आपल्या तथाकथित संस्कारामध्ये जे काही शिकवले जाते आणि सांगितले जाते, त्या प्रत्येकाची मुळे या चौकटीतच पेरली जातात. नेहमी आयुष्याकडे पाहताना या चौकटीच्या मध्येच मनुष्याला उभे केले जाते, पूर्ण जीवन, जी काही गोष्ट मनुष्य करेल त्यातून …
— फायदा काय होईल ?
— आपले काही नुकसान अथवा तोटा काय होईल का ?
— सुख-समाधान कुठे आणि कसे मिळेल ?
याच विचारांमध्ये गोंधळून जावून जीवनाचा खरा अर्थ कुठेतरी हरवून बसतो ….
म्हणजे आपल्या आयुष्यातल्या हर एक कृतीला या चार बाबींनी बांधून ठेवले आहे, कदाचित याच गोष्टीमुळे जीवांचा अर्थ बदलला असावा, असे मला वाटते.
या चौकटीच्या बाहेर जावून विचार न केल्यामुळे, “ज्या गोष्टीचा माझा काही समंध नाही ते मी करणार नाही” मला जर फायदा असेल तरच मी एखादी गोष्ट करणार … असे बरेच काही, अश्या या संकुचित विचार प्रणालीमुळे माणूसच माणसापासून दूर चालला आहे.
जर वरील चौकटीतून मनुष्याला जर आपण बाहेर काढले तर मला वाटते त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल.
तो त्याच्या मनाचा आदर करेन आणि जीवनाचा अर्थ थोडा का होईना समजेल. म्हणजेच, याच चौकटीकडे जर बाहेरून पहिले तर नक्कीच हसू येईल, काय जीवन असते आणि आपण काय करत होतो याची थोडी का होईना प्रचीती होईल असे मला वाटते.
________________________________________________________________________________
यात दुसरा महत्वाचा भाग म्हणजे…..
“आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचे काय ? “
याचे उत्तर म्हणजे “पैसा” …
हीजी एक शिकवण आहे इथूनच मनुष्याच्या स्वार्थी वृतीला खतपाणी घातले जाते, त्याचा जीवनाकडे बघण्याचा अर्थ बदलला जातो …
प्रत्येक गोष्टीकडे फायद्यासाठी पहिले जाते, एवढेच काय “माणूस” सुधा “माणसाकडे” बघताना त्याच्या डोळ्यात …. “फायदा असेल तरच !! “ …. हे सरळ सरळ आजकाल दिसू लागले आहे.
“पैसा हा महत्वाचा आहे कि गरजेचा” हा खरे तर न सुटणारा प्रश्न आहे, पण कदाचित मनुष्याचे लहानपणापासूनचे संस्कारच याची व्याख्या पाहिजे तसी करू शकेल. पैश्यामुळे मनुष्य प्रय्त्येक गोष्टीकडे एका विचित्र नजरेने पाहत चालला आहे, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही ४ प्रकारामध्ये मोडली पाहिजे…
- Urgent and Important
- Urgent, But Not Important
- Not Urgent But Important
- Not Urgent , Not Important
कदाचित या चार गोष्टी आयुष्याचे समीकरण मांडायला उपयुक्त ठरतील. पैसा एवढा महत्वाचा आहे की मुलाच्या संगोपनापेक्ष्या गाडी, घर पैसा हे असणे महत्वाचे होऊन बसले आहे, ज्याला आजकाल “Well Settled” असे म्हणतात, म्हणजे जर तुमच्याकडे घर नसेल, ब्यांकेत पैसा नसेल तर तुम्ही अजूनही आयुष्यामध्ये स्थिर नाही, कधीही दारिद्र्य येऊ शकेल असेच काही म्हणावे लागेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे “मुलाला चांगल्या शाळेत (म्हणजे आजकालच्या so called International Schools , ज्या गल्ली-बोळात पहायला मिळतात) घातले तरच मुलगा चांगला शिकेल असा एक समज होवून बसला आहे, आणि त्याच्या मधल्या सुट्टीच्या डब्यामध्ये काय असते ?? तर “म्यागी”….
हे तर सोडा, निसर्गाला डीवचण्याचे कामही आम्ही केले हो …. आणि त्याचाच परिणाम आणि पावला-पावला वर पाहत आहोत.
जाता-जाता एकच गोष्ट सांगावीशी वाटते, माणसाने जीवन जगण्याची व्याख्या अशी करून ठेवली आहे की ती मरनापेक्ष्याही आवघड आणि भीतीदायक वाटू लागली आहे.
– सेवेचे ठायीतत्पर.
लवटे-पाटील, सांगलीकर.
पैसा, आयुष्य, माणुसकी ??
की माणुसकी, आयुष्य पैसा…