इतिहासात हरवलेले इतिहास अभ्यासक : श्री. गणपतराव बापूराव कोळेकर
इतिहास अभ्यास कुणासाठी आवड, कुणासाठी निवड, कुणासाठी जीवन तर कुणासाठी सर्वस्व. आणि मग ही लोकं इतिहासात एवढं रमून जातात की त्याला काय सीमारेषा उरत नाही. २० व्या शतकात महाराष्ट्राला अनेक इतिहास अभ्यासक लाभले ज्यांनी आपापल्या परीने इतिहास मराठी माणसांसमोर मांडला. काही इतिहासकार प्रसिद्ध झाले काही नाही झाले. काहींना लोक विसरून गेले तर काही तर आजही आदर्श आहेत. असेच एक इतिहास संशोधक ज्यांना इतिहास विसरला आहे ते म्हणजे श्री. गणपतराव कोळेकर.
गणपतराव कोळेकर यांचा जन्म लाट ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथे दि. २१/२/१९०५ साली झाला. त्यांचे शालेय व हायस्कुलचे शिक्षण इंचलकरंजी, कोल्हापूर येथे झाले. १९२४ मध्ये मॅट्रिकची परीक्षा पास होणारे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे ते पहिले विध्यार्थी आहेत. लहानपणापासून वाचनाचा नाद, त्यानंतर स्काऊट मास्तरचा कोर्स केला, थोडे दिवस कारकूनची नोकरी केल्यानंतर इचलकरंजी येथे शिलेदार व रिसालदार म्हणून नोकरी केली. त्यांना संस्कृत, इंग्रजी, हिंदी, कानडी, मराठी या भाषा अवगत होत्या. नोकरी करत असताना त्यांनी इचलकरंजी येथे आपटे वाचन मंदिरामध्ये विविध पदांवर काम केले. १९३६ साली रिसाला कमी झाल्यावर पोलीस खात्यात हवालदार, जमादार व सब इन्स्पेक्टर म्हणून काम केले. पण १९४२ साली इचलकरंजी जहागीर कोल्हापूर संस्थानामध्ये विलीन झाल्यावर त्यांनी अर्बन बँक, विणकर संघ वगैरे सहकारी संस्थातून उत्तम रीतीने काम केले. त्यांच्या घराण्यामध्ये हत्ती, घोडे यांचा फार अभ्यास होता त्यामुळे त्यांनी अशवपरिक्षण हे पुस्तक प्रसिद्ध केले.
त्यांनी कोल्हापूर, पुणे व इतर शहरातील विध्यापिठांमधील वाचनालयात जाऊन वेद, उपनिषीदे, पुराणे व प्रसिद्ध ग्रंथांचा अभ्यास केला व अनेक विद्धवान लोकांशी चर्चा करून सुमारे ५० वर्षे सतत झटून वेदकाळापासून धनगर समाजाविषयीच्या माहितीचे पुराव्यासह संशोधन करून संकलन केले. त्यांना मोडी लिपी चांगल्या प्रकारे अवगत होती. वयाच्या ८० व्या वर्षी कानडी लिपी शिकून कानडी ग्रंथांचा अभ्यास और केला व माहिती जमा केली. त्यांची चार पुस्तके प्रकाशित झाली व त्यांचे पाचवे पुस्तक “धनगर समाज: प्राचीन इतिहास व गोत्र” प्रकाशित होत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. धनगर समाजाची मुख्य कुळी, आडनावे व उपनावे त्यांचे गोत्र, वंश, ऋषी गोत्र, प्रवर त्यांनी प्रथम समाजासमोर मंडळी ज्यांचा आधार आज अनेक अभ्यासकांना मिळत आहे.
========================================
त्यांची प्रकाशित पुस्तके:
१) अश्व परीक्षा (इ. स. १९३७)
२) धनगर समाजाची गोत्रे (इ. स. १९८१)
३) लाट दर्शन (इ. स. १९८५)
४) अश्व परीक्षा दुसरी आवृत्ती (इ. स. १९९२)
५) धनगर समाज: प्राचीन इतिहास व गोत्र (इ. स. १९९२)
========================================
फोटोमध्ये त्यांचे पाचवे पुस्तक “धनगर समाज: प्राचीन इतिहास व गोत्र” याचे मुख्य पानं आणि शेवटचे पान दाखवले आहे. हे पुस्तक आज कुठेही मिळत नाही. इतिहास प्रेमी सुधीर पाटील यांनी मला याच्या शेवटच्या राहिलेल्या ३०-४० प्रती मला दिल्या. त्यापैकी बर्याच प्रति मी इतिहास अभ्यासकांना दिल्या आहेत. १-२ शिल्लक आहेत.
========================================
गणपतराव बापूराव कोळेकर यांची ५ पुस्तकं मला वाचण्यास मिळतील काय🙏🙏🙏
The great Author