IMG_20160528_113928_HDR-01

प्रश्न तोच !

प्रश्न तोच

IMG_20160528_113928_HDR-01

वारे उलटया दिशेने वाहत होते,
मला पाठीमागे सारत होते,
“प्रश्न तोच होता …
नदीच्या पल्याड जायच का आल्याड रहायच”

थांबायच नाही असच ठरवल होत,
पण जायच कस हे समजत नव्हतं,
“प्रश्न तोच होता …
नदीच्या पल्याड जायच का आल्याड रहायच”

माती मागे ओढ़त होती, आभाळ पुढ खेचत होत,
पाय मातीत रुतले होते, हाताला आभाळ येत नव्हतं,
“प्रश्न तोच होता …
नदीच्या पल्याड जायच का आल्याड रहायच”

————————————————–

#उनाड_भक्त
कवी: प्र.ब.ल.

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “प्रश्न तोच !Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *