13269287_10154129824225295_3804191585906045563_n

युवराज संभाजीराजे छत्रपती आणि बुद्धिप्रामाण्यवाद्यांचा पोटशुळ

सर्वप्रथम मी एक गोष्ठ सांगू इच्छितो की माझा आणि राजकारणाचा काढ़ी मात्र संबंध नाही आणि संभाजीराजे मला ओळखत सुद्धा नाहीत. मला ना त्यांना समर्थन द्यायचे आहे ना विरोध करायचा आहे. लगेच ब्रिगेड़ी वगैरे म्हणुन चर्चेला वेगळे स्वरुप न देने.

आज मराठी प्रदेशात असंख्य राजकारणी आहेत आणि कोट्यावधी शिवप्रेमी आहेत. सगळे जन आपापले कार्य करत आहेत. आणि हे कार्य करत असताना समर्थन होते आणि विरोधही होतो. कारण मराठी प्रदेशात दोनच जाती आहेत त्या म्हणजे “समर्थक” आणि “विरोधक”. आणि मराठी प्रदेशात एक समूह असा आहे की, काही कारण नसताना उग काहीतरी खोड काढायची , बर .. एकदा झाल… दोनदा झाल … तिनदा झाल …. मग पुढच्यान प्रतिउत्तर दिले की तो लगेच ब्रिगेड़ी होतो. थोडक्यात काय त्या समुहाला जर हलकासा जरी विरोध केला की तुम्ही ब्रिगेड़ी. नाहीतर मग यांचे सगळे खरे म्हणा मग तुम्ही चांगले. हे आजवर ठीक होते. आता कस चालेल.

असो … आपण आज स्वताला जागृत नागरिक आणि सुसंकृत नागरिक असे म्हणुन घेतो. याचे भान आपण कोनाबद्दलही मत मांडताना ठेवले पाहिजे. आज बऱ्याच जणांना संभाजीराजे खासदार झाले या गोष्टिला विरोध आहे. असावा, आसलच पाहिजे आणि विरोधक असायलाच पाहिजेत. पण तो विरोध दर्शवताना थोड़ी लाज, शरम बाळगावी आणि भाषा ही तशीच वापरावी. स्वता घानेरडी भाषा वापरायची आणि दुसऱ्याना ब्रिगेड़ी म्हणायचे. एकाने गाय मारली की लगेच दुसऱ्याने वासरु मारायचे मग दोघात फरक तो काय ?

२०१४ साली आम्ही रायगडावर पुरातत्व खात्याच्या ढिसाळपणा बाहेर आणला होता. आणि तो फेसबुकवर इतका गाजला की हे प्रकरण दिल्ली पर्यंत गेले. यावेळी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये संभाजीराजे एका हाकेवर आले. पण इतर मराठी प्रदेशातील नेत्यांनी किंवा शिवप्रेमींनी याची किती दखल घेतली ? कोणी प्रयत्न केला ? कोणीच नाही. एक आम्हीच मुर्ख होतो स्वताच्या जिव धोक्यात घालून या भानगडी करत होतो. त्या स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये मी स्वता वीडियो मध्ये होतो आणि त्या अधिकाऱ्याची वाट लावली होती. कुणी काय डाव करल का याची भीती माझ्या बायकोला होतीच. मुद्दा हा की किती शिवभक्त आले. गडावर प्रेम करणारे आणि वर्ल्ड हेरिटेजला विरोध करणारे कुठे लपून बसले होते त्यावेळी ? कोणता नेता पुढे आला सांगा ?


आता दुसरा मुद्दा, संभाजीराजांनी राजकारणात जायच का नाही ?

एक लक्षात घ्या, काहीतरी करायचे असेल तर व्यासपीठ पाहिजे. नुसताच प्रेक्षक वर्गात बसून बोम्बाबोम्ब करुण काही होत नाही. किंवा प्रशाषनाच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकुन तर काहीच होत नाही. मग जर एखादा माणूस मराठी प्रदेशातल्या असंख्य तरुणांचे स्वप्न घेवून दिल्लीला जात असेल तर जाऊ द्या ना. काय होईल ? एकतर तो काम करील किंवा नाही करेल. पण हे पाहण्यासाठी वेळ द्या ना. आज दोन वर्षात मोदींनी काय केले असे प्रश्न पण लोकांना पडतातच की. शरद पवार यांच्या नावानं तर रोज शंक मारतात. म्हणजे जो राजकारणात आहे तो वाईट माणूस. तस असेल तर मग स्वताला जे चांगले आणि हुशार म्हणतात त्यांनी तर राजकारणात जाव. आणि राजकारण म्हणल की एखादा पक्ष निवडावा लागतोच ना. मग भाजपकड़ गेल की भाजपविरोधी लोक शंक वाजवनार आणि कांग्रेसमध्ये गेल की मग काय विचारुच नका. आणि हे फार पूर्वीपासून चालत आले आहे. आणि चालत राहणार. आज या भारतात फार कमी लोक आहेत हे राजकारणाच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत एकाच पक्षाशी एकनिष्ठ आहेत किंवा होते. परिस्थिति बघुन आपले डाव मांडणे यालाच राजकारण म्हणतात ना. मग इथे भावना आणि समाजसेवा कशाला मध्ये आनायची. काही लोक म्हणतात छत्रपती या गोष्टिचा फायदा करुण घेतला. आओ, शिवाजी महाराज या मनुष्याचे भांडवल आज किती जणांनी केले. ज्याना शिवाजी महाराजांचा जन्म नक्की कधी झाला, त्यांचा इतिहास नेमका काय आहे याचा कसलाही गंध नसताना त्यांनी महाराजांचा वापर अतिशय योग्य रित्या केला. मग संभाजीराजे तर त्यांचे वंशज आहेत आणि तो त्यांचा हक्क आहे. मग दुखन नेमके काय आहे ?


काही लोक म्हणतात, संभाजीराजांनी गड़किल्ल्यांचा विषय धरून लाखो तरुणांची दिशाभूल केली.

बर, अस समजू केली त्यांनी फसवणूक. त्यात तुमच काय नुकसान आहे का ? तुम्ही काय केले आहे गड़किल्ल्यांसाठी. पुरातत्व खात्याच नाव लावून काय केले आजवर? आणि मलोजीरावसारखा तरुण शिखा जैन सारख्या मात्बर मंडळींच्या मागे लागून काहीतरी करू इच्छितात तर म्हणे शिखा जैन कशासाठी ? इथे भरपुर लोक आहेत. मग आजवर कुठे लपून बसले होते ? आजवर तुम्ही का नाही केले मग … आणि तुम्ही केले काय ? तुम्ही जे काही किल्ल्यांवर केले आहे त्याचा आदर आहेच आणि त्याबद्दल माझे दंडवत आहेच तुम्हाला. मग अजुन कोणी दूसरे काही करत आहे तर पोटशुळ का? बर शिखा जैन यांच्या कार्यक्रमाला तुम्हालाही बोलावले होते. अशावेळी तुम्ही जाणीवपूर्वक येत नाही आणि नंतर फेसबुकवर वाद करत बसता. यास काय म्हणावे ? मग संभाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली मलोजीराव काहीतरी करीत आहेत मग त्यांच्या मध्ये पायगोआ का टाकता हो? आणि हे सर्व करुण तुम्ही अशा तरुण कर्तुत्ववान लोकांना ब्रिगेड़ी म्हणता. गड़किल्ल्यांचे कार्य दुसऱ्याकोणी करायचेच नाही का? का तुम्हाला श्रेय दुसऱ्या कोणाला द्यायचे नाही. मग हे तुमचे किल्ल्यांवर प्रेम म्हणायचे का भांडवल ?

लोकांनी आन्ना हजारे यांना डोक्यावर घेतले, केजरीवालला डोक्यावर घेतले आणि काही दिवसांनी त्यांचीच लायकी काढू लागले. मोदींच्या वेळी तर लोक वेडे झाले होते आणि आज हेच लोक मोदींची लायकी काढत आहेत. हे सगळ जमत तर मग पुढे होवून, सर्वाना हाताला धरून कार्य करा ना. फक़्त आम्हीच करणार हा हट्ट का? म्हणुन कोनाबद्दल मत मांडताना स्वताची वृत्ती आणि शहानपण तपासावे मगच बोलावे

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “युवराज संभाजीराजे छत्रपती आणि बुद्धिप्रामाण्यवाद्यांचा पोटशुळAdd yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *