IMG_20180127_130818_HDR

माळवा भटकंती: भाग – ३

……. आता २७ जानेवारीच्या सकाळ उजडली होती, सकाळी लवकर उठून आंघोळ पाणी करून आम्ही लवकर निघणार होतो, पण काका काही नाष्टा केल्याशिवाय सोडणार नाहीत असे दिसत होते. शिऱ्याच्या अंघोळीचा काय मूड दिसत नव्हता पण काका शिऱ्यापेक्षा हट्टी होते. दाबून खायला घालणे आणि सकाळी अंघोळ करणे हे दोन हट्ट काकांचे लैच भारी … शिर्या मला म्हणाला आपण आता काकांना पुण्याला बोलवू आणि ३ दिवस नुसता खायला घालू. लै खायला घातलं काकानं….. तर मग सकाळी आम्ही नऊ-सडे नऊ च्या सुमारास इंदोर मधून निघालो… आता आम्हाला मांडूचा किल्ला पाहून महेश्वरला मुक्कामाला जायचं होत. संपूर्ण प्रवास हा ९०-१०० किलोमीटरचा,त्यामुळे अशी काही गडबड नव्हती.

जाता-जाता काळे फॅमिलीसोबत एक मस्त पैकी फोटो काढला, सगळीच मंडळी भारी होती. आमची ना ओळख ना पाळख तरीही एवढ्या प्रेमाने आणि उत्साहाने पाहुणचार केला कि काय सांगू.

इंदोरमध्ये आले की सगळीकडे होळकरमय वातावरण असतं, होळकरांचा वाडा, त्यांच्या छत्र्या, महाल…. शहर ऐतिहासिक आहे हे सांगायची गरज अजिबात लागत नाही. प्रत्येक वस्तू अगदी व्यवस्थितपणे सांभाळून ठेवली आहे. आणि महत्वाचं म्हणजे तिथली जनता खूप जागृत आणि जबाबदार आहे. कुठेही वास्तूची पावित्र्यता भंग होईल असे वर्तन नसते…. खरंच खूप मस्त वाटते या शहरात !

IMG_20180127_085150

आलेल्या वाटेनेच परत जात होतो. सकाळी सगळेच फ्रेश होतो, आता सर्वांचा आवडता स्पॉट म्हणजे महेश्वरला जायचे होते आणि वाटेत मांडूसारखा मोठा किल्ला त्यामुळे सगळे एकदम खुश होतो. मग एक सेल्फी तो बनता हे  ….

IMG_20180127_092021

आमच्या शिऱ्याचा एक लै भारी गुण आहे, तो म्हणजे रस्त्यात एखादा वंचित भेटला की त्याला बोलणे, गमंत करणे, फोटो काढणे …. असाच एक भारी माणूस भेटला … स्कुटर चालवत होता… एकदम स्टाईलमध्ये … गाडीतूनच त्याचा फोटो घ्यायचा ठरवला … शिऱ्या, त्याला हाक मारून म्हणतो एक फोटो प्लिज…आणि ज्यावेळी त्याला समजले की त्याचा आमही फोटो काढत आहोत तर गडी एकदम छाती ताठ करून बसला गांडीवर ….

kkkkIMG_20180127_093028_HDR

वाटेत मग पुन्हा राऊ गाव लागले. इंदोरपासून महू रोडवर ४ किलोमीटर अंतरावर एक गाव तस शहर आहे ज्याचे नाव आहे “राऊ”. आता राऊ म्हणलं की आपल्याला आठवतात ते “पेशवे बाजीराव” ज्यांना प्रेमाने राऊ म्हणत. आता राऊ हा काय तसा कोणता शब्द नाही ज्याला एक काही अर्थ असेल, मग या गावाचे नाव राऊ का म्हणून ठेवलं असेल हा प्रश्न मला इंदोरला जातानासुद्धा पडला होता. मग जरा गुगल काकुला विचारलं तर ती म्हणाली की राऊ हे शहर सुबेदार मल्हारराव होळकर यांनी वसवलेले आहे. आता मल्हारबा आणि बाजीराव याचे खूप चांगले आणि मैत्रीपूर्वक संबंध होते हे आपण इतिहासात वाचले आहेच. म्हणून मल्हारबांनी शहर वसवुन त्या शहराला राऊ असे नाव दिले असेल असे मला वाटते. आता पुराव्यानिशी सांगायला जरा चार पानं चाळावी लागतील जे चाळूच. पण राऊ हे मल्हारबांनी वसवलेले शहर आहे आणि नाव हे बाजीरावांचे आहे त्यामुळे बाजीरावांच्या प्रेमापोटी हे नाव दिले असणार असे मला तरी वाटते.

जरा पुढे गेला तर महू गाव लागते. गावाच्या ५ किलोमीटर पुढे गेल्यावर शिऱ्या बोलला आहो इथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालाय. मग गुगल काकूने रस्ता दाखवला आणि गेलो तिथे. बाबसाहेबांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे महू छावणीला सुभेदार होते त्यावेळी बाबासाहेबांचा जन्म याठिकाणी झाला. इथे जे जुने घर होते म्हणजे बाबासाहेबांचे जन्म स्थळाच्या जागी स्मारक बांधले. अतिशय सुंदर असे स्मारक आहे स्मारकाची स्वछता कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेबांचे हे उदाहरण. बाबासाहेबांची दुर्मिळ छायाचित्रे इथे लावली आहेत. बाबासाहेब, त्यांच्या आई, त्यांचे वडील यांच्या सुंदर अशा मुर्त्या आहेत.

स्मारकाच्या पाठीमागे ट्रस्टचे ऑफिस आहे जिथे बाबासाहेबांचा अस्थी कलश ठेवला आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तक विक्रीला आहेत. बघावे असेच हे स्मारक आहे.

IMG_20180127_103616_HDR

IMG_20180127_104253_HDR

IMG_20180127_104500_HDR

IMG_20180127_104715_HDR

IMG_20180127_104822_HDR

IMG_20180127_105133

20180127_113710

आता इथून पुढे महेश्वरचा प्रवास होता, अगदी गेले ८-१० वर्षे इथे जायचा प्लॅन होता परंतु काही जमत नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे महेश्वरचा घाट. नेहमी सिनेमात आणि फोटोंमध्ये पहिला होता म्हणून जास्तच उत्सुकता होती. अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी असलेला हा किल्ला. देवींचा इतिहास म्हणजे एक प्रेरणा देणारा आणि अभिमानाने छाती फुलविणारा इतिहास आहे. अनेक वेळा वाचनात या किल्लयाचे नाव आले होते. अहिल्यादेवी आणि महेश्वर म्हणजे खूप जिव्हाळ्याचे नाते हो … मला या संपूर्ण प्रवासात तीनच गोष्टींचं जास्त आकर्षण होते एक महेश्वरचा किल्ला, मांडूमध्ये राणी रुपमतीचा महाल आणि माझे सर्वात आवडते व्यक्तिमत्व पेशवा बाजीराव बल्लाळ यांची समाधी.

*****

महू सोडले की, लगेच मुंबई-आग्रा हायवेला गेलो, तिथून मग जामली-भिचोली-माणपूर यामार्गे पुढे जायचं माणपूर मध्ये हायवे सोडायचा आणि चित्तोडगड-खरगोन-भुसावळ हायवे पकडला. थोडे अंतर पार केले की चंबलनदी लागते जी ओलांडली की डावीकडे मांडू रॉड लागतो जिथे चित्तोडगड-खरगोन-भुसावळ हायवे सोडायचा. हा सरळ रॉड मांडू किल्ल्यामध्येच जातो. मध्ये मग कुंजरोड-भेरू पिपल्या, सगादी, बागरी अशी लहान गावं लागतात. बागरी गाव पार केले की मग मध्यप्रदेशचा ३१ नंबरचा स्टेट हायवे लागतो जिथून डावीकडे गेले की मांडू मध्ये जाता येते. रस्ता एकदम सुंदर आहे, आणि कुठेही गफलत होत नाही कारण सगळीकडे बोर्ड लावले आहेत. आम्ही हा सगळा प्रवास एन्जॉय करत मांडू मध्ये पोहचलो.

मांडूच्या अलीकडे ४ किलोमीटर रस्त्यावर अनेक गाड्या उभ्या होत्या. आमाला वाटलं की बहुतेक किल्ला इथून सुरवात होतो आणि एखादा स्पॉट बघायला सगळी लोकं थांबली आहेत. म्हणून आम्हीही थांबलो.

हे एक पर्यटक स्थळ होते जे या जगातले फालतू पर्यटक स्थळ म्हणून घोषित करायला हरकत नाही. काहीच नव्हते तिथे. एक साधी दरी होती जिथे लोकं उगाच जाऊन थांबणार आणि ढिगभर दुकानं. जस आम्ही गाडीतून उतरलो तर बाजूला ४-५ उंट होते. शिऱ्या म्हणाला या भावांबरोबर पाटील एक माझा फोटो काढा…. मी तो तिकडे जाताना एक फोटो काढला होता, आणि जसा शिऱ्या जाऊन उभारला तर तो मालक बोंबलू लागला. साहब फोटो नही निकलनेका …. २० रुपये लगता फोटो खिचनेका … शिऱ्या म्हणतो, राहू दे बाबा बस खाली … नको फोटो… किती त्रास करून घेतो जीवाला…. लै गमंत दोघांची.

IMG_20180127_125059_HDR

IMG_20180127_125526_HDR

 

तिथे आम्हाला एक जबरदस्त इतिहास अभ्यासक भेटले जे पूर्वीपासून सांगत आलेला इतिहास सांगतात. त्यांनी जो इतिहास सांगितला तो समजून घेण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला आणि काही मिस होऊ नये म्हणून आम्ही रेकॉर्डिंग करायचं ठरवले. विडिओ बघा आणि मग बघा तुम्हाला काय-काय समजले ते.

IMG_20180127_125603_HDR

IMG_20180127_130818_HDR

ऊन लै हुत म्हणून म्हणलं जरा सरबत वगैरे प्यावे पण त्याच्याकडे जलजिरा होत ..”रजनी जलजिरा” !! एवढं घाण होत हे काही बोलू नका. दोन घोरांवर समाधान मानले आणि गपगुमान गाडीत जाऊन बसलो.

IMG_20180127_131037_HDR

आता जाम भूक लागली होती. अगदी जोरदार. प्रॉब्लेम असा होता की किशात कॅश कमी होते इंदोर नंतर ATM कुठे सापडले नाही. आणि मेन मुद्दा म्हणजे जिथे जाईल तिथे कार्ड चालत नव्हतं. शेवटी एका हॉटेलमध्ये थांबलो जिथे मस्त थाळी सिस्टीम होती. अतिशय सुंदर आणि चविष्ट जेवण होते. मस्तपैकी आम्ही जेवलो आणि मग किल्ल्यात शिरलो.

IMG_20180127_133555

हा किल्ला म्हणजे एक शहर होते. या शहराला आनंदनगरी म्हणजे ‘City Of Joy’ असे म्हंटले जाई. मुसलमानी राजवटीत ह्याला शादीआबाद म्हणत असत. तसा हा किल्ला खूप प्राचीन आहे. म्हंटले जाते की हा किल्ला सहाव्या शतकात बांधला गेला. इ,स.च्या  १० व्या /११ व्या शतकात परमार राजघराण्याच्या काळात हे राजधानीचे शहर होते. परमार म्हणजे महाराष्ट्रातील पवार असे सांगितले जाते. त्यावेळी ह्या शहराचे नाव होते मांडवगढ होते. नंतर अलाउद्दीन खल्जीने दक्षिणेत जाताना हा किल्ला जिंकला आणि इथून पुढे तो देवगिरीला गेला असं एकंदरीत सांगितले जाते. या किल्ल्यात जाताना बारा दरवाजे लागतात. संपूर्ण किल्ल्यात गाडीने फिरता येते. १२ दरवाज्यातून गाडी आत जाते आणि सुंदर रस्ता आहे. मुख्य दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा आहे त्यानंतर रामगोपाल दरवाजा, जहांगीर दरवाजा और तारापुर दरवाजा, आलमगीर दरवाजा, भंगी दरवाजा असे दरवाजे आहेत.

आम्ही किल्ला बघत बघत राणी रूपमती महालापर्यंत पोहचलो. राणी रूपमती म्हणजे बाजबहाद्दूरची प्रेयसी होती आणि तिचे नर्मदा नदीवर खूप प्रेम होते. नर्मदेचं दर्शन घेतल्याशिवाय ती स्नान करत नव्हती. किल्ल्यावरून तिला नर्मदेचे दर्शन व्हावे म्हणून किल्ल्याच्या उंच ठिकाणी हा महाल बांधला जिथून नर्मदा नदीचे दर्शन होते.

IMG_20180127_150754_HDR

IMG_20180127_153252_HDR

IMG_20180127_151055_HDR

आता जाईल तिथे किल्ल्यांवर जबरदस्त प्रेम करणे लोकं आपल्या प्रेमाची निशाणी ठेवतातच.
मोहित + कविता
विजय + आयुबी
सुभाष + दामिनी
रोहित + सपना + बिट्टू

हे वरच नक्षीकाम आम्ही ज्यादिवशी गेलो त्याच्या आदल्या दिवशी झाले होते. आम्ही २७ तारखेला तिथे होतो आणि नक्षीकाम २६ ला झाले होते. ( नावांच्या खाली तारीख बघा)

रूपमती महाल पाहून आम्ही आता किल्ला सोडायचे ठरवले आणि किल्ल्याच्या पश्चिमेला असलेला घाट उतरून आम्ही महेश्वरला निघालो जिथे आमचा मुक्काम होता.घर उतरून जात असताना समोरच एक किल्ला दिसला तो म्हणजे “सोनगड”!!

किल्ले सोनगड म्हणजे “सोन्याचा खजिना असलेला किल्ला” !!
=====================================
मावळा म्हणलं की आठवतो तो होळकर, शिंदे, पवार यांचा इतिहास आणि मग ते रुबाबदार किल्ले आणि महाल. त्यातलाच एक किल्ला म्हणजे मांडू (मांडव). हा किल्ला मी पहिला आणि मला आठवला जिंजीचा किल्ला. अतिशय मोठ्या प्रमाणात विस्तारित किल्ला आहे. आजही तिथले अवशेष अतिशय चांगल्या स्थितीत आहेत. किल्ल्यात जाताना एक घाट लागतो (डांबरी रस्ता आहे) आणि तो रस्ता किल्ल्याच्या अनेक दरवाज्यातुन जातो. पण कोणत्याही महत्वाच्या किंवा राजधानी सारख्या किल्ल्याला पहारे देणारे किल्ले सुद्धा असतात. जस आपल्या रायगडाला पहारा देण्यासाठी १४ किल्ले आहेत असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले व लिहिले आहे. तसाच एक किल्ला आम्ही पहिला तो म्हणजे “सोनगड”. मांडू (मांडव) पाहून आम्ही महेश्वरला जाताना मांडू (मांडव) किल्ल्याच्या अगदी शेवटच्या टोकाला पश्चिमेच्या बाजूला हा किल्ला आहे. घाटातून खाली उतरताना अचानक पुढे महादरवाजा आणि तटबंदी दिसते. बाहेरून पाहताच असे वाटते की अतिशय टोलेजंग आणि रुबाबदार किल्ला आहे हा आणि त्या काळात असेल सुद्धा. पण आतमध्ये फार काही अवशेष उरले नाहीत. किल्ल्याचा महादरवाजा नक्कीच काबिल-ए-तारीफ आहे. संपूर्णपणे दुर्लक्षित असलेला या किल्ल्याचा दरवाजा मात्र चांगल्या स्थितीत आहे.
27459558_10156014751010295_2438942848880811811_n
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
किल्ल्याचा इतिहास काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना मला जास्त काही माहिती मिळाली नाही परंतु जी काही मिळाली ती इथे मी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
मांडव किल्ल्याला इतिहास फार जुना आहे. अगदी राजा भोज, मोहमद खिलजी, नासीर शहा, बाज बहाद्दूर, मोगल आणि शेवटी पवार यांनी राज्य केले. अल्लाउद्दीन खिळजीने सुद्धा या किल्ल्यावर आक्रमण केले आहे. असे म्हणतात की ज्यावेळी अल्लाउद्दीन खिळजीने या किल्ल्यावर आक्रमण केले त्यावेळी अतिशय प्रचंड प्रमाणात खजाना आणि कोहिनुर हिरा त्याला इथे मिळाला होता.

किल्ल्यावरचा शाही खजाना सुरक्षित रहावा म्हणून किल्ल्याच्या पश्चिमेला एका डोंगरावर ज्याचा आकार उंटाच्या पाठीसारखा आहे एक किल्ला बांधला ज्याला सोनगड असे नाव दिले. जोवर महादरवाज्या जवळ जात नाही तोवर इथे किल्ला असेल असे अजिबात वाटत नाही. प्रचंड असा शाही खजाना या किल्ल्यावर ठेवला जाई. आजही तिथे शेळ्या-मेंढ्या किंवा जनावरे चरायला घेऊन जाणाऱ्या अनेकांना त्याकाळची नाणी भेटतात. एक इंग्रजी इतिहासकार किंकेड याला इथे एक सोन्याचं नाणं भेटलं होत. इथे एक हनुमानाची विचित्र मूर्ती आहे जिचा उजवा हात एका माकडाच्या डोक्यावर ठेवलेला आहे. शाही खजिन्यात जे काही सोने असायचे ते सगळे इथे ठेवले जाई त्यामुळे याला सोनगड असे नाव देण्यात आले. याच्या महादरवाज्याला सोनपूरचा दरवाजा असे म्हणतात.

पश्चिमेच्या बाजूने मांडव किल्ला उतरला की दोन मोठे डोंगर दिसतात ज्यामध्ये उजव्या बाजूला मांडव किल्याचे शेवटचे टोक दिसते जिथे राणी रुपमातीचा महाल आहे आणि डाव्या बाजूला जो डोंगर दिसतो तो म्हणजे “सोनगड”.

कधी मांडवगड पहायला गेला तर हा किल्ला नक्की बघा. फोटोमध्ये सोनगडचा महादरवाजा पाहू शकता आणि दुसऱ्या फोटोमध्ये दोन्ही किल्ले दिसतात. जरा झूम करून पाहिलं तर राणी रुपमातीचा महाल दिसू शकेल.

27459097_10156014751145295_7757040067528303419_n

सोनगड पाहून घाट उतरला आणि धमनोद मार्गे महेश्वरला पोचलो. जात असताना आम्ही सोनगड आणि राणी रूपमती महाल असे दोन्ही बाजूला दिसणताना फोटो काढायला थांबलो होतो. (वरती जो फोटो दिला आहे तो). तिथून जरा पुढे गेलो तर नेहमीप्रमाणे एक कलाकार आम्हाला सापडलाच. रस्त्याच्या बाजूला एका दगडावर डोळ्याला हात लावून झोपला होता. नक्कीच गडी एकदम टाईट होता. शिऱ्याला अशी माणसं लै आवडतात. लगे गडी थांबवायला लावून त्याचा एका फोटो काढला.

IMG_20180127_165332

मस्त प्रवास करत गमती-जमाती करत आम्ही महेश्वरला जात होतो. संध्याकाळी पोहचायचे, किल्लयाजवळच हॉटेल घेऊन महेश्वर मार्केट फिरायचे आणि साड्या घ्यायच्या असा प्लॅन होता.  संध्याकाळच्या सुमारास आम्ही महेश्वरला पोहचलो, किल्ल्याच्या अगदी दरवाज्याजवळ हॉटेल होते “कृष्णा पॅलेस”. रूम बुक केली आणि फ्रेश होऊन मग बाहेर मार्केटमध्ये फिरायला निघालो …

क्रमश:

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

1 comment on “माळवा भटकंती: भाग – ३Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *