bajirao-ranveer-deepika-BHG1

बाजीराव मस्तानी चित्रपट आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा पोटशूळ!

बाजीराव मस्तानी सिनेमा प्रदर्शित झाला आणि अनेक इतिहासकारांना शहाणपण सुचू लागले, काही अतिशहाणे म्हणतात की आजवर बाजीरावांच्याबद्द्दल कोणालाही काही पडलेलं नव्हतं, पण चित्रपट आल्याने अनेकांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतले वगैरे वगैरे …

हाच यांचा शहाणपणाचा भाग, यांना असे वाटते की आभ्यास म्हणजे जो काय यांनीच केला, बर थोड्यावेळासाठी मी मान्य करतो की कुणीही आजवर बाजीरावांचा आभ्यास केला नव्हता, सिनेमा आला आणि आभ्यास सुरु केला, आणि तुम्ही तर खूप मोठे इतिहासकार ज्यांनी बाजीराव म्हणजे “मस्तानीवाला बाजीराव” हे ब्रीद वाक्य समाजात रुजवले मग तुम्ही काय दिवे लावले आभ्यास करून ? बंसालीने सिनेमा काढला म्हणून काही लोकाना बाजीराव या प्रकरणात रस आला आणि खरे-खोटे काय ये जाणून घेण्यासाठी त्यांनी पुस्तक उघडली, यात मला गैर काय वाटत नाही. यांना गैर वाटत असेल, कारण खर काय आहे ते लोकांना कळेल याची भीती कदाचित यांना असेल.

“बाजीराव राजा नाही, छत्रपतींचा सेवक आहे” हे वाक्य लोकांनी फ़ेमस केले कारण ही तसेच आहे, या वाक्यात शाहू हे इतिहासातले महान व्यक्तीमहत्व आज जगभरात पुढे आले जे तथाकथित इतिहासकारांनी झाकून ठेवले होते.कारण छत्रपती घराण्याला यांचा अगदी शिवाजी महाराजांपासून विरोधच आहे, मग या वाक्याने शरीराचा पृष्ठभाग थोडा दुखावला जाणारच ना. “बाजीराव राजा नाही, छत्रपतींचा सेवक आहे” या पोस्ट ज्या लोकांनी टाकल्या त्या बाजीरावांची असेलेली शाहू महाराजांबद्दलची स्वामीनिष्ठा हे दाखवण्यासाठी होती, याला विरोध करणारे एकतर शाहू महाराजांचा द्वेष करणार्यांपैकी असतील किंवा बाजीरावांचा द्वेष करणार्यांपैकी असतील, तुम्ही कोणत्या बाजूचे तुम्हीच ठरवा.

बाजीराव किती चांगले, कसे सर्वधर्मसमभावी, पुरोगामी वगैरे यावर चार बंद भरतील एवढे लेख लिहीले असे काहीजणांचे म्हणणे आहे, मग तुमच का दुखतय ? तुम्ही का लिहिले नाही आजवर ? तुम्ही बाजीराव म्हणजे बाईवेडा असेच सांगितले. तुम्ही बाजीरावांशी मस्तानी अशी जोडली की तो माणूस म्हणजे बाईवेडा हेच तुम्ही आजवर सांगितले, बंसालीने बाजीराव एक महान योद्धा होता आणि एक चांगला पतीही होता हे जगाला दाखवले आणि बाजीरावाला जो काही विरोध झाला तो घरातूनच.

राधाबाई, चिमाजी आणि नानासाहेब हे सोडून मस्तानीला विरोध करणारे आणि बाजीरावाला मनस्ताप देणारे तिसरे पात्र सांगा, जर तुमचा एवढा अभ्यास असेल तर ? हां, पुण्यातल्या काही कर्मट ब्राह्मणांनी (सगळेच कर्मट नव्हते, स्वामीनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम असणारे पण होते ज्यांचा आज आदर संपूर्ण भारत करतो ) याला जाम विरोध केला कारण धर्म आढवा येत होता ना ….. मग तुम्हीही धर्मवेढेच, तुमच्यात आणि औरंगजेबात जर फरक करायचा झाला तर त्याने शरीराच्या कत्तली केल्या आणि तुम्ही भावनांच्या. हा मग भावनांच्या कत्तली करणे हे पाप नसेल तर मग तुम्ही विष्णूची अवतार आणि औरंगजेब राक्षसाचा अवतार असे म्हणता येईल म्हणजे तुम्हाला पण जरा बरे वाटेल.

काही लोकांचे म्हणणे आहे, “बाजीराव जातीने ब्राह्मण का मराठा असल्या प्रश्नात पडायची गरजच नाही, कारण जो इतिहास निःपक्षपातीपणे पाहतो तो त्या ऐतिहासिक पात्राची जात कधीच पाहत नाही, त्यामूळे असल्या लोकांना दुर्लक्षाने मारणे उत्तम” … मला एका प्रश्नाचे उत्तर द्या “जात” मध्ये ठेवून इतिहास पाहण्याची संकल्पना कुणी आणली ?

आज तुम्हाला “ऐतिहासिक पात्राची जात कधीच पाहत नाही” याची जान झाली,
मग शिवाजी महाराजांच्या राज्याभिशेकाला विरोध काय इंग्रजांनी केला होता का ?
तुम्ही शुद्र आहात क्षत्रीय नाही हे म्हणणारे कोण होते ?
“तुम्ही शुद्र असल्याने तुम्हाला राज्याभिशेकाचा अधिकार नाही असे म्हणणारे, कोण इंग्रज होते का मुघल ?
शिवाजी महाराजांवर विषप्रयोग सोयराबाईंनी केला हा आरोप कुणी केला ?

बाजीरावाला मनस्ताप देणारे घरची मंडळी आणि पुण्यातली काही कर्मट ब्राह्मण, यामुळे मराठा साम्राज्याचे किती नुकसान झाले, यामध्ये सर्वजणच भरडले गेले हे का तुमच्या लक्ष्यात येत नाही. मग नक्की दुखन काय आहे तुमचे ? बाजीराव या माणसाचा आभ्यास आम्ही सुरु केला हे दुखन आहे का ?

सतीची पद्धत म्हणजे एक धार्मिक परंपरा आहे आणि याचा विरोध होता कामा नये असे म्हणणारे पंत आपणास माहीतच आहेत. राधाबाई का नाही सती गेल्या ज्याना धर्म काय असतो हे मस्तानी आल्यावरच कळले.बाळाजी विश्वनाथ मेल्यावर आपण सती गेले पाहिजे कारण धर्म हे सांगतो हे राधाबाईला माहित नव्हते का ?.

आता, तुम्हाला आम्ही इतिहास निःपक्षपातीपणे पाहतो हे म्हणायची बुद्धी सुचली.जेम्स लेनला आजवर इथॆ कोणीही न ऐकलेली माहिती कुणी दिली ?त्याला स्वप्न पडले होते का? तो वेढा आहे असे म्हणायची आहे का तुम्हाला ?

असो, हे बोलायची वेळ आली कारण ” इतिहास निःपक्षपातीपणे पाहतो” हे तुम्ही आज म्हणता कारण ठराविक बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची मक्तेदारी सोडून इतर लोक आज आभ्यास करून तुमच्या प्रत्येक प्रश्नाला पुराव्यासकट उत्तर द्यायची ताकत ठेवतात, ही बुद्धी जर तुम्हाला १०० वर्ष्यापुर्वी सुचली असती तर ही वेळ तुमच्यावर आली नसती.

आज इतर सर्व लोक, काही सरदार आणि मावळे जे इतिहासाच्या पानात लपून बसले आहेत किंवा असे म्हणता येईल की काही अतिशाहान्या इतिहासकारांनी ते इतर जातीचे होते म्हणून यांना बाहेर काढलेच नाही, यांचा इतिहास बाहेर काढत आहेत तुम्ही मात्र आजून पेशवाई यातच अडकून बसला आहात, मग खरा जातिवाद कोण करते, आजवर तुमच्या तोंडून बहुजणांच्या एकाही वीर पुरुषाचे कौतुक ऐकले नाही.

काय इतिहास लिहिला तुम्ही ? इतिहास नाही फ़क़्त वाद लिहिला तुम्ही, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला ? त्यांचे गुरु कोण ? शिवाजी महाराज घडले ते काही गुरुनमुळेच, ते गुरु नसते तर शिवाजी महाराज घडलेच नसते असे तुम्हाला म्हण्याचे असते. छत्रपतींचे कर्तुत्व स्वयंसिद्ध नव्हते तर परसिध्द होते हे सिद्ध करण्यासाठी कसले भयंकर मायाजाळ निर्माण केले तुम्ही. यातून नेमके काय सिध्द करायचे होते याचे उत्तर दिले तर बरे होईल. शिवाजी महाराजांचे चरित्र पहा, एवढ्या वादळी जीवनात अध्यात्म-तत्वज्ञान यासारख्या भाकड गोष्टींसाठी वेळ होता का? आल्या त्या साधू-संताना औपचारिक नमस्कार करून दक्षणा देण्यापलीकडे ते काही करू शकणार नव्हते हे का विसरता तुम्ही, तुम्ही मात्र लगेच त्याना गुरु करून मोकळे झाले.

आणि हे लोक प्रत्येक गोष्टीला संधर्भ विचारतात, यावर मी एकच बोलेन, आपल्याला अनुकूल असेल तेवढाच पुरावा ठेवायचा आणि बाकीचा नष्ट करायचा ही इतिहास संशोधकांची इतिहासघातक वृत्ती इतिहासामध्ये राजवाड्यांच्या कालापासून चालत आली आहे, हाच इतिहासातील सत्य संशोधनाला लागलेला मोठा शाप आहे.

काही ठराविक बखरी सोडल्या तर इतर सर्व copy-paste च आहे ना, आणि काही ठराविक पुराव्यांचा आधार घेवून एक पुस्तक लिहायचे, आणि ज्यात “मला असे वाटते” असेही वाक्य टाकायचे, स्वताच्या मुद्रा करून घेणे आणि आम्हीच काय ते श्रेष्ठ आणि बाकीचे मूर्ख हे सांगण्याचा प्रयत्न करायचा, यात काय शहाणपण असते ते तुम्ही ठरवा.

“मला असे वाटते” म्हणून जर विश्लेषणात्मक इतिहास मांडायला मी जर सुरवात केली तर कपडे काय काही लोकांची चमडी सुधा काढून नागडा करेन, पण यात काही अर्थ नसतो.

आणि शेवटी, “चित्रपट हा “इतिहास नाही” हे भन्साळीने आधीच सांगितले असल्याने त्यात दाखवलेले खरे म्हणणार्यांना ‘संदर्भ’ विचारावे” हे बोलणार्यांनी इतरांनी लिहिलेले शिवचरित्र कसे खरे आहे म्हणता, त्यांनी सुद्धा पुस्तकाच्या सुरवातीला असेच काही लिहिले होते (जुन्या आवृत्ती मध्ये )की “हा इतिहास नाही एक ग्रंथ आहे वगैरे वगैरे “, ते आजही स्वताला शिवशाहीर म्हणतात मग त्याना का पुरावे नाही मागितले.

आता याउपरी काय लिहावे, जाणकार तुम्ही सर्वे मंडळी !!!

जय हिंद !!

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “बाजीराव मस्तानी चित्रपट आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा पोटशूळ!Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *