मुलभूत माहिती:
- प्रकार – लांब पल्याची खडतर वाट पूर्ण जंगलाचा मार्ग
- ट्रेकचे अंतर : ३५ किलोमीटर
- पुण्यापासून १५० किलोमीटर
- मार्ग : पुणे – महाबळेश्वर – तापोळे रोडवर झोलायी खिंड
- आमचा ट्रेक दिवस : २९-३० जुन २०१३
- Difficult Level : Difficult
आम्ही अचानक असे ठरवलेला मार्ग आणि कोणतीही कल्पना नसलेला ट्रेक कुठून सुरु करायचा, कोणता मार्ग पकडायचा काहीच माहिती नव्हती थोडीफार जी माहिती मिळाली ती गुगल मावशीकडून. पण शिवाजी महाराज जावळीच्या इथ्क्या का प्रेमात होते , असे किती हे घनदाट जंगल आहे हे पाहण्याची जबर इच्छा म्हणून आम्ही जावली पहायचीच हा मनसुबा बाळगून २९ ,३० जून २०१३ असा दोन दिवसाचा ट्रेक आखला आणि महाबळेश्वराचा रस्ता धरला.
आम्ही वाईमध्ये आमची गाडी माझ्या मित्राच्या घरी लावली कारण महाबळेश्वर किव्हा पाचगणी मध्ये पर्किंची एवढी सुविधा नाही. वाईतून आम्ही बस नि महाबळेश्वर ला पोहचलो.
महाबळेश्वर मधून आम्ही तापोळे ला जाणारी जीप पकडली आणि झोलायी खिंड जिथे सुरु होते तिथे उतरलो आणि ट्रेक सुरु केला.
नेहमीप्रमाणे लवटे-पाटील आणि सरदेसाई यांनी ट्रेक ची सुरवात केली.
वरील फोटो जो आहे , इथूनच खिंड सुरु होते .
इथून ट्रेक सुरु झाल्यावर आम्ही झांजवड गावाचा रस्ता धरला जाताना आम्हला एक भला मोठा पर्वत उतरायचा होता जो खरच खूप अव्गड आहे म्हणजे पाय नक्कीच निसरतो आणि पडण्याची शक्यता १००% आहे.जाताना आम्ही जंगलात झाडे लावणा , बिया टोचणे असले काम करत होतो. मस्त पाऊस सुरु होता , थंड वारा झोंबत होता पण मस्त मज्ज्या येत होती. झांजवड गावापर्यंतचा प्रवास खालील फोटो मध्ये दिसेल.
हे झांजवड गाव वरील फोटोमध्ये जो अगदी मधोमध जो पर्वत दिसत आहे तिथूनच आम्ही गावापर्यंत आलो.
इथे आमचा पहिला टप्पा संपला होता. आता आम्हाला कोयना नदी पार करून “चतुरबेट” या गावी जायचे होते गावातल्या काही लोकांना आम्ही रस्ता विचारून पुढे गेलो ..
थोडा वेळ डांबरी रस्ता होता जिथे एक पूल हि होता जो कोयना नदीवर बांधलेला होता पण आम्हला नदीतून जायचे होते म्हणून आम्ही डांबरी रस्ता सोडला आणि नदी पार करून गेलो लगेचच परत एक जंगलात जाणारी पायवाट होती जिथून तुम्हाला चतुरबेट या गावी पोहचता येते.
वरील फोटोमध्ये तुम्हाला चतुरबेट हे गाव दिसेल अगदी छोटे गाव आहे म्हणजे ३०-४० घराचे गाव.
इथून पुढचा जो प्रवास होता तो खरा जावळीच्या जंगलाचा प्रवास …. अतिशय घनदाट असे जंगल जंगलामध्ये फ़क़्त गवा रेडा हाच एक प्राणी असतो. पण खूप खूप घनदाट आम्ही चतुरबेट लगेच सोडले आणि जंगलात शिरलो जिथे काही वेळाने आमच्या लक्ष्य आले की आम्ही चुकलो आहोत रस्ता कुठेच सापडत नव्हता, आणि अंधार हि पडत चाललेला होता म्हणून आम्ही परत चतुरबेट गावी जायचा निर्णय घेतला परत येताना आम्हाला एक माणूस भेटला ज्याला आम्ही मकारांद्गडाचा (ज्याला आज घोनसपुर म्हणून ओळखतात) रस्ता विचारला तर त्याने सांगितले की जंगलातून रात्रीचा प्रवास हा धोक्याचा आहे भूलभूल्ल्यावाट असल्याने नक्कीच रस्ता चुकतो म्हणून त्याने आम्हाला कच्या रस्त्याने जाण्यास सांगितले जो बराच लांबचा प्रवास होता , आम्हालाही तो पसंद पडला नाही कारण आम्हला जंगलातूनच जायचे होते. म्हणून आम्ही चतुरबेट या गावी मुक्कामाचा निर्णय घेतला तोही त्या माणसाच्या घरात आणि त्याने सकाळी लोव्केर उठून त्याच्या भावाला तुमच्यासोबत पाठवतो असे सांगितले जो तुम्हाला रस्ता दाखवेल. आम्ही त्याला ३५० रुपये देण्याचे ठरवले.
त्यांनी दिलेली भात-आमटी खरच मस्त होती :). बऱ्याच गप्पा झाल्या त्यांची जीवन शैली आम्ही जाणून घेतली आमची त्यांना ऐकवली. आणि आंम्ही झोपी गेलो.
सकाळी ठीक ६-३० वाजता आम्ही मकरंदगडाचा रस्ता धरला. जावळीच्या जंगलाचा प्रवास …. अतिशय घनदाट असे जंगल परत आम्हाला कोयना नदी लागली जी पार करायची होती खूप चढ चढायला लागतो जंगल काय असते याचा अनुभव इथे अनुभवायला मिळतो. घोणसपूर या गावी एक छोटेसे मंदिर आहे जिथून गडाकडे वाट निघते. इथे आम्ही सकाळचा नाष्टा घेतला.
मकरंदगडाची वाट खुपच अवघड आहे सरळ चढ आहे खूप जपून चढावे लागते. पांडवांनी बांधलेला एक तलाव आहे , चुन्याची भट्टी आणि मंदिर.
मकरंद गडावरचे वातावरण खरच अल्ल्हाद्दायक शुद्ध हवा … जोराचा पाऊस … आणि थंडी… :).
तिथून आम्ही गड उतरायला सुरवात केली परत घोणसपुरा मध्ये मंदिराजवळ यायचे होते जीतून प्रताप्गादाकडे जंगल वाट जाते. खूप चं वाट आहे जंगलातून ४-५ किलोमीटर उतरल्यावर “हाटलोट” हे गाव लागते जिथून पूर्ण प्रवास हा डांबरी रोड वरून करावा लागतो. जंगलातून कदाचित वाट असेल हि पण ती कोणालाच माहित नाही.
हाटलोट गाव.
तर असा हा एक रोमांचकारी ट्रेक … जरूर अनुभव.
थोडक्यात मार्ग असा (पुण्यातून):
पुणे > महाबळेश्वर > तापोळे रोड > झोलायी खिंड > झांजवड गाव > चतुरबेट गाव > मकरंदगड (घोणसपूर) > हाटलोट गाव > प्रतापगड
अंदाजे टोटल अंतर ३५-४० किलोमीटर (जंगलातून)
खाली दिलेला गुगल म्याप पाहावा.
0 comments on “महाबळेश्वर – मकरंदगगड – प्रतापगड” Add yours →