शिवाजी महाराज आणि बुद्धिप्रामान्यवाद्यांचा पोटशुळ
माझी बऱ्यापैकी स्वप्नं लग्नानंतर साकार झाली. त्यामधल एक म्हणजे मला स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी काढायची होती. काढली सुद्धा, पहिले काही दिवस घरातून काम करत होतो. बऱ्यापैकी विरोध होताच, कारण नुकतंच लग्न झाल होत, संसाराची सुरवात होती आणि मी अतिशहाना माणूस कंपनीच सोंग घेऊन बसलो होतो. बाईसाहेब पोटाशी होत्या आणि मी माझी वेगळीच स्वप्नं रंगवन्यात मग्न होतो. बायको म्हणायची होईल कंपनी तुम्ही नाद सोडु नका. आता उडी मारल्या तर मग आर या पार. नाय जमल तर नोकरी पुन्हा लागेलच की. पण मर्द को दर्द नहीं होता हे सिनेमात ठीक आहे हो. जाम टेंशन होत. त्याचवेळी स्टार प्रवाह वर “राजाशिवछत्रपती” मलिका सुरु झाली. तोवर महराजांचा असा काही नाद मला नव्हता. जे जन्मताच रक्तात असत तेवढच. त्या मालिकेमुळे मी शिवाजी महाराज या माणसाच्या प्रेमात पडलो. कारण शून्यातून जग निर्माण करण शक्य असत याच ज्वलंत उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होत. पहिली कादंबरी वाचली (ते ही विकत घेऊन बरं का ☺) रणजीत देसाई यांची श्रीमान योगी. खरा इतिहास आणि खोटा इतिहास यापासून मी हजारो कोस दूर होतो. आणि यात कधी रस पण नव्हता ना आज आहे. माझ्या डोक्यात तो माणूस बसला ज्यामुळे माझ्या मनातून भीती गायब झाली आणि शिवाजी महाराज ह्या व्यक्तीच्या शोधात मी निघालो, कारण अशी भीती प्रत्येक मराठी तरुणाच्या मनातून गेली मग या मातीच सोन होणार हे नक्की ही भावना डोसक्यात बसली. सर्वसाधारण लोकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब मला त्या माणसाच्या जीवनात दिसले. ज्यावेळी सर्व वाटा बंद होतात त्यावेळी एकच वाट तुम्हाला किनाऱ्यापर्यंत पोहचवु शकते आणि ती वाट म्हणजे …..
“लोककल्याण राजा, विचारांचा लोहपुरुष, व्याकूळ झालेल्यांचा आशेचा किरण … छत्रपती शिवाजी महाराज”.
मग काय नाद लागला, हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच असल सुरु झाल, नामदेवराव जाधव सुद्धा वाचले हो. आणि शप्प्त सांगतो डोक्याची आई-पप्पा-काका-काकू-मामा-मामी सगळ झाल. कोण जन्मावरून वाद घालतय, कोणी गुरुवरून वाद घालतय, कोणी महाराजांची जात काढतय तर कोणी चरित्र्यावर संशय घेतय. म्हणल यात शिवाजी ही व्यक्ति कुठ आहे. आता साधा सरळ माणूस मी, राजकारण आणि जिलेबीसारखे सरळ विचारांची माणस हे मला कधी समजत नव्हती. मी आपल या सगळ्या भानगडीत शिवाजी हा मनुष्य शोधत होतो.
असो …..
पोटशुळ बघा कसे आहेत, महाराजांचे राज्य काय कोणत्या जातीचे नव्हते, ना कोना एका जाती-धर्माविरुद्ध नव्हते. समता, बंधुता, समभाव अशा अनेक मूल्यांची स्वप्नं पडण्यासाठी यूरोपला अजुन अनेक वर्षे लागणार होती. अशा काळात हे सर्व महाराजांनी करुण ठेवले. या मागे नक्की सामाजिक प्रेरणा असायला पाहिजे असे मला वाटते. पण अनेकजन महाराजांना एका विशिष्ठ जातिशी बांधन्याचा खुप प्रयत्न करतात. कोणी त्यांना आमुक बनवतो तर कोणी तमुक जातीचा. कोणी क्षत्रियत्वावर प्रश्न उठवतो तर कुणी त्यांच्या राज्याभिषेकावर वाद घालतो, कोणी त्यांना विष्णुचा अवतार करायला निघालाय तर कोणी शंकराचा, आता फक़्त नासाने म्हणाव की आम्हाला मंगळावरुन सिग्नल आलाय आणि शिवाजी महाराज हे परग्रही होते. हे ही होईलच शंभरएक वर्षात. आता मी एक अडानी माणूस मला काय काहीच कळत नव्हतं हे. (कारण माझा अभ्यासाचा विषय वेगळा आहे तो फक़्त पवारांना माहीत आहे 😋) मग म्हणल हे जरा बघायला पाहिजे. मग मला समजल की या देशातला सर्वसाधारण माणूस हा व्यक्तिपूजक आहे. एकदाका एका महापुरुषाला देव केला की तत्वांच्या विश्लेषणापेक्षा पूजापाठ आणि मिरवणुकीची दूकान मांडता येतात आणि यात धूर्त लोकं स्वताची भाकरी मस्तपैकी भाजुन घेतात. आता उदाहरण म्हणुन आमचे मित्र बोम्बल्या फकीर घ्या, अतिशय जबरदस्त कल्पना आणि विचार या माणसाच्या डोक्यात असतात. आता एका विशिष्ट जातीचा मानव एवढा हुशार कसा असू शकतो म्हणुन बोम्बल्या हा रामाचा अवतार होता असे घोषित करायचे म्हणजे माणूस पण संपतो आणि विषयही आणि एक भांडवल पण तयार होत. आणि अशा या वृत्तिमुळे औरंगजेबाच्या तंबूवरचा सोन्याचा कळस कापून नेण्याची हिम्मत असणाऱ्या या मातीतच शनिवारवाड्यावर यूनियन जॅक फड़कवला आणि त्यावेळी त्याला एक साधा दगड मारायला सुद्धा कोणी पुढ आल नाही.
संशोधन करावे, अभ्यासदेखील करावा पण एखादा मुद्दा कोणत्या पातळीपर्यंत न्यावा याला काही मर्यादा असतातच. नुसता हागुण ठेवायला लय जन पुढ येतात. जर योग्य शिवाजी राजा आभ्यासला असता आणि जनतेपुढे मांडला असता तर आज ज्या काही अडचणी महाराष्ट्रासमोर किंवा भारतासमोर म्हणल तर वावग ठरणार नाही, या आल्याच नसत्या. फेसबुकवरच्या चर्चा तर माशाअल्हा असतात, एक-एक जन असे बोलत असतात जसे शिवाजी महाराज त्यांच्या शाळेत मागच्या वर्गात शिकायला होते. आणि काय वाट्टेल ते बोलतात.
महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना किंवा लेखन करत असताना, इतिहासकार आपल्या जातीचे कल्याण, एका विशिष्ठ धर्माचे रक्षण ( विषमतावादी धर्माचे म्हणले तरी चालेल) किंवा आपल्याच जातीचा अभिमान यातून बाहेरच येत नाहीत.
महाराजांना आमुक आमुक लोकांनी सहकार्य केले म्हणुन त्यांना जमले असा हा यांचा अभ्यास. परत तेच, कोंबड़ा आणि सकाळ. नाहीतर महराजांवर आई भवानीची कृपा होती म्हणुन त्यांना हे साधता आल हा एक वेगळ्याच युक्तिवाद. जर ईश्वराच्या कृपेने शिवशाही घडली तर मग पेशवाई कसबा गणपतीमुळे, मुगलशाही मौहम्मद पैगंबारांमुळे, आणि इंग्रजशाही येसुमुळे घडली असे म्हणने योग्य नाही का?
जे जे इथल्या इतिहासकार मंडळींनी लिहून ठेवले आहे त्याला काही बाबतीत संलग्न असे एकाही परदेशी इतिहासकाराचे मत दिसून येत नाही. मग इतिहासलेखणा मागील हेतु स्पस्ट दिसून येतोच की. विविध काळात एकाच घटनेचे विविध अर्थ लावून वर्णन करता येते. संपूर्ण शिवचरित्रामध्ये काही ठराविक लोकंच हीरो झाली. महाराजांच्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीमध्ये फक़्त एवढीच लोक होती का? बाकीचे कुठ गेले का जाणीवपूर्वक लपवले? लढलो ते आम्हीच … तानाजीने मात्र घोरपडीच्या सहाय्याने किल्ला जिंकला. घोरपड़ नसती तर काय तानाजी किल्ला जिंकतो…. काय लॉजिक आहे बघा की. घोरपड़ ???? आरे काय लहानपणीचा खेळ होता का तो, की त्यात कुत्री, मांजर आणायला? कर्तुत्व मान्यच करायच नाही आम्हाला. खिंड मात्र पद्धतशिर मांडली, पुरंदरही नीट मांडला पण मुरारबाजी पडल्यावर पुढचे तीन महीने किल्ला कोणी लढवला हे मात्र आम्ही लिहिनार नाही. का तर शिवशाहीतली प्रत्येक मोहीम म्हणजे एक सिनेमा आणि सिनेमात एकच हीरो पाहिजे आम्हाला.
इतिहासात घडणाऱ्या घटना कार्यकारणभावाने घडत असतात. आणि घटना घडवून आणणारे कार्यकारणसंबंध तपासने हे इतिहासाचे काम असते. आणि ते तपासन्यासाठी घटना व त्यापूर्वीच्या काळातील परिस्थितीचा सकोल विचार करणे गरजेचे असते. ते जमत नसेल तर संसारात लक्ष घालून बायको आणि मुलांकडे लक्ष देऊन चांगला संसार करने उत्तम राहील.
—————————————————————————
गणितं बघा कशी असतात,
काही इथलेच मात्तबर मंडळी मुघलांनी फेकलेल्या जहागिरीच्या तुकड्यावर ऐशोआरामीच जीवन जगत होते आणि आपल्याच लोकांची पिळवणुक करण्यात धन्यता मानत होते आणि दुसरीकडे एक वर्ग, अशी मिळवलेली संपत्ती पापाची आहे याची भीती दाखवून त्यावर इलाज म्हणुन अनेक उपाय सांगून (अनेक नद्या दूषित करुण टाकल्या) त्यांना लूटत होते. अशा परिस्थितित कशाचेही पाठबळ नसताना फक़्त आपल्या वडलांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि आईच्या शिकवनीतून एक अतिशय जबरदस्त विचारधारा मनाशी बाळगुण दुष्काळाने गांजलेल्या, बेरोजगारीने पिडलेल्या आणि जातिभेदाने हवालदिल झालेल्या लोकांना बरोबर घेऊन एक राज्य घडवले. असा नेता या विश्वात शोधूनसुद्धा सापड़नार नाही. पण काय करणार काही लोकांना हे मान्यच नाही.
का हा पोटशुळ? आणि यातून काय मिळणार याचे उत्तर पुढील हजार वर्षे मिळणार नाही हे खरे.
शेवटी एक प्रश्न विचारू इच्छितो,
वॉरन हेस्टिंगने असे म्हणले आहे की, “सबंध भारतामध्ये केवळ मराठ्यांकडेच राष्ट्रीय वृत्ती किंवा राष्ट्रीय भावना आढळून येते.”
आता मला उत्तर द्या, ही भावना निर्माण झाली कशी? आणि केली कोणी ?
——————————————————————-
मी कोणी इतिहास अभ्यासक किंवा संशोधक नसून शिवाजी महाराज या व्यक्तिवर भयंकर प्रेम करणारा माणूस आहे. आणि माझे प्रेम अजिबात भावनिक नाही. काही चुकभुल असेल तर ती माझी चूक आहे हे समजून माफ़ करनेे. आणि कृपया वाद घालू नये. मी एक शांत आणि स्वभावाने भोळा माणूस आहे.मी या सर्व गोष्टींना खुप भीतो आणि त्यामुळे वाद घालणे मला जमत नाही.
खरी वस्तुस्थिती मांडली पाटील
perfect..
पाटील भारीच 👍👌
पाटलांची व्यथा ही इतरांची ही कथा.
माझी बऱ्यापैकी स्वप्नं लग्नानंतर साकार झाली..
बालवयात लग्न झालंय पाटील तुमचं म्हणून साहजिक आहे स्वप्नं नंतरच पूर्ण होणार.. 😁😁
आणि दुसरी गोष्ट, तुम्ही चक्क नामदेवराव जाधव वाचलेत म्हणजे आता जगातलं कसलं पण संकट तुम्ही पेलू शकणार..
कारण नामदेवांचे पुस्तक वाचायला जबरदस्त सहनशक्ती लागते, ते येड्यागबाळ्याचे काम नव्ह… 😂😂😂 कारण स्वतः नामदेव जाधव ने सुद्धा परत कधी स्वतःचं पुस्तक वाचलं नाही
पोटशूळ असणाऱ्यांनी पाहिजे त्या गोष्टीचा अचूक उदो केलेला आहे. चालायचं …वृत्ती बदलणं एवढं सोप नसतया 🙁🙁
System rebooted…!! All set…!
वास्तव व सत्य लिहिले पाटील. ..!!!
अचुक मर्मभेद. एका दगडात अनेक काव काव करणारे निर्वस्त्र केलेत आपण.
अभ्यासपूर्ण लेख 👌..
शेवटच्या पॅराग्राफ मधलं “मी एक शांत आणि स्वभावाने भोळा माणूस आहे.” 😂😂 या वाक्यावर अभ्यास करावा
वास्तवता मांडली पाटील!
नुसतं तुमच्या हृदयातील नाही तर प्रत्येकाच्या हृदयातील बोललात ! आता वेळ आली आहे ती खरं शिवछत्रपती जाणून खोटा इतिहास छोटा करण्याची ! मार्मिक लेख !
पाटील तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर असेच लिहीत रहा..तुम्ही या गोष्टी कश्या कमवल्यात माहित नाही..
खरंच नुसतं लेखन शब्दांच्या बळावर उंचच्या उंच भरारी मारल्याने वाचणारा कंटाळून जातो.
तुम्ही लिहिलेलं सामान्याला कळतं आणि पटतं,
तो या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो.
यासाठी तुम्ही खुप लिहावं. तुमच्या लिखाणातून खुप प्रेरणा मिळते.
मनापासून धन्यवाद.!