FB_IMG_1465360892806

आई

आई

FB_IMG_1465360892806

 

जन्मल्यावर पहिला शब्द बोलायला शिकलो तो “आई”,
समाजात जेव्हा ठोकर खाल्ली तेव्हा तोंडून शब्द बाहेर पाडला तो “आई”…
स्वताचा शून्य आभ्यास असताना , तू मला इथे पर्यंत पोचवल तू आई,
पण एवढे शिकूनही आज परत भीती वाटू लागली आहे ग आई,
आज परत आधार पाहिजे तुज्या कुशीचा ग आई …

अंधारात तू मला चालायला शिकवलस ग आई,
पण आज एवढ्या मोठ्या उजेडातही मला चालताना भीती वाटू लागली आहे ग आई …
निस्वार्थी जीवन जगण्याची कला तू मला दिलीस,
पण आज प्रतेकाच्या डोळ्यात मी स्वार्थच पाहतोय ग आई,
आज परत आधार पाहिजे तुज्या कुशीचा ग आई …

बोट धरून तू मला चालायला शिकवलस ..
पण आज मात्र उभे राहायला सुद्धा भीती वाटू लागली आहे ग आई,
सगळेजण आहेत माझ्या बाजूला , पण तुजी उणीव जाणवते ग आई,
आज परत आधार पाहिजे तुज्या कुशीचा ग आई …

————————————————–

#उनाड_भक्त
कवी: प्र.ब.ल.

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “आईAdd yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *