मुलभूत माहिती:
- प्रकार – लांब पल्याची खडतर वाट
- अंदाजे २२०० फुट उंची
- ट्रेकचे अंतर : ८-१० किलोमीटर.
- पुण्यापासून १२५ किलोमीटर
- मार्ग : पुणे – कर्जतरोड – ठाकूरवाडी
- आमचा ट्रेक दिवस : २४ ऑगस्ट २०१३
- Difficult Level : Medium to Low
बरेच दिवस ऐकून होतो फोटो बगत होतो ते कलावंतीण दुर्गाचे… दुर्ग खुपच मोहक आणि कोणताही ट्रेकर त्याच्या प्रेमात पडेल असा, पण दुर्दैव असे होते की आम्ही पावसाळ्यात गेलो होतो आणि अतिशय धुके होते आम्हाला प्रबळगडावर तर २ फुटापुढचे हि काही दिसत नव्हते त्यामुळे गडावरून कलावंतिणीचे जे सौंदर्य होते ते पाहता आले नाही, थोड्या वेळासाठी धुके बाजूला झाले आणि ती एक झलक दिसली …. वा…वा….वा… काय तो दुर्ग…. काय ती हिरवळ …. आणि ते देखणे सौंदर्य … २ मिनिसाठी वाटले महाराजांनी आमच्यावर दया दाखुनच काही क्षणासाठी धुके बाजूला केले होते.
कलावंतीण दुर्ग आणि प्रबळ गडला जायचा मार्ग….पुण्यापासून १२० किलोमीटर वर ठाकूरवाडी, तिथून पुढे प्रबळगड माची अंदाजे ४-५ किलोमीटर वर आहे.
इतिहास
इ.स. १६३५ जून-नोवेंबर मुघल सरदार खान जमान १९ जून १६३५ रोजी शहाजहान ला भेटला जुन्नर चा पूर्ण भाग आणि शिवनेरी किल्ला जिंकून शहाजी राजांचे पानिपत्य करण्यासाठी तो दख्खन मध्ये उतरला.त्याच प्रमाणे आदिलशाही कडून रनदौलत खान हि उतरला.पावसाला संताच खान जमान ने शहाजीराजांचा पाठलाग सुरु केला.शहाजीराजे मुरंजन “प्रबळगडावर” असून तिथे थोडी विश्रांती घेऊन पुढे निघणार आहेत अशी बातमी खानला कळली.त्याने मग गडाकडे कुच केली आणि ३ कोसांवर येऊन थांबला.अतिशय अवघड वाट जबरदस्त जंगल त्यामुळे त्याचे पूर्ण सैन्य किल्ल्यापर्यंत पोहचू शकले नाही.तरीदेखील तो किल्याच्या पायथ्याशी पोचला पण तोपर्यंत शहाजीराजे रात्रीचा दिवस करून महुलीस पोचले आणि खानाचा डाव फसला.
इ.स. १६५७ मध्ये शिवरायांनी कल्याण-भिवंडी स्वारी केली आणि प्रबळगड जिंकला.त्यावेळी तिथे केशरसिंग नावाचा किल्लेदार होता जो मारला गेला.त्याची आई तिच्या बाकीच्या दोन मुलासह तिथे होती महाराजांनी मुलांसमवेत तिच्या आईला सुखरूप त्यांच्या वतनी पाठवले.
शिवकाळात या किल्याचे सुभेदार “आबाजी महादेव” हे होते. या किल्ल्या वरुनच उत्तर कोकणाचा कारभार चालत असे.
मुरंजन किल्ला हा प्रबळगड झाला तो महाराजांच्या काळातच.
एका बाजूला मलंग गड ,चंदेरी , पेब , माथेरान अशी भलीमोठी डोंगररांग तर दुसरीकडे लांबवर आकाशात घुसलेला कर्णाला . शेजारीच प्रबळगड नावाप्रमाणेच प्रबळ भासत होता .घनदाट जंगल परिसराची शोभा अजूनच वाढवत होता .आजूबाजूची छोटीमोठी खेडी , त्यांची कौलारू घरे , मधूनच दिसणारा एखाद्या धनिकाचा टुमदार बंगला , काही पाणथळ जागा व बंधारे ,वळणं वळणाचा रस्ता असा तो देखावा होता.
पाऊस आणि धुके जास्त स्ल्यामुळे काही फोटोग्राफी करता आली नाही म्हणून हिवाळ्यात परत एकदा यायचे असे ठरवले. खाली काही फोटो आहेत.
0 comments on “प्रबळगड – कलावंतीण दुर्ग” Add yours →