माझ कोनीच नाही
दुःखांचा डोंगर संपता संपत नाही,
सांगावे कोणाला हेही समजत नाही,
एवढ्या गर्दीतही माझ कोनीच नाही.
दिशांनीही मला जवळ घेतल नाही,
कुठे जाऊ याच भानच मला नाही,
एवढ्या गर्दीतही माझ कोनीच नाही.
माझाच माझ्यावर ताबा राहिला नाही,
दोष मी कधीच कोणाला दिला नाही,
एवढ्या गर्दीतही माझ कोनीच नाही.
प्रश्नांची माझ्यासमोर कमी नाही,
उत्तरांच्या शोधात मला भरकटायच नाही,
एवढ्या गर्दीतही माझ कोनीच नाही..
एवढ्या गर्दीतही माझ कोनीच नाही….
————————————————–
#उनाड_भक्त
कवी: प्र.ब.ल.
0 comments on “माझ कोनीच नाही …” Add yours →