भारतात पाहिल्यानं १७९ इंग्रज आले , नंतर १००० झाले , नंतर १०,००० आणि नंतर १,००,००० झाले आणि या एक लाख इंग्रजांनी आपल्या ३० करोड जनतेवर राज्य केले. कसे बर शक्य झाले ???
कारण जे १७९ पहिल्यांदा आले होते त्यांनी आपला लोकांचा चांगला आभ्यास केला होता आणि त्यांनी एक निष्कर्ष काढला जो आजही २०१२ सालीही लागू होतो तो म्हणजे भारतीय लोकांना “जाती-भेद, धर्मभेद, गरीब-श्रीमंत, प्रांत भेद या गोष्टीनमध्ये पेटवायचे मग हे ३० काय ३०० करोड जरी झाले तर कधीही आपल्याबरोबर लढणार नाहीत कारण ते एकमेकांनाच कापत बसतील. कधीही एक होऊ शकणार नाहीत एवढा द्वेष मनामध्ये भरेल.
मी मराठा, मी धनगर , मी ब्राहमण, मी दलित .. मी आमुक आणि मी तमुक…. झाल यातच आम्ही आमचे श्रेष्ठत्व मानतो. मग बाहेरची ४-५ हिजाडी जरी येऊन आम्च्या वट्यात मुल देऊन गेली तरी चालेल आम्हाला.
आज आम्ही एवढे मोठे झालो आहे की थोर युग पुरुषांच्याही वाटण्या केल्या आम्ही… मी अविनाश धर्माधिकारी यांच्या एका व्याख्यात ऐकले , शहरातील काही युग पुरुषांचे पुतळे एकत्र येतात , टिळक म्हणतात मी ब्राह्मणांचा झालो, आंबेडकर म्हणाले मी दलितांचा , छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले मी मराठ्यांचा, मल्हारराव होळकर म्हणाले मी धनगारांचा आणि शेवटही गांधीजी म्हणाले बाबानो तुमच्या पाठीशी एखादी जात तर आहे माझ्या पाठीशी तर फ़क़्त सरकारी ऑफिसच्या भिंतीच…
असो…..
पण आम्ही सुखी आहोत या मध्ये !!!! आणि असेच आम्ही राहणार .
सध्याचेच उदहारण घ्या एक सध्या कुत्र्याच्या पुतळ्यासाठी धनगर-मराठा एकमेकाचे रक़्त पिण्याच्या मार्गावर आहेत. इतिहास काहीही असो पुतळा कोणी बांधला , का बांधला पण जरातर माणसाने विचार करावा ? हा एकच विषय आहे का ?
आम्हाला सगळ बाहेरचच बर वाटत. रामदेव बाबाच बगून आम्हाला योगा नाही शिकायचा, ज्या इंग्लिश पोरी इथे येऊन रामदेव बाबा कडून शिकून जातात आणि नंतर एक सी-डी बनवतात मग ती सी-डी पैसे देऊन आम्ही विकत घेणार आणि ते बगून शिकायचं आहे . का तर एक गोरी पोरगी इतबर कपडे घालून शिकवत असते ना !!! “बाई-बाटली” या भानगडीत आम्ही दरोडेखोर, गुंड, अश्या लोकांच्या हातात देश चालवायला देतो मग ही काय लय मोठी गोष्ट झाली,आणि नंतर मग उगच आपल बोंबलायचं.
माणुसकीची भाषा बोलली की लोकं म्हणतात जुन्या विचाराचा आहे कधी आयुष्यात पुढे जाणार नाही. ठीक आहे हो तसे असेल तर जाणार नाही पण नक्कीच पुढे जाऊन तोंडावर पडणार नाही.
असो … पटल तर ठीक नाहीतर चार आया-बहिणीवरून शिव्या देऊन विषय सोडून द्या.
– प्र.ब.ल.
0 comments on “आपल्या देश्याचे दुर्दैव” Add yours →