फोटो आभार : इंटरनेट
लहान असताना आई वडील सांगायचे, शाळेत गुरुजी सांगायचे, कॉलेजमध्ये काही सज्जन मित्र सांगायचे, आज काही सज्जन सहकारी सांगतात, की “जाऊ द्या ओ, कशाला मुर्खांच्या नादाला लागता“.
अगदी बरोबर आहे. पण अडचण एकच आहे की, काही हरामखोर लोकांना आपण नेमके किती हरामखोर आहोत याची जाणीव नसते, आणि यातच ते इतका हरामखोरपणा करतात की याचा समाज आणि देशाला खूपच त्रास होतो आणि काही प्रमाणात नुकसानही होते.
एका वाघाची गोष्ट आहे बघा, वाघ तसा लाजाळू प्राणी असतो. भूक नसेल तर तो अजिबात कोणाची शिकार करत नाही. आणि भूक असेल तर मग तो या जगातल्या कोणत्याही प्राण्याची शिकार करू शकतो.
काय होते, एक दिवस वाघ शिकार करतो आणि खाऊन निवांत बसलेला असतो. एक कुत्रा सारखा त्याला डिवचत असतो. पण वाघ लक्ष देत नाही. म्हणतो कशाला मुर्खांच्या नादाला लागायचं. कुत्रा जरा जास्तच करत. मग वाघ पण चिढतो आणि त्याचा पाठलाग करतो. कुत्र काय करत की चिखलात जाऊन बसते. आता ते कुत्र … गु सुद्धा खात … चिखलात सुद्धा लोळेल. पण वाघ, म्हणतो जाऊ द्या कशाला मुर्खांच्या नादाला लागायचं आणि चिखलात जायचं. मग वाघ परत येतो. पुन्हा कुत्र येत आणि त्याला छळत. यावेळी वाघ त्याच्या मागे लागत नाही. कारण वाघाला माहीत आहे की हे हरामखोर चिखलात जाऊन बसणार आणि आपण विषय सोडून देणार.
याचा परिणाम बघा आता …… कुत्र्याला वाटत, वाघ आता मला भितोच आणि आता मी वाघाची वाट लावू शकतो. साहजिक आहे कोणीतर माघार घेत म्हणजे तो त्याचा दुबळेपणा समजणारी जनता असतेच आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा हे त्यांना माहीत असत. म्हणून ते त्याची बाकीची कुत्र संघटना बोलवत आणि सगळी कुत्री मिळून त्या वाघाला पळवून लावतात.आणि वाघाच्या राज्यात कुत्र्यांचं राज्य येत. काय दुर्दैव हो ….”वाघाच्या सिहासनावर कुत्र”. कल्पना सुद्धा केली तरी झीट येते.
आणि याच मुळे मला वाटतंय सामाजिक आणि राजकीय व्यवस्था बदलली आहे. म्हणून मला या कथेमध्ये थोडासा बदल करावा वाटतो. कथेमध्ये वाघ कुत्र्याचा पाठलाग करत आणि कुत्र चिखलात जाऊन बसत, आणि वाघ परत येतो……
नाही ….नाही ….नाही ….
वाघाला तिथे बाजूला बसून रहायला पाहिजे. ते कुत्र कितीवेळ बसेल ओ चिखलात. एक तास ? दोन तास ?? तीन तास ???.
काही वेळां झक मारत बाहेर येईल ना. त्यावेळी त्याला असा फाडला पाहिजे की त्याला त्याची औकात समजली पाहिजे.
म्हणून म्हणतो समाजातील अशा कुत्र्यांकडं जाऊ द्या म्हणून सोडून दिले नाही पाहिजे. वेळीच ठेचला पाहिजे.
लक्षात घ्या जर वाघांची संख्या कमी झाली की कुत्र्यांचा माज वाढतो.
आणि एकदा कुत्र्यांचा माज वाढला की, वाघाला नुसता त्याच्या भूतकाळातल्या कथा आठवत बसण्याशिवाय पर्याय राहत नाही.
पाटील एकदम सडेतोड ओ..!👍👌
Agadi Barobar
Right on target bhawa
You got it Dada