indvicesp

शिवाजी महाराज आणि समुद्रशास्त्र !

शिवाजी महाराज आणि समुद्रशास्त्र (Shivaji Maharaj and ocean Technology)

indvicesp

(फोटो: नेट आभार)   

“शिवाजी महाराज” म्हणजे असे व्यक्तीमहत्व, जे ३५० वर्षे ओलांडून गेली तरीही पूर्णतहा उलघडत नाही. अगदी महाराजांचा जन्म कधी झाला आणि त्यांचा मृत्यू कसा झाला हे आजही एक कोडेच आहे. आपण महाराजांचा पराक्रम अगदी बऱ्यापैकी जाणून आहोत. काही इतिहासकारांनी तर ते अतिशय योग्य प्रकारे म्हणजे अगदी विश्लेशणात्मक मांडले आहे, अगदी तोरणा जिंकल्यापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत असंख्य अशा लढाया आपन पाहील्या ज्यामध्ये आपण महाराजांचा पराक्रम, राजकारण, मुत्सधीपना अशा अनेक गुणांचा अभ्यास केला.

साहजिक, ज्या घराण्यात महाराज जन्माला आले ते घराणे म्हणजे एक पराक्रमी घराणे आणि त्यामध्ये जिजाऊसाहेबांचे संस्कार आणि शिकवण, एक माणूस जो गडावरच जन्मला आणि सह्याद्रीच्या कुशीत खेळला आणि हाच लहानपणीचा खेळ बघता बघता इतका मोठा झाला की गगनाला भिडला. महाराजांनी सह्याद्रीत जे काही एक स्वतंत्र राज्य घडविले ते नक्कीच विशेष होते कारण भूगोलाचा आभ्यास, योग्य ते नियोजन आणि माणसांची योग्य ती परख. आता यावर खूप काही वाचून झाले आहे. बोलून झाले आहे, बर्यापैकी अभ्यास पण झाला.

आज सकाळी-सकाळी अजयदादांचा फोन आला आणि काही गोष्टींवर दादांनी खूप काही मार्गदर्शन केले आणि त्यामध्ये एक विषय झाला तो म्हणजे

“शिवाजी महाराज आणि समुद्रशास्त्र” (Shivaji Maharaj and ocean Technology).

आपण आजवर जो इतिहास वाचला किंवा ऐकला त्यामध्ये आपण “महाराजांचे आरमार” हा विषय मला वाटतंय जरा कमी आभ्यासला आहे, कारण नेहमी डोंगरदऱ्यात फिरणारा माणूस, गडकिल्ल्यात विशेष रुची असणारा माणूस “समुद्र” या विषयाकडे कसा वळला असेल ? आणि का वळला असेल ?

आता याचे ही उत्तर बऱ्याच जणांनी दिले आहे त्यामध्ये सगळ्यांना माहित असलेले वाक्य म्हणजे

“आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच. जैसे ज्यास अश्वदल त्याची पृथ्वी प्रजा आहे. तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र”.

सत्य आहे, पण हा विचार मनामध्ये कसा आला असावा ? आणि मग याची तयारी कशी केली असावी ? हा विषय जरा महत्वाचा.

१६५६ नंतर महाराजांनी भिवंडी-कल्याण जिंकले आणि जवळ-जवळ वयाच्या पंचविशीनंतर महाराजांनी पहिल्यांदा समुद्र पाहिला असावा, महाराजांच्या सुरवातीच्या २०-२५ वर्षांच्या कालखंडात त्यांचा समुद्राशी संपर्क आला असवा असे वाटत नाही. आता यामध्ये दोन गोष्टी ज्या मला मांडाव्या वाटतात.

“आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच. जैसे ज्यास अश्वदल त्याची पृथ्वी प्रजा आहे. तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र”. हे जाणून महाराजांनी समुद्र किनारपट्टीकडे लक्ष्य दिले असावे किंवा भिवंडी-कल्याण जिंकल्यानंतर समुद्र, आरमार आणि त्याचे महत्व ही कल्पना महाराजांच्या डोक्यात आली असावी.

या दोनीपैकी एक काहीतरी नक्कीच होते.

महाराजांना सह्याद्री आणि त्याचे महत्व हे काय १-२ वर्ष्यात कळलेले नसावे, किंवा अगदी लहानवयात म्हणजे ४-५ वर्ष्यांचे असतानाच त्याना सह्याद्री म्हणजे काय याचा आभ्यास नसावा, कळते झाल्यावर ज्यावेळी सह्याद्रीत फिरू लागले त्यावेळी सह्याद्री त्यांचा जवळचा मित्र झाला असणार म्हणजे महाराजांनी सह्याद्री या विषयाचा विशेष अभ्यास केला असावा आणि मग घौडदौड सुरु केली असावी.

सांगायचं एकच की कोणत्याही गोष्टीचा स्वता पहिला अभ्यास करणे मग पुढची सूत्र मांडणे हा गुण महाराजांचा आपल्याला इथे दिसतो.

“The secret of the man who is universally interesting is that he is universally interested.”
– William Dean Howells

“समुद्र”, हा काय सोपा आणि लहान विषय नाही, आजही समुद्र शास्त्र (Ocean Technology) हा एक Phd चा विषय आहे जो खूप मोठा आहे, २१व्या शतकात सुद्धा आज बरीच मोठी जहाज अंदाज चुकल्यामुळे समुद्राच्या तळाला जावून मिळाली ज्यामध्ये शकडो रुपयांचे नुकसान आणू मनुष्यहानी होते.

जेव्हा समुद्राचा विषय येतो, त्यामध्ये जहाज बांधन आणि त्यात बसून जान हे आहे का? त्यामध्ये बऱ्याच गोष्ठी आहेत जशा “जहाज कसे असावे”, “ते चालवावे कसे”, “कुणी चालवावे”, मग त्याचे शिक्षण कसे घ्यावे, “हवामानाचा अभ्यास”, “दिश्यांचा आभ्यास”, “भारती-ओहोटी” ज्यामध्ये खगोल शास्त्र येते. हे विषय महाराजांनी कधी अभ्यासले असावेत आणि कसे अभ्यासले असावेत ? आजच्या भाषेत सांगायचे झाले तर,

Technology Groups
Coastal and Environmental Engineering
Energy & Fresh Water
Marine Sensor System
Marine Biotechnology
Ocean Acoustics and Modelling
Ocean Electronics
Offshore Structures

हे सगळे विषय खूप महत्वाचे मग याचा अभ्यास असल्याशिवाय समुद्रात आरमार कसे उभारता येईल ?

अवघ्या १० वर्ष्यात महाराजांनी एवढे मोठ्ठे आरमार उभे केले.

अशा असंख्य गोष्ठी आहेत ज्या आभ्यासायला घेतल्या की वर्ष्यानवर्षे जातात. हे महाराजांनी कसे केले आणि कधी केले असावे.

आणि महाराजांनी याचा आभ्यास पहिला स्वता केला असणार आणि मग लोक तयार केली असणार. मुलखावर होणारे सततचे आक्रमण थोपवायचे आणि त्याचबरोबर प्रगतीही करणे आवश्यक. या सर्व गोष्टीतून महाराजांनी कसा आणि कधी वेळ काढला असावा ? आणि “समुद्रशास्त्र” या विषयावर कधी आभ्यास केला असावा याचा अभ्यास आपण करणे गरजेचे आहे.

समुद्रावर सत्ता असावी की नक्कीच संरक्षणासाठी पण महाराजांचा आभ्यास केला तर,
self defense is not an option to save your life, in fact attack is best way to save your life.

म्हणजेच महाराजंचे धोरण नुसते संरक्षण नव्हते, जसे इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच हे समुद्रमार्गे आपल्यापर्यंत आले तसे आपण ही त्यांच्यापर्यंत जावू शकतो आणि भविष्यात जावे लागेल हे ही एक कारण आरमार उभारण्याच्या पाठीमागे असू शकते.

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “शिवाजी महाराज आणि समुद्रशास्त्र !Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *