यात घुसली की मग तो माणूस खूप मोठा तत्वज्ञानी होतो आणि खूप मोठ्या बाता बोलायला लागतो,
कोण म्हणत,
“Be Positive … Don’t go with Negative though process”, पण मला असे वाटते की,
“Be Realistic, understand the situation, see your capability and take a decision and stand on it like one men army.”
निर्णय या गोष्टीवर एका खूप मोठ्या उद्योजकाने एक वाक्य बोलले,
“No decision is right or wrong, take decision and make it right”
हे सगळ पोट भरल्यावर बोलायला योग्य आहे, हेच वाक्य त्यांनी धंद्याच्या सुरवातीच्या काळात अवलंबल होते का? त्यावेळी १००० वेळा विचार केला असेल.
मला वाटतंय औरंगजेब भाऊनी पण असाच काही केले असेल, असे असेल तर मग तुमची समाधी औरंगाबादलाच होणार हे नक्की.
तर आयुष्यातली कोणतीही साधी गोष्ट असो तुम्हाला अगदी Realistic होवूनच विचार करावा लागेल म्हणजे त्यातून एक चांगला निर्णय घेता येईल. महाराजांच्या इतिहासातून हेच शिकायला हवे, दाढी वाढवून जनतेला मूर्ख बनवणाऱ्या भोंदू महाराजांकडे जावून तुम्ही तुमच्या आयुष्याचा मार्ग ठरवू नका,
लक्ष्यात ठेवा, शिवचरित्र हे एक चालते बोलते व्यास्थ्प्नाचे पुस्तक आहे, ज्याला नेहमी दिमागात ठेवा.
फोटो आभार: इंटरनेट
Nicely written Prashant daa.. keep it up…
डोळे उघडणारा लेख पाटील भाऊ
व्वा ! किती मोठा विचार दिलात !