sairat-2

सैराट आणि बुद्धिप्रामान्यवाद्यांचा पोटशुळ : भाग 1

एका मराठी माणसाने एक अतिशय संवेदनशील असा सिनेमा काढला आणि काही (अ) मराठी लोकांचा नितंबशुळ सुरु झाला, हेच शहाणपण “बाजीराव-मस्तानी” या सिनेमाच्या वेळी यांनी दाखवले होते.बायकोच्या सुचनेपोटी(भीतिपोटी) शब्द सौम्य ठेवण्याचा प्रयत्न या पोस्ट मध्ये मी केला आहे.

काही अतिशाहान्या लोकांनी काही मुद्दे उपस्थित केले त्यावर आपण जरा एक जागृत नजर टाकू.

१) अल्पवयीन मुलगी लफड्यात पडते तेंव्हा अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात घेवून लैंगिक शोषण, अल्पवयीन मुलगी पळून जावून लग्न करते तेंव्हा,काय अवस्था होते…. बापाची…भावाची बहिणीची, आईची अन कुटूंबाची..कल्पना करा…. त्या अल्पवयीन मुलीच्या ठिकाणी आपली मुलगी पहा.

==> मला वाटते ही पोस्ट टाकण्यात खुप घाई केली आहे त्या मनुष्याने, कदाचित जास्तीचे LIKE मिळवण्याच्या नादात हे कार्य केले असावे. मला या मुर्ख माणसाने एक सांगावे अल्पवयीन याची मर्यादा काय असते, किती वय म्हणजे अल्पवयीन म्हण्याच ? सिनेमात आर्ची आणि परश्या हे FY BA ला असतात म्हणजे १८ वर्षे पूर्ण झाल आहे. तुम्हाला नेमकं काय माहीत आहे जरा सांगा. आणि लफडी म्हणजे काय ? मला वाटतंय यांना प्रेम म्हणजे लफड़ हेच यांच्या आई बापान शिकवल असाव आणि यांच्या आई बापान पण लफड़ केल असणार. सिनेमात कुठे लैंगिक शोषण आहे का? सिनेमा पाहिला का भाऊ आपण ? आहो ज्या पात्राला नॅशनल अवार्ड मिळाला, ते अवार्ड देणारे मुर्ख आहेत का? त्यांना काही अक्कलच नसावी का? प्रेमाला लफड़े असे म्हणनारे किती हरामखोर आहेत यावरून दिसते. आणि म्हणजे आजचे तरुण बिघड़तील. एका सिनेमाने तुमची पोर बिघड़नार का? लोकमान्य टिळक सिनेमा आला होता तो पाहुन झाली का तुमची पोर लोकमान्य टिळक? स्वामी समर्थ सिनेमा पाहुन सुधारली का तुमची पोर? “नो इंट्री, पुढे धोका आहे” या सिनेमातली चड्डीवर फिरणारी साईं ताम्हणकर तुम्ही सह कुटुंब पाहिली असणार, त्यावेळी मुलांना काय पड़द्याकद ढुंगन करुण बसवले होते का? आहो मूल घडण्यात जास्त वाटा तुमच्या राक्ताचा असतो. तुमच्या राक्तातच दोष असेल तर त्याला एक सिनेमा काय करणार ?. आणि मुलांच्या बिघडण्याची कारण तुम्ही असली बिनबुडाची देवून स्वताच्या नाकरतेपनाचा दाखला कशाला देताय. जर संभाळायची होत नसतील तर लय दवाखाने आहेत पुण्यात जावा आणि घ्या उपाय करुण.

२) या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शकांना नि कलाकारांना व सर्वच टिमला म्हणे सामाजिक प्रबोधन करायच आहे. या प्रबोधन कार्यासाठी बालकलाकारांची प्रेम प्रकरण दाखवण गरजेच आहे का. ?

==> वरती संगीतल्याप्रमाणे या सिनेमातली पोर बालक नाहीत. १८ वर्षे पूर्ण आहेत म्हणजे समजुतदार आहेत आणि मोठी झाली आहेत. राहिली बात प्रेमाची. वय काय असते हो प्रेमाचे? घटनेत काय कायदा आहे का याबद्दल? बॉबी, एक दूजे के लिये हे सिनेमे पाहिले का? लग्न झाल्यावर जे स्वताच्या बायकोवर नीट प्रेम करू शकत नाहीत ते प्रेमाची व्याख्या सांगत आहेत. नक्की दुकन काय आहे? हा जर या सिनेमातली स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे असती तर डोक्यावर घेवून नाचले असते आणि जर सुबोध भावेने सिनेमा काढला असता तर ऑस्करसाठी पाठवला असता. आणि हो पुणे-मुंबई-पुणे या सिनेमात नट-नटीचे वय काय होते? २ मुलांचे आई बाप होते का ज्यांच्यात प्रेम झाले?

३) या चित्रपटांच्या पटकथेचा आदर्श घेवून ग्रामीण तसेच शहरी भागात शालेय विद्यार्थ्यांमध्ये आंबटशौकीनपणा वाढीस लागलाय.

==> ग्रामीण भागतल्या लोकांना तुमच्यापेक्षा १० पाटीन अक्कल जास्त आहे. प्रेम, आदर, भावना हे काय असते हे ग्रामीण भागतल्या लोकांना विचारा. सेक्स करने म्हणजे आंबट शौक़ीन का? शहरात पोर पोरींची दिसणारी बेम्बी आणि जीन्स मधून दिसणार मादक शारीर याकडे बघुन ठरवतात प्रेम करायच का नाही ते, गावाकड पोरी केसापासून टाचेपर्यंत शरीर झाकून असतात. असच प्रेम येत नाही ओ … काय सांगताय तुम्ही आंबट आणि संबट .. मुलाला बेडरूम मध्ये पाठवून फॅशन टीवी आणि M टीवी बघनारे तुम्ही आंबटपणा काय असतो हे शिकवता वह्य.

४) तुम्ही जर आतंकवादी याकुब मेमनची फाशी रद्द व्हावी म्हणून नमाज पढणार्या “रोहित वेमुलाचे” समर्थक असेल तर नागराज मंजुळेचा “सैराट” अवश्य पहा….
होय… फँड्री आणि आता सैराट फेम नागराज मंजुळे हा रोहीत वेमुला सारख्या विचारसरणीचे उदात्तीकरण करणारा माणुस आहे .

==> याकूब मेमन बद्दल काय माहीत आहे हो तुम्हाला? याचे समर्थन करणारा नागराज एकटा होता का? डोळ्यासमोरची धर्माची पट्टी काढ़ा आणि मग बोला. याकूब मेमन सरकारी गवाह होता. यावर जास्त माहिती हवी असेल तर एखाद्या शान्या वकिलाकडे जावा. आणि हो हे दोन्ही मुद्दे वेगळे आहेत बर का.

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची ऊंची मोजायची ती स्वताची राजकीय ऊंची वाढवन्यासाठी अंशांनी देशप्रेम काय असते हे न शिकवलेलच बर

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “सैराट आणि बुद्धिप्रामान्यवाद्यांचा पोटशुळ : भाग 1Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *