मुलभूत माहिती:
- प्रकार – लांब पल्याचा मार्ग
- ट्रेकचे अंतर : ५५ किलोमीटर
- पुण्यापासून २८० किलोमीटर
- मार्ग : पुणे – कोल्हापूर – पन्हाळा
- आमचा ट्रेक दिवस : १३ , १४ जुलै २०१३
- Difficult Level : Medium
दिनांक १३ , १४ जुलै २०१३, आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव म्हणजे “पन्हाळा ते विशालगड” चा पायी प्रवास… मित्रानो याला ट्रेक म्हणता येणार नाही कारण हि एक स्मृतीयात्रा होती ती स्मृती म्हणजे आमचे ६०० मावळे, वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांची.
वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आणि वीर बाजीप्रभू यांच्या पुतळ्याला मुजरा करून आम्ही आमची वारी सुरु केली.
नेहमीप्रमाणे लवटे-पाटील आणि सरदेसाई यांनी ट्रेक ची सुरवात केली.
आम्ही ठीक सकाळी ८ वाजता स्मुर्तीयात्रा सुरु केली ज्या वाटेवरून ६०० मावळे आणि आमचे राजे गेले नेमक्या त्याच वाटेवरून … खर सांगू मित्रानो स्मुर्तीयात्रा होती ५५ किलोमीटर ची जोराचा पाऊस, बिकट वाट आणि दांडगे ते अंतर पण मनात एक इच्छा होती आणि स्वप्न होते आणि त्या इच्छेच्या जोरावर आम्ही स्मुर्तीयात्रा सुरु केली होती … मन हळवे झाले होते सारखी ते बाजीप्रभू…शिवा काशीद आणि महाराजांच्या आठवणीने..
वीर शिवा काशीद यांची समाधी … याच ठिकाणी त्यांचे सर उडवले होते.
हीच ती जंगलातली वाट ज्या वाटेवरून ६०० मावळे आणि आमचे राजे गेले.
पन्हाळा ते विशालगड या वारीचे जर एखा वाक्यात अनुवाद करायचा झाला तर तो असा :
“ज्या वाटेवरून चालणे मुश्कील आहे, त्या वाटेवरून आमचे मावळे पळत गेले, ज्या पावन-खिंडीत उभा राहणे मुश्कील आहे, तिथे आमचे मावळे लढले.”
जंगलातून वाट सर करून आम्ही डांबरी रोड वरती आलो थोड्याच अंतरावरून पुन्हा जंगलात प्रवेश केला थोडेसे जंगल पार केल्यावर आम्हाला एक छोटेसे गाव लागले ते म्हणजे “तुरुकवाडी” आणि लगेच दुसरे गाव म्हणजे “महाळुंगे” … त्यातली काही फोटो ….
पुढे लागते ते एक भव्य असे पठार जे ८ किलोमीटर आहे “मह्साई पठार” जबरदस्त असे पठार इथे वाट चुकण्याची शक्यता नक्कीच असते कारण खूप मोठ्ठा परिसर आहे सुरवातीलाच एका अंतरावर एक छोटेसे मंदिर दिसते त्या दिशेने आम्ही गेलो … खाली दिलेला फोटो पाहावा….
जवळ जवळ ५ किलोमीटर अंतरावर मह्साई देवीचे मंदिर लागते खूपचं छान असे मंदिर … मंदिराच्या पाठीमागे खोल दारी … जोराचा वर असतो … पाऊस पडत असतो … प्रसन्न असे वातावरण असते पठारावर… खाली मी काही काढलेले फोटो …..
पठार संपल्यावर बरीच छोटी छोटी गावे लागतात ती म्हणजे कुंभारवाडा, चापेवाडी, काळेवाडी, मंडलाईवाडी, करपेवाडी.
हा पूर्ण जो प्रवास आहे तो फ़क़्त चिखलातून, भाताच्या शेतातून आहे… खुपच मजेदार आणि निराळा प्रवास आहे वाटेवरती खूप चिखल असतो, पाणी असते पाय निसरून पडण्याची शक्यता नक्कीच असते.
खालील फोटो पाहून तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो.
गावा गावातून जात असताना खूप लहान मुले भेटतात जी चॉकलेट, बिस्कीट, गोळ्या मागतात … काही मुले वही पेन मागतात… कम्पासपेटी मागतात आम्हाला याची कल्पना नव्हती मग आम्ही एका गावातून गोळ्या- बिस्कीटे घेतली आणि मुलांना देत गेलो.
वरील गावे संपल्यावर आम्ही आंबेवाडी या गावात पोहचलो जिथे आम्ही मुक्काम करायचा ठरवला. या एका दिवसात आम्ही जवळ-जवळ २५-२८ किलोमीटर अंतर कापले होते. या गावात आम्ही एका घरी गेलो तिथे त्यांना राहण्याची आणि जेवणाची विनंती केली आणि पैश्याची बात हि केली तर गावातली साधी माणस आणि सरळ माणस ते म्हणाले एका ताटाचे ३५ रुपये द्या आणि राहण्याचे एका माणसाचे १० रुपये म्हणजे एका माणसाचे ४५. आम्ही तिथे राहिलो त्यांच्याशी बोललो आमच्या ग्रुप मध्ये गप्पा गोष्टी झाल्या … त्यातल्याच काही आठवणी काह्लील फोटोमधून दिसतील.
दुसऱ्या दिवसी आम्ही सकाळी ६ वाजता वारी सुरु केली अंतर काही जास्त नव्हते आणि बऱ्यापैकी विश्रांती झाली होती त्यामुळे एकदम फ्रेश होतो.. आणि डोक्यात पावनखिंड नाचत होती कधी एखदा ती रणभूमी पाहीन असे झाले होते.
दुसऱ्या दिवसाचा प्रवास तसा निराळा म्हणजे जंगल लागते, मोठ मोठे झारणे लागतात, छोट्या मोठ्या नद्या … म्हणजे पावला पावलावर काहीतरी निराळी निसर्गाची किमया… खरच एक वेगळा अनुभव आणि अजिबात कंटाळा न येणारा प्रवास दुसऱ्या दिवसाच्या प्रवासात आम्हाला कलकवाडी, मालेवाडी, पाटेवाडी, पांढरपणी अशी गावे लागली… या प्रवासातली काही छायाचित्रे….
पांढरपनीत आमची ५५-६० किलोमीटरची पायी वारी संपली आणि मग आम्ही आमच्या गाडीतून पावनखिंडीसाठी निघालो तिथून ६-८ किलोमीटर वर पावनखिंड आहे जीते गेल्यावर मन भरून आले आणि फ़क़्त त्या लढ्याची कल्पना करू लागलो कर सांगतो मित्रानो कल्पनेच्या पलीकडचे आहे हे सगळे… इतके जबरदस्त पाणी वाहत असते खिंडीतून की तिथे उभा राहणे कठीण आहे मग ते मावळे लढले कसे ? हाच प्रश्न मनाला भेडसावत राहतो.
पावनखिंडीचे उन्हाळ्यातील छायाचित्र.
पावनखिंड सोडून आम्ही विशाळगडाकडे धाव घेतली जीते आमची वारीची सांगता होती ती म्हणजे वीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे यांच्या समाधीवर डोके टेकवून. विशालगड म्हणजे एक जबरदस्त असा गड पूर्ण दर्यानी वेढलेला आजही प्रश्न पडतो की शिवाजी महाराज कोणत्या बाजूने गडात घुसले.
पण एका गोष्टीने मन दुखून जाते ती गोष्ट म्हणजे ज्या बाजींमुळे स्वराज्याचा धनी वाचला त्यांची समाधी अशी एकांतात ? साधा एक फलक लावण्याची हि गरज कोणाला वाटली नाही …???
खाली काही फोटो जे आमच्या पूर्ण वारी मध्ये घेतलेले.
0 comments on ““पन्हाळा ते विशालगड” – एक स्मृतीयात्रा” Add yours →