मुलभूत माहिती:
- प्रकार – खडतर
- ट्रेकचे अंतर : 1३-1४ किलोमीटर
- पुण्यापासून 1३0 किलोमीटर
- Difficult Level : Medium
- ट्रेकिंगचा दिवस : २१ डिसें २०१३
हरिश्चंद्रगड(Harishchandragad) म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर ! ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड, एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहेत हरिश्चंद्रगडाला तर दोन चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढलतो. १७४७ – ४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.
शुक्रवारी २० तारखेला राकेश भौ माझ्या घरी मुक्कामाला आले, कारण सकाळी ४ वाजता निघायचे होते थंडी भरपूर होती त्यामुळे ४ चाकी घेऊन जायचे ठरले. ठरल्या प्रमाणे सकाळी आम्ही ४ वाजता निघलो, चाकण .. राजगुरुनग मार्गे आम्ही नारायणगावात पोहचलो, नारायणगावात एस.टी. Stand च्या पुढे मस्त मसाला दुध मिळते तिथे मस्त १-१ ग्लास दुध मारले आणि परत प्रवास सुरु…. काही वेळातच आम्हाला शिवनेरीचा पायथा लागला तिथे आम्ही गडी बाजूला लाऊन शिवनेरीला मुजरा केला आणि खूप खूप आभार मानले .. कारण इथेच आमच्या स्वराज्याची चिंगारी जन्माला आली होती.
इथून मग आम्ही सरळ खिरेश्वर गावात पोहचलो … तिथे पायथ्याला आम्हला एक घर दिसले तीत्थे आम्ही गाडी लावली थोडावेळ तिथल्या मामांबरोबर गप्पा गोष्टी केल्या … कोरा चहा मारला आणि मग ट्रेक सुरु केला.
नेमहीप्रमाणे दगड धोंड्यातून वाट कडत आम्ही पुढे निघालो ….. बऱ्यापैकी चढाई होती सुरवातीला थोडी दमछाक होते पण नंतर गडी सूर पकडते.
थोड्याच वेळात आम्ही आमच्या पहिल्या टप्प्यावर पोहचलो तिथे वनविभागाचे २ अधिकारी भेटले … मस्त पैकी टाकली होती त्यांनी पुढचा मार्ग त्यांनी आम्हाला सांगितला आणि आम्ही थोडावेळ थांबून पुढे निघालो … जाता-जाता त्यापैकी एकाचा मस्त फोटू काढला
इथून पुढे थोडा खडा रोड होता, वनविभागाने साल्या लावून थोड दोपे केले आहे कारण पूर्ण खडा मार्ग असल्याने थोड रिस्की आहे… पण पाईप ला पकडून तुम्ही आरामात जाऊ शकता.
एवढा टप्पा पार केला की मग आमचा दुसरा टप्पा आला … तिते थोडावेळ टेकून .. लिंबू सरबत पिऊन मग आम्ही पुढचा प्रवास सुरु केला,,,,
मध्येच मोबाईल ला रेंज आली मग बायकोला फोन केला आणि खुशाली कळवली
थोड्या अंतरावर गेल्यावर आम्हला आमचा तिसरा टप्पा दिसत होता, आणि चहा-पाण्याची टपरी हि दिसत होती … तीथला एक मावळा टपरी बाहेर उभारला होता … असे वाटत होते तो ट्रेकर लोकांची वाट पाहत होता …. खालील फोटो मध्ये तो तुम्हाला दिसेल
हाच तो मावळा जो ट्रेकर लोकांची वाट पाहत होता
इथून आम्ही मग सरळ मंदिराच्या दिशेने चालत होतो…. चालून चालून वैतागून गेलो होतो कारण ७ छोटे छोटे डोंगर चढून-उतरून गेल्यावर मग मंदिर आणि कोकण कडा लागते … असे वाटत होते की आम्ही २-४ दिवस चालत होतो … जसे आम्हाला मंदिर दिसू लागले तसा चांगला आनंद झाला… इथे थोडे फोटो काढले मंदिरात दर्शन घेतले ….
तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच `मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहाआहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत `चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केल आहे असे स्थानिक गावकरी सांगतात.
‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर
तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम
पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु ।
सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता ।
सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्हन
संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु ।
महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति ।
आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥’
हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर, भिंतीवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून `तत्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर, चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥ अशा ओळी वाचता येतात.
मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एकभाग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.
आता मात्र वेध होते ते कोकण कड्याचे …. कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा , वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूटा भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. १८३५ मध्ये कर्नल साईक्सला येथे आहे.
मोबाईल वरुन १-२ विडीओ पण घेलते ,
कोकणकडा पाहिल्यावर बाजूलाच एक झोपडी होती तिथे बसून आम्ही सोबत असलेले खाद्य (उखडलेली अंडी) खाण्याचा प्लान केला… पण तांदळाची गरम भाकरी… मटकीची उसळ आणि ठेचा … असा मेनू मावशीने सांगितल्यावर मग काय …. तुटून पडलो ….. मस्त जेवलो आणि २०-२५ मिनिटे झोपही काढली
सर्व कार्यक्रम आटोपल्यावर मग परतीचा मार्ग धरला…. कारण अंधार होण्याच्या आगोदर आम्हाला गावात परतायचे होते… आणि पल्लाही मोठा होता …
परत येताना काही फोटो काढले नाहीत एका ठिकाणी थांबल्यावर राकेश भौ ला म्हणले एक माझा फोटो काढ राव … मग राकेश भौ नी एक फोटो काढला मस्त पैकी …
राहण्याची सोय :
गडावर हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागच्या गुहेत आणि गणेशगुहा व आजुबाजूच्या गुहेत राहता येते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय गडावर जेवणाची सोय उपलब्ध आहे.
पाण्याची सोय :
पाणी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
खिरेश्वर मार्गे ४ तास तर पाचनई मार्गे ३ तास लागतात.
0 comments on “हरिश्चंद्रगड” Add yours →