एक नवीन मुद्दा उपस्थित केला आणि तो आमच्या भैयारावांनी मांडला. मुद्दा योग्य आहे का अयोग्य आहे यावर जरा नजर टाकू. जातपात या गोष्टीचा तिरस्कार मला जाम आहे पण आज हा मुद्दा मांडण महत्वाच वाटल.
एक महामूर्ख माणूस म्हणतो “बाई वाड्यावर या असे म्हणणार्या पाटलांची पोरगी उसात घुसली”.
(या सिनेमात कुठेही उसात घुसून नट-नटींनी प्रेम केले नाही, या येड्याने कुठे पहिले माहित नाही)
इथे या मुर्क माणसाला “पाटील” या पदाचा किती अभ्यास आहे माहित नाही पण अक्कल पाजळायचा चांच कोण सोडत नाही. या सिनेमात पाटील हे आडनाव दाखवले आहे जे आडनाव नाहीच. पण गावात दरारा हा पाटलांचा असतो यात कोणाचे दुमत असू शकत नाही. पाटील हे पद इतिहासात अनेक जातीच्या लोकाना मिळालेले आहे फ़क़्त मराठा या जातीला नाही त्यामुळे पाटील म्हणजे “मराठा” असे समजून मराठा समाजाबद्दल उगाच काहीही बोलू नये आणि जर बोललात तर मग पाटील हा पाटीलच असतो हे ही समजून घ्या. पाटील म्हणजे मराठा असे अजिबात नाही. त्यामुळे पाटील म्हणजे मराठा समजून मराठा समाजावर काहीही गु ओकनाऱ्यांनी स्वताची आक्कल तपासून पहा. मराठा समाजान अन्याय केला, अत्याचार केला असे म्हणनाऱ्यांनी स्वतःचा अभ्यास करावा आणि समजून घ्यावा मग दुसर्यावर चिखलफेक करावी. स्वताचे कर्तुत्व स्वतःच्या कार्याने सिध्द करा. इतर समाजावर टीका करून नव्हे.
आणि अत्याचार हा कोणता समाज करत नसतो तर ती व्यक्ती करत असते. आणि ज्याच्या हातात सत्ता आहे त्याला थोडाका होईना माज असतोच मग तो कोणत्याही समाजाचा असो. आणि सैराट सिनेमामध्ये पाटील या पदाचा माज दाखवला आहे. तो प्रिन्स नाही का मास्तरला वर्गातच कानाखाली वाजवतो, तर तो माज असतो “पाटील” या पदाचा. मराठा असे नाही.
तर उगच आक्कल पाजळण्यात काहीही अर्थ नाही. आपापसात वाद घालत बसण्यापेक्षा मुख शत्रू कोण आहे ज्याने सर्वच समाजाची वाट लावली, इतिहास झाकला, खऱ्या अर्थाने अत्याचार केला हे लक्षात घ्या. बाह्रून जे आले त्या सगळ्यांची “Divide & Rule” ही Policy होती आणि बाहेरचे आजही इथे आहेत आणि आजही ते हेच करत आहेत. तर हे सगळ सोडा आणि शहाणे व्हा.
(मी मराठा या जातीचा नाही, तुम्ही म्हणाल हा मराठा आहे म्हणून समर्थन करतो आहे).
0 comments on “सैराट सिनेमा आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा पोटशूळ: भाग २” Add yours →