leap

मूर्खपणा आणि तारुण्य !

मूर्खपणा आणि तारुण्य

leap

फोटो आभार : इंटरनेट 

ज्या ज्या वेळी आपण आपल्या इतिहासाचा आभ्यास करतो किंवा संशोधन करतो त्यावेळी नक्कीच काहीनाकाही नवीन ऐकायला मिळते .. वाचायला मिळते. मग आपण खूप पराक्रमी आणि शूरवीरांच्या गोष्ठी ऐकतो त्यांचा इतिहास वाचतो.

प्राचीन भारतात गेले की आपल्याला “चंद्रगुप्त मौर्य”, “सम्राट अशोक” अशी नावे भेटतात, १७व्या शतकात गेले की आपल्याला “शिवाजी महाराज” हे नाव मिळते. यांच्या बरोबर किंवा यांच्याच काळात अशी अनेक पुरुष आणि स्त्रिया होवून गेल्या ज्यांनी आपल्या इतिहासाला एक वेगळीच कलाटणी दिली, यांचा इतिहास एवढा रोमांचकारी आहे की माणूस यामध्ये अगदी वाहून जातो, भारत भूमीचा इतिहासाचा आभ्यास सुरु झाला की आजचा वर्तमान नकोसा वाटू लागतो, लोकशाही असूनही आपणास त्यांचा काळच चांगला वाटू लागतो आणि भावनिक होवून आपण म्हणतो,

“राजे तुम्ही पुन्हा जन्माला या” !

आणि मग एक अशी वेळ येते की आपल्याला एक प्रश्न पडतो,

“कसे काय केले असेल राव या लोकांनी ?”

या प्रश्नाचे उत्तर मला चाणक्य यांच्या एका श्लोकात सापडते,

कष्टच खलु मूर्खत्व, कष्टच खलु यौवनम |
कष्टाकष्टा तर चैर परगे द्रुनिवासम ||

खरे दु:ख कशाला म्हणावे याविषयी उपदेश आचार्य चाणक्य यांनी या श्लोकातून दिला आहे. मूर्खपणा आणि तारुण्य हे दोन दु:खाचे आगर आहेत. मूर्खपणा केल्यावर हाती दु:खाशिवाय काही उरत नाही. त्याचप्रमाणे तारुण्यात अंगी असलेला उन्माद आणि उत्साहामुळे हातून घडोघडी अविचारीपणा घडत असतो. आणि हा अविचारीपनाच दु:खाला जन्म देत असतो. त्यामुळे तारुण्य हेही दुःखाचे मूळ बनू शकते.

मूर्खपणा आणि तारुण्य ही दोन्ही दु:खाची मूळ असली तरी या दु:खाचा कळस ठरावा असे एक दु:ख आहे आणि ते म्हणजे,

“दुसर्यांच्या घरी लाचारीने आणि गुलामीने रहावे लागणे”

ज्याप्रमाणे आपला देश बराच काल दुसर्यांच्या गुलामीत राहिला ९व्या शतकामध्ये जी आक्रमण सुरु झाली, तिथपासून ते अगदी १९४७ पर्यंत.

दुसऱ्याच्या गुलामीत राहण्याची वेळ येन यासारख मोठ कोणतेही दु:ख नाही, अशी वेळ आल्यावर माणसाला आपला स्वाभिमान आणि स्वातंत्र्य गमवावे लागते कारण अश्या जगण्यात होणाऱ्या मानसिक यातना ह्या नरकातील यातनांहूनही भयंकर क्लेशकारक असतात.

त्यामुळे कोणत्याही परीस्थित आपल्या मनाचे स्वतान्त्य गमवता कामा नये.

मग यातून बाहेर कसे पडायचे ?

धाडस आणि निर्भयता हे माणसाच्या ठायी असणारे आवश्यक गुण.धाडस म्हणजे धैर्य, कितीही वाईट परिस्थिती समोर आली तर तिच्यावर मात करण्यासाठी धाडस आवश्यक असते. या धाडसाला आपण आज “रिस्क घेणे” असे म्हणतो.

ज्यांनी खंबीरपणे धाडस केले तेच आपले ध्येय प्राप्त करण्यात यशस्वी झाले. हाच जगाचा इतिहास आहे.
धाडस नसलेली किंवा न करू शकणारी व्यक्ती परिस्थितीच्या वावटळात अगदी पाला-पाचोळ्यासारखी उडून जाते.

शिवचरित्र ही ओरडून ओरडून हेच सांगतय.

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

4 comments on “मूर्खपणा आणि तारुण्य !Add yours →

  1. खुप काही शिकण्यासारखं विचार करण्यासारखं..!
    वास्तुस्थती..!
    👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *