मुलभूत माहिती:
- प्रकार – लांब पल्याची खडतर वाट
- २३५० फुट उंची
- ट्रेकचे अंतर : “शिडी घाट” मार्गे – १० किलोमीटर, “गणेश घाट” मार्गे – १३ किलोमीटर.
- पुण्यापासून १३५ किलोमीटर
- मार्ग : पुणे – कर्जत – कशेळे- खंडास
- आमचा ट्रेक दिवस : २७ जुलै २०१३
- Difficult Level : Medium to Low
भीमाशंकर व्हाया शिडी घाट म्हणजे एक थरारक अनुभव असे फार ऐकुन होतो.. त्यामुळे उत्साह दांडगा होता.एक अद्भूत आणि रोमांचकारी ट्रेक, सुरवातीपासून दमछाक करणार ट्रेक नवीन ट्रेकर साठी अवघड असा ट्रेक.खांडस गावात पोहोचताच गाईड्स लोकांनी विचारपुस सुरु केली.. त्यांना डावलुन आम्ही त्या गावातुन भीमाशंकरची वाट धरली.. साधारण दिड दोन किमीनंतर एक पुल लागला.. पुल संपताच समोर फलक दिसला.. शिडी घाट डावीकडे नि गणेश घाट उजवीकडे.. शिडी घाटाने(अवघड वाट) जाण्यास अंदाजे तीन तास नि गणेश घाटाने(सोप्पी वाट) जाण्यास अंदाजे ६ तास लागतात असे ऐकुन होतो.. आम्ही परतीची वाट गणेश घाटाने करायची ठरले होते. ट्रेक साठी तुम्हाला २ मार्ग आहेत ते म्हणजे “शिडी घाट” आणी दुसरा “गणेश घाट”.
“शिडी घाट” तसा एकदम रोमांचकारी आहे खूप जपून चढवा लागतो डोंगराच्या कड्याला लोखंडाच्या शिड्या लावल्या आहेत ज्या खुपच जबरदस्त आहेत आणि या मार्गामध्ये खूप चढ आहे जो दमछाक करतो.हा मार्ग वरती जाताना चांगला आहे कारण खाली उतरताना घसरण खूप आहे आणि दुर्घटना होण्याचे श्य्क्याता नक्कीच आहे (पावसाळ्यात). या मार्गे तुम्हाला कमीत कमी ४-५ तास लागतात भीमाशंकर पर्यंत पोहचण्यासाठी. अंतर १० किलोमीटर चे.
“गणेश घाट” सरळ आणि चड-उतारांचा पण खूप लांब पल्याचा हे अंतर जवळ जवळ १३ किलोमीटर चे असेल जे नक्कीच तुमचा १ तास जास्त घेतो.खाली उतरताना हा मार्ग घेतलेला चांगला. जबरदस्त निसर्गाची किमया तुम्हाला या मार्गावर पाहायला मिळेल आणि सह्याद्रीचे प्रेम नक्कीच वाढेल. बरेच मोठ-मोठ्ठे पाण्याचे धबधबे आणि ते हि खूप वेगाचे. ज्यावेळी तुम्ही कड्याकडे पाहाल तुम्हाला अंदाजे १५-२० मोठ्ठे धबधबे दिसतील जे तुम्ही तासनतास जरी पाहत बसला तर मन भरणार नाही.
पावसाळ्यात इथे लगातार पाऊस चालू असतो आणि तो हि जोराचा जो ट्रेकिंग चा आनंद अजून वाढवतो. फोटोग्राफर लोकांसाठी मात्र निराशाजनक आहे कारण कॅमेरा बाहेरच काढता येत नाही एवढा जोराचा पाऊस चालू असतो.
शक्यतो स्वताचे वाहन घेऊन जाने सोयीस्कर जे तुम्ही खांडस किंव्हा काठेवाडी मध्ये लाऊन ट्रेक सुरु करू कारण भीमाशंकर मधून गाड्य्नाची जास्त सोय नाही जर वरती पोहचला उशीर झाला तर परत जाण्यासाठी वाहन मिले अवघड आहे.
लाल मातीची ओली पाउलवाट तुडवत आम्ही जंगल प्रदेशाकडे वाटचाल करु लागलो.. वाटेत पाण्याचा एक ओहोळ लागला नि तिथेच काही काळ विश्रांती घेतली.. एव्हाना पावसाळी ढगांनी आकाशात दाटी केली होती.. जंगल सुरु होताच घनदाट झाडी लागली नि कातरवेळेस प्रारंभ झाला की काय वाटु लागले.. ती घनदाट झाडी बघुन इकडे एकट्या दुकट्याने येणे फक्त अशक्य असल्याची खात्री झाली.. गाईड हवाच !
नेहमीप्रमाणे लवटे-पाटील आणि सरदेसाई यांनी ट्रेक ची सुरवात केली.
एक तास गेला तरी शिडीचा काही पत्ता लागत नव्हता.. आता येइल म्हणता म्हणता काहि मिनीटातच जंगल मागे सरले नि डोक्यावरील झाडांचे छप्पर गायब झाले.. पुढे जायची वाट पण बंद झाली कारण समोरच उंचसा कातळकडा उभा राहिला.. एव्हाना आम्ही देखील बरीच उंची गाठली होती ते मागे वळुन पाहताच लक्षात आले.. आता पुढची वाटचाल त्या डोंगराला वळसा घालुन करायची होती.. जिथे शक्य नाही तिथे लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत..
पहिलीच शिडी डाव्या बाजुला दिसली जी एका मोठ्या खडकावरुन दुसर्या खडकावर जात होती.. मध्ये १०-१५ फुटाची दरी नि पुढे तिला लागुनच अजुन खोल दरी होती.. (किती खोल ते नीटसे आठवत नाहीये) पुढे ती शिडी जरी चढुन गेलात तरी क्षणाची उसंत नव्हती.. तिथेच खडकाला धरुन उभे रहायचे होते नि दोनवितभर असणार्या वाटेतुन पुढे सरकायचे होते.. याची कल्पना या फोटोवरुन येईलच..
हा थरार कमी म्हणुन की काय पावसाने जोरदार आगमन केले !! या शिडीतुन एकावेळी एकच जण हळुहळु जात होता.. आधीच शिडी घाटातील हा कठीण टप्पा त्यात पावसानेही जोर धरला.. त्यामुळे सगळ्यांना सांभाळताना, सुचना करताना लिडर्सलोकांना बरीच कसरत करावी लागली.. खरी गंमत पुढे होती.. जिथे अक्षरक्षः स्पायडरमॅनसारखे मोठ्या पाषाणाला चिकटुन जायचे होते.. कारण पुढे चार्-पाच फुट अंतराची वाटच नव्हती.. तिथे फक्त पाषाणाला असलेल्या खाचांमध्ये हात घालुन मोक्याच्या जागी पाय ठेवुन ती वाट पार करायची होती..
दुसरी शिडी पार केल्यानंतर मी तिसर्या शिडीकडे सरसावलो.. पावसामुळे वरतून घरंगळत येणारे पाणी.. नि निसरडी वाट.. त्यामुळे आम्ही आता सगळे जवळपास घोडागाडी करुनच जात होतो.. तिसरी शिडी मात्र खुपच सोप्पी वाटली.. पटकन चढुन गेलो नि मग पुढे जिथुन पाण्याचा छोटेखानी झरा येत होता त्याच वाटेने आणखी वर चढलो.. खुपच मजा येत होती.. कपडे भिजतील, चिखलाने माखतील इकडे लक्षच नव्हते.. बस फक्त आपल्या हातापायांची पकड बरोबर आहे ना याचा अंदाज घेत पुढे जात होतो.. त्या झर्याची वाटेने वरती आल्यावर उजवीकडे गुहा लागली.. तिथेच काहि काळ थांबुन विश्रांती घेतली.. गुहेसमोरच वरतुन उंचावरुन पडणारे पाणी अंगावर झेलण्याची मजा काही औरच होती. याची कल्पना या फोटोवरुन येईलच..
वाटले तिन्ही शिड्या पार झाल्या.. बरेचसे चढुन आलो.. आता कष्ट कमी लागतील.. पण छे ! पुढे अजुन एक ६-७ फुटाचा रॉक पॅच लागतो.. तो तसाच चढावा लागतो... आतासा कुठे एक डोंगर पार करुन विस्तीर्ण पठारावर आलोय !! इथुनच समोरील डोंगररांगामधील पदरगडाचे विलोभनीय दर्शन झाले.. पुढे जाताच भलीमोठी भातशेतीही नजरेस आली..! हा हिरवा पट्टा बघितला नि कोकणची आठवण आली ! त्याच शेतीतुन वाट काढत पुढे विश्रांतीसाठी बांधण्यात आलेल्या झोपड्यांमध्ये आलो नि जेवणाचे डबे उघडले.. याचठिकाणी शिडी घाटचा रस्ता नि गणेश घाटचा रस्ता एकत्र येतो..
वाटे वर तुम्हाला २-३ ठिकाणी साध्या झोपड्या दिसतील जिथे तुम्हाला चहा, कणस मिळू शकेल. गावातल्या लोकांचे हे स्टाल.
शिडी घात ओलांडल्या नंतर थोड्या अंतरावर मस्त मोठा धब-धाबा लागतो जीते बरीच लोकं भिजण्याचा आनंद घेत असतात. खुपच थंड पाणी असते पण मज्ज्या येते.
पण आता वाट सरळ चढणीची होत होती.. वाट कसली.. नुसती खडकाळ.. मध्येच खड्डे मध्येच उंचवटे.. तर मध्येच लाल मातीची घसरट वाट.. पायांच्या स्नायुंना चांगलाच व्यायाम मिळत होता.. अधुन मधून पावसाच्या सरी हजेरी लावत होत्या.. पण आमचा घाम मात्र निघतच होता.. पुन्हा एकत्र आलेले सगळे आपाआपल्या कुवतीनुसार मागे पुढे विखुरले गेले.. काही मिनीटातच वाट डोंगराच्या कडेने जाउ लागली.. नि समोरील निसर्गदृश्य पाहुन विलक्षण गारवा वाटला.. प्रत्येक ठिकाणी थांबुन बघत रहावे असा नजारा होता.. इतकी उंची गाठली तरी अजुन बराच डोंगर सर करायचा होता.. अर्ध्याएक तासातच पुन्हा वाट जंगलात शिरली.. पावसाळी वातावरण, गर्द झाडी , धुके यांमुळे बरेचसे अंधारुन आले होते.. भुतपटात दाखवतात तसेच वातावरण होते.. माकडांचे घुमणारे “हूप हूप” आवाज नि कुठल्या तरी पक्ष्यांची सुमधुर शीळ याने मात्र तेथील शांतता भंग होत होती..
काही अवधीतच गर्द झाडीच्या जंगलातुन बाहेर पडलो नि चढण लागले.. शेवटच्या टप्प्यापर्यंत आलो होतो पण त्याचबरोबर चालही आमची मंदावली होती.. हवेतील गारवा तर विलक्षण वाढला होता.. मागे पाहीले तर गोगलगाय गतीने येणार्या मंडळींचा मागमुसही नव्हता.. पण प्रत्येक घोळक्याबरोबर एकेक ट्रेक लिडर राहत असल्याने चिंता नव्हती.. काही मिनीटातच आम्ही वरती पोहोचलो.. तिथे धुक्यामुळे फारच अंधुकसे दिसत होते.. बोचरी हवा अंगावर शहारे आणत होती.. अशा धुंद वातावरणात आम्ही लागलीच धरतीला पाठ टेकवली.
शेवटच्या वेळी खूप मस्त आणि घनदाट असे जंगल लागते जे एक वेगळाच अनुभव देते.
आस हा रोमाच्कारी आणि उत्साही प्रवास संपल्यावर तुम्ही भीमाशंकरला पोहचल जीते पुन्हा ११० पायऱ्या उतरून मंदिर पर्यंत जावे लागते.
आपण ज्याला एक दिवसाचं अॅडव्हेंचर स्पोर्ट्स किंवा ट्रेकिंग म्हणत पुण्या-मुंबईहून सुरूवात करून डोंगर दऱ्या, गड-किल्ले हिंडतो, मग ब्लॉग लिहितो, फोटो काढतो… सोशल नेटवर्किंगवरूनही गाजावाजा करतो, स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतो, ते खरं तर याच डोंगरदऱ्यातल्या लोकांचं रोजचं जगणं असतं..
———————————————————————————————-
आमचे काही बाकीचे फोटो :
0 comments on “खांडस- भीमाशंकर” Add yours →