Untitled

माणूस राखावा

माणूस राखावा

Untitled

फोटो आभार : इंटरनेट 

आपण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतो जिथे आपण अगदी सर्वपातळीवर काम करतो सुरवातीला नवखा म्हणून काम करतो ज्याला आपण “Junior” म्हणतो, याच काळात तो खूप काही स्वप्न घेवून बाजारात उतरलेला असतो, आई-वडलांनी पोटाला चिमटा काढून पोराना शिकवलेलं असत त्याच त्याला चीज करायचं असत.

क्षेत्र कोणतही असो, स्वताच्या कार्यक्षमतेवरच यशाची सर्वोच्च पातळी आपण गाठू शकतो, आजकाल थोडा बदल यात नक्कीच झाला आहे कारण जग खूपच बदलेल आहे जर कोणाचा हात तुमच्या डोक्यावर असेल तर कदाचित तुम्ही थोड लवकर पुढे जाल पण असे मिळालेलं यश हे शेवटपर्यंत टिकेलच अस काही नाही, कारण,

“पाणी न मिसळलेल दुध उशिरा तापते आणि पाणी मिसळलेल दुध लवकर तापते”

पण यातल कोणत दुध हे शरीरासाठी उत्तम असत हे आपल्या सर्वांना ठावूकच आहे.

मी गेली दहा एक वर्षे संगणक क्षेत्रात काम करतोय मी ही खूप काही अगदी जवळून पहिले आहे, अगदी नवखा म्हणून काम करताना विविध प्रकारचे लोक पाहिले, कुठे चांगले अनुभव तर कुठे भयानक अनुभव.

परवा मी एका माझ्याच क्षेत्रातील एका मित्रा बरोबर बोलत बसलो होतो त्यांने काही त्याचेही अनुभव मला सांगितले,

ज्यावेळी आपल्या गटातला एखादा नवखा माणूस एखादे काम करत असतो तो त्यामध्ये खूप कष्ठ करत असतो, कारण काम चोखपणे पूर्ण करून देणे हे त्याचे धोरण असते, त्यामध्ये त्यालाही खूप काही शिकायला भेटते आणि आपल्या चोख कामाचा दाखला देवून आपल्या साहेबांकडून शाबासकी मिळावी ही एक त्याची इच्छा असते. मग कधी-कधी युद्धपातळीवर प्रयत्न करूनसुद्धा त्याला यश मिळत नाही, मग त्याला भीती असते की आता साहेब काय म्हणतील ?

एवढे प्रामाणिक प्रयत्न करूनसुद्धा आपण काम पूर्ण करू शकलो नाही, साहेब काय म्हणतील ? मग त्यामध्ये तांत्रिक अडचण असेल किंवा दुसरी कोणतीही अडचण असेल, तो अगदी रात्र आणि दिवस एक करून प्रयत्न करतो पण पाहिजे ते यश मिळत नाही. होते असे, कारण प्रत्येक वेळी यश मिळेल असे नाही मग तुम्ही कितीही प्रामाणिक प्रयत्न करा कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात.

मग अश्या वेळी त्याचा जो बॉस असतो त्याने ही परिस्थिती कशी हाताळली पाहिजे ?

आज काय होतंय? काम पूर्ण नाही झाल की एवढी आरडाओरड केली जाते की बोलू नका, त्या बिचाऱ्याला खूप मोठा गुन्हा केल्यासारखे वाटते. जिवापार कष्ठ करून सुद्धा यश पदरी पडले नाही. मग त्याचा बॉस त्याची एवढी खरडपट्टी करतो की तो पूर्णपणे खचून जातो, तो स्वताला अपयशी समजू लागतो आणि याचा परिणाम त्याच्या पुढच्या कामावर होतो.

“फिरंगोजी नरसाळा” आणि “चाकणचा भूईकोट किल्ला” आठवा जरा,

किल्ल्यावर अवघे ३००-३५० मावळे होते.पावसाळा चालू होणार म्हणून किल्यावर भरपूर रसद भरली होती.मुघलांनी किल्यास वेढा घातला व किल्यावर तोफांचा भडिमार चालू केला.पण किल्ला काही दाद देत नव्हता.मुघल सैनिक किल्याच्या बुरूजाजवळ आले की त्यांना गोफनगुंडे बसत.गोफनच्या साह्याने त्यांनी मुघली सैन्यांस रक्तबंबाळ केले होते.अवघ्या ३००-३५० मावळ्यासह फिरंगोजीनी किल्ला ५५ दिवस लढविला.मुघलांना किल्यावर प्रवेश करता येईना.अखेर त्यांनी तटापर्यंत भूयार खणून किल्ल्याचा तट उडविला.किल्याची एक बाजू उघडी पडली. किल्याजवळ हातघाईची लढाई झाली.

मुघलांच्या प्रचंड सैन्यापुढे आपल्या सैन्याची वाताहत होणार ध्यानात आल्यामुळे त्यांनी माघार घ्यावयाचा निर्णय घेऊन किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला.

ज्यावेळी फिरंगोजी महाराजांपुढे गेले त्यावेळी ती मान खाली घालून उभे होते कारण ते किल्ला वाचवू शकले नव्हते, मग महाराज काय म्हणतील ? त्याना काय वाटेल ? ही भीती त्यांच्या मनात होती.

महाराजांनी त्यावेळी त्यांच्या पाठीवार थाप मारली आणि म्हणाले

“किल्ला चोख लढवला तुम्ही, जरी किला गेला तरी शेवट पर्यंत तुम्ही लढला एवढा लहान किल्ला तुम्ही इतके दिवस झुंझत ठेवला ही काय छोटी बाब आहे का? मुघल किल्ले थोडीच खांद्यावर घेवून जाणार आहेत ! किल्ला पुन्हा घेवू. तुम्ही जिवंत परतला यात माझे समाधान.

कारण महाराज म्हणत, “आपण राखून गनीम घ्यावा.माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.”

फिरंगोजीच्या पराक्रमावर खुष होऊन राजेंनी त्याना भूपाळगडाची किल्लेदारी,एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली.

काय वाटले असेल ओ फिरांगोजींना, विचार करा !!!

आपणही आपल्या सहकार्यांबरोबर असेच वर्तन केले पाहिजे एखाद्या अपयशावर त्याचे कर्तुत्व ठरवून चालणार नाही, अश्या वेळी त्याच्या पाठीशी उभारून त्याला धीर देणे आणि पुढील मोहिमेसाठी त्याचे मनोबल उंचावणे हे एका म्होरक्याचे कर्तव्य असते.

ते म्हणतात ना, “You take care of your employee, they will take care of your client”.

त्यामुळे शिवाजी महाराजांसारखा व्यवस्थापनेचे धडे देणारा या जगात कोणी नसावा, शिवचरित्रापासून काय शिकावे हे मी तुमच्यावर सोडतो.

 

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

4 comments on “माणूस राखावाAdd yours →

  1. पाटील झकास एकदम
    मस्त 💖💖😘😘😘👌👌👌👏👏👏

  2. Your juniors must be very lucky. I think, when we become boss we should remember our old days and should treat our juniors,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *