वाटलं नव्हतं…
आत्ता कुठेतरी सारं काही जुळून येत होतं,
गुंतलेेलं धागं पुन्हा जुळत व्हत
मधुनच तार तुटल अस कधीच वाटलं नव्हतं…..
खुप काही समजवलं, खुप काही कमवलं
राहून काय गेलं हे समजत नव्हतं,
मधुनच तार तुटल अस कधीच वाटलं नव्हतं…..
कोणत्या जन्माच पाप पदरात पड़लं हे कळत नव्हतं,
मध्येच एकटं पड़लं असं वाटलं नव्हतं,
मधुनच तार तुटल अस कधीच वाटलं नव्हतं….
प्रत्येक पाऊल जड़ का होतं हे कळत नव्हतं,
रस्ता तोंड का फिरवत होता हे समजत नव्हतं,
मधुनच तार तुटल अस कधीच वाटलं नव्हतं….
सगळ काही माझच होतं, तरिपन परकं वाटत होत,
मधुनच तार तुटल अस कधीच वाटलं नव्हतं….
————————————————–
#उनाड_भक्त
कवी: प्र.ब.ल.
0 comments on “वाटलं नव्हतं…” Add yours →