राज्याची तत्वे
इतिहासाचा विध्यार्थी म्हणून एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे, एका विशिष्ठ काळातला आभ्यास केलात तर तो कुठे न कुठे कुठल्या तरी काळाशी समंधित असतो, मग तो घटनात्मक दृष्टिकोणातून असो वा कुणाच्या प्रभावातून असो. भौतिकशास्त्रात आपण याला “Theory of Relativity” असे म्हणतो, शिवाजी महाराजांचा आभ्यास करतानापण मला हेच जाणवते, जे काही महाराजांनी केले ते फ़क़्त जबरदस्त व्यवस्थापनाचे कौशल्य, संयमी वृत्ती आणि अर्थशास्त्राचा आणि राजकारणाचा जबरदस्त अभ्यास आणि गुणवत्ता.
यामध्ये जर पहिले, तर काही गुण हे रक्तातूनच येतात, ते परत अनुभवातून परिपक्व होतात आणि याच अनुभवातून दुसरे काही गुण विकसित होतात, आणि काही गुण फ़क़्त अभ्यासातूनच विकसित होतात, मला वाटतंय यामध्ये कुणाच दुमत नसाव, कारण इथे भावनिक स्पर्श कुठेच मी लावत नाही जे काही आहे ते अगदी व्यवहारिक मग ते शिवाजी महाराजांबद्दल असो वा चंद्रगुप्त मौर्य असो किंवा सम्राट अशोका यांच्याबद्दल असो, याचे कारण म्हणजे ही सर्व मंडळी मानसच होती, ते कोणी विष्णूचा अवतार किंवा खुद्द विष्णू नव्हते. हे सर्व प्रथम पटो किंवा न पटो डोक्यात घुसवले पाहिजे.
शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करताना मला असेच काही जाणवते, महाराजसुद्धा इतिहासाचा अभ्यास करतच होते त्यांना राजपुतांचा इतिहास माहित होता, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज ही जी काही परकी मंडळी होती त्यांचाही इतिहास आणि वर्तमान काळातील मनसुबे चांगलेच माहित होते.
चाणक्य हा एक विद्वान आणि हुशार माणूस होता त्याचबरोबर अर्थशास्त्र आणि राजकारण यामध्ये अतिशय तरबेज होता, मला महाराज सुद्धा असेच दिसतात, मला इथे तुलना करायची नाही, मला फ़क़्त एवढेच सांगायचे आहे की, चाणक्यनंतर जर हुशार, मुतसद्दी, अर्थशास्त्र आणि राजकारणाचे जबरदस्त गुण असणारा व्यक्ती या पृथ्वीवर होवून गेला असेल तर ती व्यक्ती म्हणजे “छत्रपती शिवाजी महाराज”.
राज्य कसे असावे आणि त्याची तत्वे कशी असावेत हे महाराजांनी नक्कीच जाणली होती. त्यामध्ये अर्थशास्त्र, समाजकारण, राजकारण, धर्मकारण अश्या असंख्य गोष्टींचा विचार महाराजांनी केला होता हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.
चाणक्यबद्दल वाचताना मला एक माहिती मिळाली ती अशी,
त्याकाळची भारतवर्ष्यातील परिस्थिती आणि परकीय आक्रमण पाहता चाणक्यने राज्य हे ७ तत्वांमध्ये मांडले,यामध्ये तो “राज्य” या शब्दाची परिभाषा न देता पूर्वीपासून चालत आलेल्या सिद्धांचा तो समर्थन करताना दिसतो. चाणक्यने राज्याची तुलना मानवी शरीराशी केली आहे ज्यामध्ये शरीराचा प्रत्येक अवयव हा एकमेकांशी परस्पर समंधित असतो आणि हे सर्व अवयव एकत्र मिळून काम करतात म्हणून मानवी शरीर चालते.
राज्याची तुलना मानवी शरीराशी केली आणि त्याची ७ तत्वे बनवली ती खालीलप्रमाणे,
१) राजा: राजाची तुलना त्यानी माणसाच्या डोक्याशी केली आहे, कारण राजा, बुद्धिमान, साहसी, धैर्यवान, संयमी, दूरदर्शी आणि युद्धकलेमध्ये तरबेज पाहिजे.
२) मंत्री: मंत्री हा राज्याचा डोळा असतो. मंत्री हा आपल्या देश्याचा जन्मजात नागरिक पाहिजे, चारीत्रवान, योग्य आणि विविध कला जोपासलेला आणि आपल्या राजाचा विश्वासू असावा.
३) रयत: रयत ही राज्याचे पाय असतात ज्यांच्यावर राज्याचे अस्तित्व अवलंबून असते. रयत ही स्वामीभक़्त, परिश्रमी आणि राजाच्या आज्ञेचे पालन करणारी असावी.
४) किल्ले (दुर्ग): किल्ले हि राज्याचे हात असतात जे राज्याचे रक्षण करतात, राजाने असे किल्ले बनवावेत जे राज्याचे रक्षण करतील आणि आक्रमक युद्धाच्या हिशोबाने असतील.
५) खजिना: खजिना हा राज्याचा चेहरा असतो जे राज्याचे तेज दाखवतो, युद्धाच्या प्रसंगी खजिना खूप महत्वाचा असतो.
६) सेना किंवा बळ: हा राज्याचा मेंदू असतो, शत्रूवर दबाव किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मानसिकरीत्या दुर्बळ बनवण्यासाठी बळ हे नक्कीच महत्वाचे.
७) मित्र: मित्र हे राज्याचे कान असतात, जे शांती आणि युद्धाच्या वेळी योग्यती मदत करतात, इथे कृत्रिम आणि आदर्श मित्र यामध्ये विभाजन केले आहे, आदर्श मित्र हे नक्कीच कृत्रिम मित्रापेक्ष्या श्रेष्ठ असतात.
जर वरील गोष्टींचा विचार केला तर महाराजांच्या राज्यातही असेच काही दिसून येते, म्हणून चाणक्य नंतर जर हुशार, मुतसद्दी, अर्थशास्त्र आणि राजकारणाचे जबरदस्त गुण असणारा व्यक्ती या पृथ्वीवर होवून गेला असेल तर ती व्यक्ती म्हणजे “छत्रपती शिवाजी महाराज”.
Lekh khp Chan ahe. Pn prajech hit pahnyat maharaj koutilyapeksha ujave thartat nehmich.